अंकित बैयानपुरिया जीवन प्रवास.
अंकित बैयानपुरिया जीवन प्रवास आणि संपत्ती - Ankit Baiyanpuria Biography, Networth And Lifestyle.
![]() |
| Ankit Baiyanpuria Biography, Image Source - Facebook. |
Ankit Baiyanpuria Biography in Marathi
नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला या आर्टिकल मध्ये अंकित बैयानपुरिया यांच्या विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. अंकित बैयानपुरिया यांचे खरे नाव अंकित सिंह आहे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९९५ ला हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील बैयानपुर या गावात झाला. ते हिंदूधर्मी आहेत. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील एक शेतकरी आहेत, जे शेतात काम करतात. आणि त्यांची आई एक गृहिणी आहे. अंकित यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती ४.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्यांचे एक यूट्यूब चैनल ही आहे, त्याच्यावर १.५ मिलियन सबस्क्राईबर आहेत. आणि त्यांचे घर हरियाणा मध्ये आहे. अंकित बैयानपूरिया यांनी आपल्या डाव्या हातावर सिख धर्माचा टॅटू बनवला आहे. अंकित हिंदू धर्माचे पालन करतात, तसेच हिंदू देवी देवतांची आरती करतात, ते हनुमानजींचे भक्त आहेत. त्यांना हत्यारांमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांच्याकडे एक पिस्तुलही आहे.
अंकित बैयानपुरिया यांची शारीरिक रचना.
| उंची | १७५ से. मी, ५ फूट ९ इंच. |
| वजन | ७० किलो. |
| छाती | ४२ इंच. |
| बायसेप्स | १५ इंच. |
| कंबर | ३० इंच. |
| डोळ्यांचा रंग | काळा. |
| केसांचा रंग | काळा |
अंकित बैयानपूरिया यांचे व्यक्तिगत जीवन.
अंकित यांचा जन्म दिनांक ३१ ऑगस्ट १९९५ आहे. २०२४ मध्ये त्यांचे वय २८ वर्षे आहे. त्यांचे जन्मस्थान हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील बयानपुर हे आहे. अंकित यांची राशी कान्य आहे. अंकित बैयानपुरिया यांचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे. सोनीपत हा त्यांचा गृह जिल्हा आहे. अंकित बैयानपुरिया यांचे शिक्षण गव्हर्मेंट हायस्कूल बैयानपुर 10 वी आणि अकरावी व बारावी आर्ट्स गव्हर्मेंट सीनियर सेक्रेटरी स्कूल मॉडेल टाउन सोनीपत मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी महर्षी दयानंद विश्वविद्यालय (एमडीयु) रोहतक मधून बीए मध्ये शिक्षण पूर्ण केले. ते हिंदू धर्माचे पालन करतात तसेच ते हनुमानाचे निस्सीम भक्त आहेत. अंकित बैयानपुरिया हे शाकाहारी आहे. त्यांचे वडील एक शेतकरी आहेत तर त्यांची आई गृहिणी आहे.
अंकित बैयानपुरिया यांच्याशी संबंधित काही रोचक तथ्य
अंकित बैयानपुरिया यांनी २०२३ मध्ये ७५ हार्ड चॅलेंज घेतले होते. आणि त्यांनी हे चॅलेंज पूर्ण मनापासून पूर्ण केले. त्यांनी चॅलेंज पूर्ण केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावरती खूप प्रसिद्धी मिळाली. अंकित भैय्यानपुरी हे भारतीय फिटनेस मधील एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. जे पारंपारिक भारतीय कसरत शैलींना बढावा दिल्याने सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. अंकित बैयानपूरिया सुरुवातीला त्यांचे यूट्यूब चैनल ‘हरियाणवी आखाडा’ वरती कॉमेडी चे व्हिडिओ बनवून टाकत होते. परंतु त्यांनी कोविड-19 चा लॉकडाऊन नंतर आपले सर्व ध्यान फिटनेस कडे वळवले. तसेच खुराक च्या स्वरूपात भारतीय आहार आणि गावातील शुद्ध खाण्या – पिण्याच्या वस्तू घेत होते. त्यांनी आपले चॅनेल अंकित बैयानपुरिया ला ब्रँड बनवण्यासाठी ७५ हार्ड चॅलेंज घेतले. तसेच ७५ दिवसात या चैलेन्जला पूर्णही केले. instagram तसेच youtube वरती लोकांनी त्यांचे खूप मजाकचे व्हिडिओ बनवले. तसेच लोकांनी त्यांची खूप मजाक घेतली. तरीही ते प्रयत्न करत राहिले. त्यांच्या वर्कआउट मधे पारंपरिक कुस्ती सोबत, सपाटे (हिंदू कुस्ती बर्फी), रस्सी चढ़ने, आणि पळणे यासारखे व्यायाम शामिल होते. आणि अन्य दुसरे भारतीय मैदानी खेळातील व्यायामही सामील होते. अंकित त्यांच्या गावातील कोच गुरु कृष्ण पहिलवान यांच्याकडून ट्रेनिंग घेत होते.
अंकित बैयान पुरिया यांचे सोशल मीडिया अकाउंट – Ankit Baiyanpuria Social Media Accounts.
अंकित आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती खूप ॲक्टिव्ह राहतात. अंकित बैयानपुरिया यांचे इंस्टाग्राम अकाउंट वरती १७१९ पोस्ट आहेत आणि ६.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच त्यांचे यूट्यूब चैनलवर २८ लाख सबस्क्राइबर आहेत. यूट्यूब चैनल वरती त्यांनी ५४० व्हिडिओ अपलोड केलेले आहेत.
अंकित बैयानपूरिया यांची नेटवर्थ|Ankit Baiyanpuria Networth|
अंकित बैयानपुरिया यांची नेटवर्थ प्रत्येक महिन्याला 60K ते 70K सांगितली जाते. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती किंवा सेलिब्रिटीचे नेटवर्थ चा सटीक आकडा सांगणे अवघड असते. वेळेनुसार त्यांच्या संपत्तीत बदल होऊ शकतो. कारण ते एक प्रसिद्ध भारतीय फिटनेस इंफ्लुएंसर आहेत. जाहिराती, इव्हेंट, सोशल मीडिया अकाउंट आदींच्या माध्यमातून त्यांची कमाई होते. ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत बदल होत असतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत