प्रधानमंत्री लखपती दीदी योजना काय आहे? जानून घ्या लखपती दीदी योजने विषयी संपूर्ण माहिती.
लखपती दीदी योजना
भारतातील विविध राज्यांनी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात तसेच सर्व स्तरावर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ज्याचा उल्लेख अलीकडेच १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी त्यांच्या भाषणात या योजनेचा उल्लेख केला असला तरी ही योजना आधीपासून देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू आहे.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला लखपती दीदी योजनेबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल किंवा या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, आमचा हा लेख तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. कारण या लेखात लखपती दीदी योजना काय आहे? लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, आणि लखपती दीदी योजनेविषयी आणखी बरीच माहिती या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
| योजनेचे नाव | लखपती दीदी योजना |
| योजनेची घोषणा | स्वातंत्र्य दिन सोहळ्यात करण्यात आली |
| योजनेची घोषणा कोणी केली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी |
| लाभ | महिलांना लखपती बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे |
| उद्दिष्ट | महिलांना आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भर आणि सक्षम बनविणे |
| लाभार्थी | भारतातील महिला |
लखपती दीदी योजना काय आहे?
लखपती दीदी योजना भारतातील विविध राज्यांमध्ये सध्या सुरू आहे. सध्या लखपती दिली योजने अंतर्गत सुमारे २ कोटी महिलांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडे अर्ज करणाऱ्या महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनविणे, आणि ड्रोन चालवणे व दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महिला बचत गटांना कृषी उपक्रमांसाठी ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्रामीण समाजातील महिलांना सक्षम बनवताना कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत १५००० महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचे आणि दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणामुळे महिलांना अत्याधूनिक कौशल्ये, तसेच उत्पन्न वाढीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे. ड्रोन द्वारे अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटक नियंत्रणा द्वारे शेतीमध्ये क्रांती घडवून आणली जाऊ शकते.
लखपती दीदी योजनेचा शुभारंभ
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी भाषण केलं, या भाषणात ते म्हणाले होते की, आम्हाला आमच्या देशातील सुमारे २ कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे. आणि म्हणूनच आम्ही लखपती दीदी योजनेवर विशेष लक्ष देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, तुम्ही कोणत्याही गावात गेलेत की तुम्हाला बँक वाली दीदी, अंगणवाडी वाली दीदी आणि औषध वाली दीदी दिसेल, तसेच नजिकच्या काळात लाखो रुपयांच्या मालमत्तेची मालकीण असणाऱ्या लखपती दिदीही तुम्हाला गावात दिसणार आहेत.
लखपती दीदी या योजनेचे उद्दिष्ट
लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. म्हणजेच त्या आत्मनिर्भर बनु शकतील. आणि महिलांचा व्यवसायात सहभाग वाढावा अशी सरकारची इच्छा आहे. यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम होतील. आणि पुरुषांच्या बरोबरीने देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान देतील.
लखपती दीदी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- लखपती दीदी योजना वेगवेगळ्या राज्यांची राज्य सरकारे आपल्या राज्यात राबवत आहेत.
- १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणात लखपती दीदी योजनेवर चर्चा करण्यात आली होती.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना करोडपती बनवण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे.
- योजनेच्या माध्यमातून सुमारे २ कोटी महिलांना करोडपती बनवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
- या योजनेतून दोन कोटीपेक्षा अधिक महिला लखपती बनणार आहे.
- या योजनेद्वारे महिलांना वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यामुळे त्या त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये कौशल्य प्राप्त करून पारंगत होऊ शकतील. लखपती दीदी योजने अंतर्गत महिलांना प्लंबिंग एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- लखपती दीदी योजनेमुळे महिलांना व्यवसायात पुढे पाऊल टाकण्यासाठी आधार मिळणार आहे. ज्यामुळे अलीकडच्या काळात लघु उद्योगांमध्ये आपल्याला अनेक महिलांचा सहभाग पाहण्यास मिळेल.
लखपती दीदी योजनेची पात्रता काय आहे?
लखपती दीदी योजना विविध राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. ज्यामुळे प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या पद्धतीने त्या योजनेसाठी पात्रता निकष ठरविले आहेत. परंतु येथे आम्ही तुम्हाला काही सामान्य पात्रतेबद्दल माहिती देत आहोत.
या योजनेचा लाभ फक्त भारतातील महिलांनाच मिळणार आहे. लखपती दीदी योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळू शकेल इतर कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
- आधार कार्डचा फोटो (झेरॉक्स).
- पॅन कार्ड चा फोटो (झेरॉक्स).
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करायचा
मित्रांनो अजूनपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची कोणती माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. ही माहिती येताच आम्ही तुमच्यापर्यंत पोस्ट च्या माध्यमातून घेऊन येऊ. मित्रांनो ही पोस्ट तुमचे मित्र – मैत्रिणी जवळचे नातेवाईक यांना आवर्जून शेअर करा. जेणेकरून गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत