Header Ads

Breaking News

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे चेक करा, तुमचे सिम कार्ड कोणी दूसरे तर वापरत नाही ना याची खात्री करा| Simcard Check Online|

SimCard Check Online

देशभरात अनेक लोक मोबाइल फोन वापरतात, आणि काही लोक एकाचवेळी एक किंवा दोन मोबाइल्स वापरतात. तसेच, ड्युअल सिम कार्ड असलेले मोबाईल्सही लोकप्रिय आहेत. परंतु, यामुळे बनावट आयडी वापरून सिम नंबरच्या आधारावर अनेक गुन्हे घडले आहेत. काही वेळा एका व्यक्तीच्या नावावर असलेले सिम दुसरे कोणीतरी वापरत असल्याचे आढळले आहे.

Sim Card Online Check

भारत हा तंत्रज्ञानात प्रगत असलेला देश असला, तरी मोबाईल वापरात भारताचा तिसरा क्रमांक आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर लोक मोबाईल्स आणि सिम कार्ड्सचा वापर करतात, ज्यामुळे सिम कार्ड्शी संबंधित फ्रॉड होण्याची शक्यता वाढते. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत हे तपासू शकता. तुमच्या नावावर इतर कोणीतरी सिम कार्ड वापरत नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, कारण सध्याच्या काळात फोन नंबरचा वापर करून अनेक फ्रॉड घडत आहेत.

जानून घेणे महत्वाचे का आहे

जर तुमच्या आयडीवर एखादे सिम कार्ड सक्रिय असेल जे तुम्ही वापरत नाही, तर त्याचे परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या आयडीवर नोंदणीकृत सिमद्वारे चुकीच्या किंवा बेकायदेशीर गतिविधी होत असल्यास, तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या आयडीवर किती सिम कार्ड्स नोंदणीकृत आहेत हे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे.

शहरी भागात दुसऱ्याच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड्स खरेदी करून पैशांचा फ्रॉड करणे वाढू लागले आहे, आणि हे फ्रॉड आता ग्रामीण भागातही पसरू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी तपासून पाहणे आवश्यक आहे की त्यांच्या नावावर किती आणि कोणत्या नंबरचे मोबाईल सिम कार्ड्स आहेत. तुम्ही स्वतः किती सिम कार्ड्स वापरत आहात आणि तुमच्या नावावर असलेली कोणती सिम कार्ड्स तुम्ही कधीच वापरली नाहीत, हे जाणून घेण्यासाठी आणि सिम कार्ड्सद्वारे होणाऱ्या फ्रॉडबद्दल सजग राहण्यासाठी आम्ही हा लेख तयार केला आहे.

तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहे, ते पहा. 

तुम्हाला तुमच्या नावावर असलेल्या सिम कार्ड्स तपासण्यासाठी https://www.sancharsathi.gov.in या लिंकला भेट देणे आवश्यक आहे. जर तुमच्या ओळखपत्रावर बनावट सिम कार्ड वापरले जात असेल, तर तुम्ही त्या नंबरला पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकता. एका ओळखपत्रावर तुम्ही जास्तीत जास्त ९ सिम कार्ड्स नोंदवू शकता.

दूरसंचार विभागाचे उपसंचालक ए. रॉबर्ट. रवी यांच्या माहितीनुसार, एका ऑनलाइन टूलच्या मदतीने वापरकर्ते अनावश्यक नंबरांपासून स्वतःचा बचाव करू शकतात. या वेबसाइटद्वारे युझर्सना त्यांच्या नावावर कोणते सीमकार्ड्स सक्रिय आहेत आणि किती मोबाइल क्रमांक चालू आहेत याची माहिती मिळू शकते. जर त्यांच्या नावावर इतर व्यक्ती सीमकार्ड वापरत असल्याचे आढळले, तर युझर्स त्या क्रमांकाला ब्लॉक करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात. तसेच, एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकतात, परंतु अनेक युजर्सच्या नावावर ९ पेक्षा जास्त कनेक्शन असल्याचे दिसून आले आहे. हे पोर्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यांमध्ये लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रांसाठी उपलब्ध आहे.

टेक्नॉलॉजी मानवाच्या फायद्यासाठी जरी असली तरी तिचा चुकीचा वापर केल्यास हानी होऊ शकते. त्यामुळे मोबाईल आणि सीमकार्ड काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण सुरक्षित राहू शकू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत