Header Ads

Breaking News

शेतकऱ्यांना फवारणी पंपावर मिळत आहे १००% अनुदान| लवकर करा अर्ज.

Maharashtra Free Favarani Pampa Scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप देण्यासाठीची योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट होती. परंतु ती वाढवून आता ३१ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी करण्याचा पंप हा १००℅ टक्के अनुदानावर सरकार मार्फत दिला जाणार आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

राज्य सरकारच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून शेतकऱ्यांच्या कल्याणाचे धोरण कायम ठेवले आहे. २०२४-२०२५ या योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी विभागाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 

फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बॅग

शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व बियाणे औषधे आणि खाते यांसाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय कापूस साठवणुक बॅग देखील १००% अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कामासाठी आवश्यक असणारी संसाधने सहजपणे आणि विणामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. 

अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख

जिल्हा अधिक्षक सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी १४ ऑगस्टपर्यंत, तर कापूस साठवणूक बॅगेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावे. अर्जाच्या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज भरून त्याची पडताळणी केली जाईल. आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ दिला जाईल. 

शेतकऱ्यांसाठी आवाहन

या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी अर्ज करताना योग्य माहिती पुरवावी. आणि अर्जाच्या सर्व अटी शर्तिचे पालन करावे. कृषी विभागाने दिलेल्या मुदतीच्या आधी सर्व शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत असे सांगण्यात आले आहे, की बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी १४ ऑगस्टपर्यंत तर कापूस साठवणूक बागेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करावे. 

शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना

या योजनांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे. बॅटरी ऑपरेटेड पंपामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेताततील पिकांवर फवारणी करणे सुलभ होईल. तसेच कापूस साठवणूक बॅगेमुळे कापसाची सुरक्षित साठवणूक होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहण्यात मदत होईल. 

शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून, अधिकाधिक योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

मित्रांनो हा लेख तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनांची माहिती मिळून ते या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत