अजित दादा शरद पवारांची सत्ता येऊ देणार नाहित, नारायण राणेंचा दावा,
Narayan Rane Speake On Ajit Pawar

Narayan Rane Speakes On Ajit Pawar
खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा देत म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे काहीही बोलतात, मात्र शिंदे शांत आहेत. राणे यांनी पुढे म्हटले की, "जर शिंदे यांच्या जागी मी असतो, तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडवल्याबद्दल तडीपाराची नोटीस बजावली असती." या वक्तव्याद्वारे राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कडक इशारा दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी आरोप केला की, "शरद पवार जातीजातीत भांडणं लावत आहेत आणि राज्यातील शांत वातावरण बिघडवत आहेत." राणे यांच्या मते, शरद पवार हे निवडणुकीसाठी हा सर्व आटापिटा करत आहेत. परंतु, त्यांनी असा दावाही केला की, "अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार नाहीत." नारायण राणे यांनी ही टीका एका पत्रकार परिषदेत केली आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर टीका करताना आरोप केला की, "शरद पवार या वयातही महाराष्ट्रात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, उलट वाद लावत आहेत." राणे यांनी विचारलं, "चारवेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असताना त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी का केली नाही? मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षण का दिलं नाही? हे वाद तुमच्या मनास मान्य आहेत का? लोकांची मनं पेटवण्याऐवजी शांततेचा मोर्चा का काढला नाही? जर तुम्ही शांततेचा संदेश दिला असता, तर तुमची कीर्ती वाढली असती."
राणे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे, आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पवारांच्या राजकारणात संशय
नारायण राणे यांनी शरद पवारांवर टीका करताना गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, "शरद पवार, तुमच्या प्रत्येक राजकारणात संशय आहे. आज 83व्या वर्षीही तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकला नाही. तुमचा फोकस केवळ आगामी निवडणुकांवर आहे." राणे यांनी पुढे अजित पवारांचा उल्लेख करून चिमटा घेतला, "पण अजितदादा काही तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाहीत." राणे यांच्या या वक्तव्यानं शरद पवार यांच्या राजकीय धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहित
नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही तीव्र टीका केली. राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. आम्ही हाताने पैसे दिले, मातोश्रीत दिले, पण कधीच रसीद दिली नाही. आणि आता ते भ्रष्टाचारावर बोलत आहेत. ते कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत, परंतु शरद पवार यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं. त्यांना अभ्यास नाही, कायदा आणि सुव्यवस्था कशी हाताळतात ते माहीत नाही."
संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी हल्ला चढवला, "संजय राऊत आग लावणारा आहे. तो पेट्रोल घेऊनच फिरतो, जेव्हा कोणी नसतं तेव्हा आग लावतो, पण जेव्हा कोणी समोर असतं तेव्हा काही करत नाही." राणे यांच्या या वक्तव्यांनी शिवसेनेवर आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार हल्ला केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत