लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे? Adhar Card Name Change After Marriage In Marathi|
मित्रांनो, आधार कार्ड हे, सद्यस्थितीला आपल्या भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट झालेले आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुतेक सर्व शासकीय आणि इतर कामे आधार कार्ड शिवाय पूर्ण होत नाहीत.
आणि म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे फार महत्त्वाचे आहे. आणि तितकेच महत्त्वाचे आहे, त्या आधार कार्डला प्रत्येक नागरिकाने वेळोवेळी अपडेट करणे.
लग्नानंतर स्त्रियांच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. फक्त त्यांचे आडनाव बदलते लग्नानंतर स्त्रियांच्या नावापुढे त्यांच्या माहेरच्या नावा ऐवजी त्यांच्या सासरचे आडनाव लावले जाते.
मित्रांनो, आजच्या या लेखात आपण लग्न झाल्यानंतर आधार कार्ड वरील नाव कसे बदलावे. या संदर्भातील सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी काय करावे लागेल?
मित्रांनो, तुम्हाला जर लग्नानंतर आधार कार्ड मधील नावात बदल करायचा असेल, तर तुम्ही हा बदल दोन पद्धतीने करू शकता. (१) ऑनलाइन, (२) ऑफलाइन. खाली दिलेल्या माहितीत दोन्ही पद्धतींची माहिती संपूर्णपणे दिलेली आहे.
लग्नानंतर ऑफलाइन आधार कार्ड मधील नावात बदल कसा करायचा?
१) जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या – तुमच्या आधार कार्डवडील नाव बदलण्यासाठी तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला किंवा आधार अपडेट केंद्राला भेट द्या. UIDAI च्या साइटवर तुम्ही तुमच्या जवळचे आधार नोंदणी केंद्र शोधू शकता.
२) आधार अपडेट फॉर्म भरा – आधार नोंदणी केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार अपडेट चा फॉर्म दिला जाईल. तुम्हाला तो आधार अपडेट फॉर्म काळजी पूर्वक भरावा लागेल. आणि त्यात तुम्हाला जो बदल करायचा आहे, तो बदल काळजीपूर्वक लिहा.
३) आवश्यक कागदपत्रे जमा करा – आधार अपडेट फॉर्म भरल्यानंतर आधार अपडेट फॉर्म बरोबरच तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करायचे आहे. लग्नानंतर व्यक्तीचे नाव बदलण्यासाठी पुरावा म्हणून तुमचे विवाह प्रमाणपत्र आवश्यक असते.
४) बायोमेट्रिक पडताळणी – तुमचा बायोमेट्रिक डाटा जसे की, तुमचे फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कैन प्रक्रियेचा भाग म्हणून आधार नोंदणी केंद्रावर रेकॉर्ड केला जाईल.
५) पावती – अपडेट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला (युआरएन) अपडेट विनंती क्रमांक सह पावती स्लिप मिळेल. हे युआरएन तुम्हाला तुमच्या अपडेट एप्लीकेशनची स्थिती ट्रॅक करण्यासाठी मदत करू शकते.
लग्नानंतर आधार मधील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन स्टेप्स –
१) UIDAI सेल्फ सर्विस पोर्टल वर जा – जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे असेल, तर तुम्ही ते सहज करू शकता. त्यासाठी तुम्हाला UIADI च्या अधिकृत स्वयंसेवा पोर्टलला (https://uidai.gov.in) भेट द्यावी लागेल.
२) अपडेट आधार वर क्लिक करा – पोर्टलवर गेल्यानंतर ‘Update Adhar’ या पर्या यावर क्लिक करा.
३) तुमचा आधार क्रमांक टाका – पोर्टलवर तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल तो व्यवस्थित टाका. आता तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका.
४) नाव अपडेट पर्याय निवडा – तुमचे नाव अपडेट करण्याचा पर्याय निवडा आणि लग्नानंतर तुम्हाला हवे असलेले नाव तिथे प्रविष्ट करा.
५) आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा – तुमच्या नावातील बदलाची पडताळणी करणाऱ्या आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड करा.
६) तुमचे अप्लिकेशन रिव्यू आणि कन्फर्म करा – तुम्ही भरलेला फॉर्म व्यवस्थित तपासून घ्या आणि शेवटी सबमिट बटनावरती क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन आधार कार्ड मधील नावात बदल करू शकता.
लग्नानंतर पत्नीचे नाव कसे बदलावे?
लग्नानंतर आधार कार्ड मधील नाव बदलण्यासाठी तुम्हाला वरील कागदपत्रांसह, वरील स्टेप फॉलो करणे गरजेचे आहे. त्या स्टेप्स नुसार तुम्ही तुमच्या पत्नीचे, स्वतःचे किंवा आई-वडिलांचे तसेच कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड वरील नाव बदलू शकता.
लग्नानंतर आधार कार्ड मधे नाव बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे.
१) संबंध पुरावा –
- मनरेगा जॉब कार्ड
- पासपोर्ट
- पेन्शन कार्ड
- आर्मी कॅन्टीन कार्ड
२) जन्म तारीख –
- जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट
- पॅन कार्ड
३) आयडी पुरावा –
- पासपोर्ट
- पॅन कार्ड
- शिधापत्रिका
- मतदार ओळखपत्र
- चालक परवाना
४) पत्त्याचा पुरावा –
- पासपोर्ट
- बँक स्टेटमेंट
- पासबुक
- मतदार ओळखपत्र
- चालक परवाना
- विज बिल
लग्नानंतर नाव बदलने आवश्यक आहे का?
लग्नानंतर तुम्ही तुमच्या मर्जीने, तुमच्या पतीच्या मर्जीने किंवा घरच्यांच्या मर्जीने आपले नाव बदलू शकता. परंतु नाव बदललेच पाहिजे असे काही सक्तीचे नाही. परंतु पुढील भविष्यातील काही गोष्टी करता किंवा मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना पुढील अडचणी येऊ नये यासाठी नाव बदलणे आवश्यक असते.
आधार मध्ये किती वेळा नाव बदलता येईल?
कोणत्याही व्यक्तीस त्याच्या आधार कार्ड मध्ये फक्त आणि फक्त दोनदाच नावात बदल करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये फक्त दोनच वेळा तुमच्या नावात बदल करू शकता. तिसऱ्या बदलाच्या बाबतीत विशेष विनंतीनुसार UIDAI च्या प्रादेशिक शाखेद्वारे केवळ अपवादात्मक प्रकरणांना परवानगी दिली जाते.
प्रश्न आणि उत्तरे
लग्नानंतर आधार कार्ड मधील नाव बदलू शकतो का?
होय
आधार कार्ड मधील नाव ऑनलाईन बदलू शकतो का?
होय
आधार कार्ड मध्ये नाव दुरुस्तीसाठी कोणता पुरावा आवश्यक आहे ?
पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलने सक्तीचे आहे का?
नाही
आधार अपडेट मोफत केले जाईल का?
आधार अपडेट साठी तुम्हाला तुमच्या कार्यालयानुसार खर्च आकारला जातो. कारण काही ठिकाणी या कामासाठी ५० रुपये घेतले जातात. तर काही ठिकाणी १०० रुपये आकारले जातात.
मित्रांनो, आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे या माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना माहिती मिळून ते आपले नाव बदलू शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत