सीबील स्कोर कसा चेक करायचा? How To Check CIBIL Score Online|
![]() |
| How To Check CIBIL Score In Marathi |
तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घ्यायचं असतं, तसेच पर्सनल लोन किंवा होम लोन घेत असताना, तुमचा CIBIL स्कोर किंवा क्रेडिट स्कोर सर्वात महत्त्वाचा असतो. एक चांगला CIBIL स्कोर असल्यास, तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच, तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचा क्रेडिट स्कोर कसा तपासू शकता हे पाहूया.
CIBIL Score म्हणजे काय? What Is CIBIL Score In Marathi|
सिबिल स्कोर (Credit Score) हा कर्ज घेणाऱ्या आणि परतफेड करणाऱ्या व्यक्तीची वित्तीय क्षमता दर्शवणारा एक स्कोर आहे. हा स्कोर ३०० ते ९०० या श्रेणीमध्ये मोजला जातो. ७५० च्या वरचा स्कोर असलेल्या व्यक्तीला कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते आणि असा स्कोर चांगला मानला जातो.
What Is CIBIL Full Form? SIBIL चा फुल फॉर्म काय आहे?
आपण CIBIL स्कोअरबद्दल ऐकलं आहे, पण तुम्हाला माहित आहे का, की CIBIL म्हणजे काय? CIBIL चा पूर्ण अर्थ आहे Credit Information Bureau India Ltd. स्कोअर.
How To Increase CIBIL Score In Marathi| सिबिल स्कोर कसा वाढवायचा?
कोणत्याही प्रकारच्या लोनसाठी अर्ज करताना सर्वप्रथम सिबिल स्कोअर तपासला जातो. जर हा स्कोअर कमी असेल, तर लोन मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी आणि कमी होऊ न देण्यासाठी काय उपाय करावे याची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.
CIBIL Score कसा चेक करायचा? How To Check CIBIL Score In Marathi|
तुम्ही वर्षातून एकदा तुमचा CIBIL रिपोर्ट मोफत तपासू शकता.
चरण 1: सर्वप्रथम, CIBIL च्या वेबसाइटवर जा.
चरण 2: नंतर, "Get Your CIBIL Score" या पर्यायावर क्लिक करा.
चरण 3: फॉर्ममधील सर्व माहिती अचूकपणे भरून पुढे जा.
चरण 4: तुमचे एक खाते तयार केले जाईल, आणि तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळतील. खातं सक्रिय करण्यासाठी, तुमच्या ईमेलवर पाठवलेल्या मेलमधील लिंकवर क्लिक करून खातं सत्यापित करा.
चरण 5: नंतर, प्राप्त लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून CIBIL वेबसाइटवर लॉगिन करा.
चरण 6: तुम्हाला काही सबस्क्रिप्शन पर्यायांची माहिती दिली जाईल. वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा CIBIL रिपोर्ट पाहायचा असेल तर सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. मात्र, जर तुम्ही फक्त एकदाच रिपोर्ट पाहणार असाल, तर तुम्ही फ्री सर्विस वापरू शकता आणि त्याला सबस्क्रिप्शनची आवश्यकता नसते.
चरण 7: पॅन कार्ड नंबरसह तुमची इतर माहिती भरून सबमिट करा. पॅन कार्डची माहिती योग्य आहे याची खात्री करा आणि पुढे जा.
चरण 8: तुम्हाला लोन आणि क्रेडिटसंबंधी काही प्रश्न विचारले जातील. या उत्तरांच्या आधारावर तुमचा CIBIL स्कोअर तयार केला जाईल आणि तुमचा क्रेडिट अहवाल तयार केला जाईल. उत्तर अचूकपणे द्या.
चरण 9: तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार होताना दिसेल. येथे तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर पाहू शकता आणि अहवाल डाउनलोड करू शकता.
या पद्धतीने तुम्ही मोबाईलवरूनही तुमचा CIBIL स्कोअर तपासू शकता (CIBIL Score Free Online Check In Marathi)
FAQ : CIBIL Score Check Free Online In Marathi
What Is CIBIL Score In Marathi?
उत्तर : चांगला सिबिल स्कोर ७०० किंवा त्याहून अधिक असावा. हा स्कोर ७०० च्या वर असला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन किंवा कर्ज मिळवणे सोपे जाईल.
What Is The Minimum CIBIL Score To Get The Loan
उत्तर : बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांनी किमान सिबिल स्कोअर ठरवलेला नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीत, सामान्यतः किमान ७०० किंवा ७५० स्कोर असणे अपेक्षित असते.
CIBIL Score Website
उत्तर : www.Cibil.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत