Header Ads

Breaking News

Maharshtra Police Recruitment 2024| डिसेंबर 2024 मधे पुन्हा पोलिस भर्ती राज्यात 7,500 तर मुंबईत 1200 पदांची भर्ती केली जाणार.

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024  

पोलीस भरतीचे स्वप्न ऊराशी बाळगुन असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस दलातील सुमारे ७,५०० पदे भरली जातील. यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी १,२०० पदे आरक्षित आहेत.

राज्यातील गेल्या दोन वर्षांत सुमारे ३५ हजार पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली आहे. आता डिसेंबर महिन्यात पुन्हा ७,५०० पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती, आणि आता डिसेंबरमध्ये पुन्हा भरतीचा कार्यक्रम होणार आहे.

कोरोना काळात रखडलेली पोलीस भर्ती प्रक्रिया

कोरोना व्हायरसने जगभरात मोठा गोंधळ घातला होता आणि त्यामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. कोरोना साथीच्या प्रभावामुळे गेल्या तीन वर्षांत राज्य पोलीस दलात भरती झाली नव्हती. लोकसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे पोलिसांची संख्या कमी पडत आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार आणि १७ हजार पदांसाठी भरती झाली होती, परंतु अजून ७ ते ८ हजार अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ७,५०० पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लवकरात लवकर १४,४७१ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यात पोलीस शिपाई, ८ जिल्ह्यात चालक व शिपाई, आणि ५ जिल्ह्यात बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा घेतल्या गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदान न मिळाल्यामुळे त्यांच्या भरती प्रक्रियेत थोडा विलंब झाला आहे. सध्याची भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

एकट्या मुंबईत होणार १,२०० पदांची भर्ती

डिसेंबरमध्ये मुंबई पोलीस दलासाठी १,२०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मागील वर्षी मुंबईत ८,००० पदांची भरती झाली होती, ज्यातील अनेक पोलीस सप्टेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सामील होतील. सध्या मुंबईत ४,२३० पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी ५,६९,००० अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जामध्ये २,५७२ पोलीस हवालदार, ९१७ चालक, ७१७ तुरुंग हवालदार आणि २४ बँड्समन पदांसाठी आहेत.

महिला पोलिस भर्तीसाठी पावणेतीन लाख अर्ज

राज्यात महिला पोलीस भरतीसाठी ३,९५४ पदांसाठी २.७५ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यामध्ये एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबईत सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले असून, एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत