महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना काय आहे?
![]() |
| Maharashtra Kishori Shakti Yojana. |
Maharshtra Kishori Shakti Yojana (महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना)
मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की, महाराष्ट्र सरकारद्वारे सर्व बालिकांना मानसिक आणि भावनात्मकरीत्या सशक्त बनवण्यासाठी एका नवीन योजनेची सुरुवात करत आहे. त्या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र कीशोरी शक्ती योजना.
Maharashtra Kishori Shakti Yojana (महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना)
महाराष्ट्र सरकार द्वारे सर्व बालिकांना शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक रूपाने सशक्त बनवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली जात आहे. या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना या योजनेअंतर्गत सर्व बालिकांना मानसिक आणि शारीरिक रूपाने सशक्त बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारद्वारे या योजनेची सुरुवात यासाठी केली आहे की, राज्यातील महिलांचा शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक विकास किशोर अवस्थेत झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र किशोरी योजनेअंतर्गत वयाच्या 11 वर्षापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंतच्या सर्व किशोरवयीन मुली व बालिकांना शारीरिक आणि मानसिक रूपाने मजबूत बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना 2024 काय आहे.
महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना 2024 मध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे अंगणवाडी केंद्रांमधे दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या हितासाठी सुरू केलेली महाराष्ट्र किशोरी शक्ती 2024 काय आहे. याची संपूर्ण माहिती आम्ही या आर्टिकल मधे देणार आहोत. त्यासाठी या आर्टिकलला शेवटपर्यंत वाचा. आणि या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही आपल्या भगिनींना लाभ मिळवून देऊ शकतात. सोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात. हे ही आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ मिळवा.
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना.
महाराष्ट्र शासन तर्फे आपल्या राज्यातील दारिद्र्यरेषेखालील असणारे कुटुंब म्हणजे ज्याच्याकडे BPL कार्ड आहे, किंवा जे जे कुटुंब BPL कार्ड वापरतात अशा कुटुंबातील किशोरींच्या फायद्यासाठी महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेची सुरुवात केली आहे. आणि या योजनेअंतर्गत 11 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत जितक्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांना सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व किशोरवयीन मुलींचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनात्मक रूपाने आणि त्यांचा विकास केला जाणार आहे. सरकारद्वारे यासाठी प्रत्येक किशोरवयीन मुलीवर 1 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. या योजनेचे पूर्ण संचालन राज्य सरकारकडून होणार आहे. आणि याची देखभाल महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाद्वारे केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबातील मुलींना संपूर्ण मानसिक आणि शारीरिक रित्या स्वस्त बनवणार आहे. ज्यामुळे ते आपल्या परिवाराचा विकास करू शकतील आणि येणाऱ्या काळात देशाच्या प्रगतीत हातभार लावू शकतील, याशिवाय भारतात आणखी अनेक राज्य आहेत. तेथील महिलांचा विकास कारणे गरजेचे आहे. तेथील सरकारांसाठी किशोरी शक्ती योजना प्रेरणादायी ठरणार आहे. आणि ते सरकारी आपल्या राज्यात अशा प्रकारच्या योजना आणण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून संपूर्ण देशातील महिला सुदृढ आणि सशक्त होऊन देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतील.
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजने विषयी महत्वाचे मुद्दे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना 2024. |
| वर्ष | २०२४ |
| संबंधित मंत्रालय | महिला व बाल कल्याण. |
| लाभार्थी | महाराष्ट्रातील ११ – १८ वय असलेल्या किशोरवयीन मुली. |
| उद्देश | किशोरीवयिन मुलींना शरीरिक, सामाजिक, मानसिक आणि भावनात्मक रूपाने सशक्त बनवने. |
| अर्ज प्रक्रिया | Offline. |
| राज्य | महाराष्ट्र. |
| अधिकारीक संकेतस्थळ | womenchild.maharashtra.gov.in |
किशोरी शक्ति योजनेचा उद्देश.
या योजनेचा सर्वात मुख्य उद्देश म्हणजे, महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजमध्ये जितक्या पण किशोरवयीन मुली आहेत. आणि त्यांचे वय ११ ते १८ च्या मध्ये आहे. त्यांना स्वस्त आणि चांगले खाणे आणि मासिक पाळीच्या दरम्यान आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेची देखभाल करणे आणि लग्नासाठी जागृत केले जाणार आहे. याशिवाय त्यांना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण घेतले जाणार आहे. ज्याने त्या त्यांच्या जीवनातील प्रत्येक समस्येचा सहजपणे सामना करू शकतील.
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना २०२४ चे महत्वाचे बिंदु.
सरकारने या योजनेला राज्यातील अहमदनगर,,अकोला, संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, मध्ये लागू केली आहे.
अंगणवाडी केंद्रावर प्रत्येक तीन महिन्याला लाभार्थी मुलींची तपासणी केली जाईल. यासाठी त्यांचे स्वास्थ्य कार्ड बनवले जाईल. राज्य सरकारने या योजनेसाठी 3.8 लाख कोटी रक्कम घोषित केली आहे.
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजनेसाठी पात्रता?
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहे –
- किशोरी ही महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवी.
- मुलीचे वय ११ ते १८ वर्षे दरम्यान असायला हवे.
- BPL कार्ड धारक म्हणजेच दारिद्र्यरेशेखाली आसणाऱ्या कुटुंबातील मुलींनाच याचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे
- आधारकार्ड.
- जन्म प्रमाणपत्र.
- शाळेचे शैक्षणिक प्रमाणपत्र.
- BPL राशन कार्ड.
- शाळा सोडल्याचा दाखला (TC).
- जातीचे प्रमाणपत्र.
महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
महाराष्ट्र किशोरी योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात सेवा देत असलेल्या अंगणवाडी कार्यालयांमध्ये सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वे करणार आहेत. सर्वेत ज्या मुलींची निवड होईल, त्यांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाला पाठवली जाईल. विभागाकडून निवडलेल्या मुलींची तपासणी केली जाइल. ज्या मुली लाभ देण्यायोग्य किंवा पात्र आहेत. त्यांचे पंजीकरण करून घेतले जाईल. पंजीकरण झाल्यानंतर त्या मुलींना किशोरी कार्ड दिले जातील ज्याद्वारे त्या योजनेद्वारे मिळणारे सर्व लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत