Header Ads

Breaking News

तुमच्याही घरात बसवले जाणार प्रिपेड स्मार्ट मिटर| Smart Electricity Prepared Meter|

Prepared Smart Meter Information In Marathi

थकबाकीमुळे महावितरणचे अर्थकारण विस्कळीत झाल्याने, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यात स्मार्ट प्रीपेड वीजमीटर बसवण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, अदानी, मे. एनसीसी, मे. मोन्टेकार्लो आणि मे. जीनस या चार कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे.

राज्यभरात २,२४,६१,३४६ मीटर बदलले जातील, आणि हा प्रकल्प एकूण २६,९२३.४६ कोटी रुपये खर्चाचा आहे. चारही कंपन्यांना वेगवेगळ्या विभागांचे कंत्राट देण्यात आले आहे. दिवाळीनंतर मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रिपेड स्मार्ट इलेक्ट्रीसिटी मिटर|Prepared Smart Electricity Meter|

तुमच्या घरात प्रीपेड स्मार्ट मीटर आहे का? जर नसेल, तर महावितरणकडून लवकरच ते बसवले जाईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार हे नवीन मीटर बसवले जाणार आहेत. याआधी आपण महिनाभर वीज वापरून शेवटी वीज बिल भरत होतो. मात्र, या मीटरमध्ये आधी रिचार्ज करावा लागेल आणि त्यानुसार वीज वापरणे शक्य होईल.

प्रीपेड मीटर बसवल्यामुळे वीज बिलाचे झंझट संपेल. ग्राहक जितक्या रकमेचा रिचार्ज करतील, तितकीच वीज वापरू शकतील. जर तुम्ही १०-१५ दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी बाहेर जात असाल, तर तुम्ही स्मार्ट मीटर बंद करू शकता.

प्रीपेड स्मार्ट मीटर म्हणजे काय|What Is Prepared Smart Meter|

प्रीपेड स्मार्ट मीटर हे वीज वापर मोजण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित एक मीटर आहे. पूर्वीच्या मीटरप्रमाणे तुम्ही आधी वीज वापरून नंतर बिल भरत असाल, तर प्रीपेड मीटरमध्ये तुम्हाला आधी रिचार्ज करून वीज वापरावी लागेल. या मीटरमध्ये एक डिवाइस बसवलेले आहे, जे मोबाइल टॉवर्सद्वारे विद्युत कंपन्यांच्या रिसीव्हरला सिग्नल पाठवते. त्यामुळे, विद्युत कंपन्या त्यांच्या ऑफिसमधूनच मीटरची रीडिंग घेऊ शकतात आणि निरीक्षण करू शकतात.

महावितरणच्या बाबतीत पाहिले तर वीज चोरी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेकदा छापे मारावे लागतात, तरीही वीज चोरी पूर्णपणे थांबवता येत नाही, ज्यामुळे महावितरणला मोठा तोटा होतो. अनेक ग्राहक वेळेवर बिल भरत नाहीत, त्यामुळे थकबाकी वाढत जाते आणि वितरण कंपनीला आर्थिक फटका बसतो. रीडिंग घेताना होणाऱ्या चुका ग्राहक आणि वीज कंपनी यांच्यातील तणाव वाढवतात, ज्यामुळे काही ग्राहक वीज बिले थकीत ठेवतात. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या मीटरमुळे वीज चोरी करणे शक्य नाही आणि वीज बिल थकीत ठेवणेही शक्य होणार नाही.

प्रीपेड स्मार्ट मीटरचे फायदे|Prepared Smart Meter Benefits|

प्रिपेड स्मार्ट मिटरचे फायदे खालील प्रमाणे आहे -

  • प्रीपेड स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुम्हाला हवी त्या कंपनीची वीज वापरण्याचे स्वातंत्र्य असेल. 
  • तुम्ही जितका रिचार्ज कराल, तितकीच वीज वापरू शकता आणि कुठूनही रिचार्ज करण्याची सुविधा असेल. 
  • या मीटरमुळे तुम्ही वीज वापरावर लक्ष ठेवू शकता आणि किती वीज वापरली आहे व किती शिल्लक आहे, हे सहजपणे पाहू शकता.
  • तुमच्या खात्यात पैसे नसले तरी कनेक्शन कट होणार नाही; रिचार्जची आठवण करून देण्यासाठी अलार्म सेट केले जाऊ शकतात. 
  • जर तुम्हाला अतिरिक्त विजेची गरज असेल, तर एक्स्ट्रा रिचार्ज करून हवी तितकी वीज वापरता येईल.
  • या मीटरमध्ये कोणतीही छेडछाड केल्यास, त्याचा मेसेज थेट वीज कंपनीला जाईल आणि वापरकर्त्याच्या विरोधात कारवाई होऊ शकते. 
  • वीज बिल भरण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज नाही, कारण मॅन्युअल मीटरप्रमाणे रीडिंग घेण्याची आवश्यकता नाही. 
  • वीज कंपनी कर्मचारी त्यांच्या कार्यालयातूनच वीज वापराची गणना करू शकतात.
  • यामुळे मीटर रीडिंगच्या चुकांमुळे येणारे जास्तीचे लाईट बिल किंवा अतिरिक्त चार्जेस कमी होतील. 
  • तुम्ही किती वीज वापरली आणि त्याची रक्कम किती झाली, तसेच मागील महिन्यात किती वीज वापरली गेली, हे सगळे स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये सोप्या पद्धतीने पाहू शकता.
प्रीपेड स्मार्ट मीटर कोणत्या पद्धतीने कार्य करते. 

सध्या वापरले जाणारे मीटर दर महिन्याच्या रीडिंगनुसार वीज कंपनीकडून बिल पाठवतात. मात्र, नवीन स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये तुम्ही किती वीज वापरली आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल, जी तुम्ही मोबाईलवर केव्हाही पाहू शकता. या मीटरमुळे ग्राहक त्याच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेटनुसार वीज वापरू शकतो. २०२५ पर्यंत देशभरातील सर्व मीटर बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, आणि यासंबंधी बऱ्याच ठिकाणी काम सुरू झाले आहे.

घरात किती वीज वापरली आहे आणि रिचार्जमधील किती पैसे शिल्लक आहेत, याची माहिती ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे मिळेल. जर मध्यरात्री रिचार्ज संपले तर वीजपुरवठा तत्काळ बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते दहा या वेळेतही पैसे संपले तरी वीजपुरवठा सुरू राहील. तुम्हाला मोबाईलद्वारे वीज संपल्याची सूचना मिळेल, आणि त्यानंतर बारा तासांनी वीज आपोआप बंद होईल.

प्रिपेड स्मार्ट मीटरचे तोटे

भारत हा विकसनशील देश असल्याने, अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अद्यापही नियमित वीजपुरवठा मिळत नाही. जर तिथे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले गेले, तर त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक लोक रिचार्ज करू शकणार नाहीत, आणि त्यामुळे वीज वापरापासून वंचित राहतील, ज्यामुळे अशा कुटुंबांना अंधारात बसावे लागेल. स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्यानंतर अनेक खाजगी कंपन्या वीज पुरवण्यासाठी येतील, परंतु वीज कंपन्यांचे खाजगीकरण झाल्यास वीज बिलांच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या खिशाला ते परवडणारे नसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत