शासन आपल्या दारी योजना, जानून घ्या संपूर्ण माहिती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा नवीन कार्यक्रम सादर केला आहे. या नवीन कार्यक्रमामुळे एकाच छताखाली सरकारच्या सर्व योजना आणि कागदपत्रांचा लाभ घेता आला पाहिजे असा उद्देश आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती म्हणजेच, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्दिष्टे, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे फायदे, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया याविषयी या लेखांमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
शासन आपल्या दारी म्हणजे काय?
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि कागदपत्रे यांचे सर्व फायदे एकत्रित करण्यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. स्थानिक आणि ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी, तसेच त्यांना योग्य रीतीने लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभाचा सोहळा मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेला सातारा जिल्ह्यापासून सुरू झाला आहे. आतापर्यंत बुलढाणा, शिर्डी, सातारा, अहमदनगर, जेजुरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमधे हा उपकृम राबविण्यात आला आहे.
अशाप्रकारे आपले प्रत्येक जिल्हा प्रशासनांनी या दोन दिवशी शिवरायांचे आयोजन केल्यास जवळपास ७५,००० लोकांना या शिबीरांचा फायदा घेता येईल. आतापर्यंत राज्यातील जवळपास ७५ लाख लाभार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा मिळाला आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अभियानातून सुमारे ७५ हजार रहिवाशांना लाभ देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यान्कडून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत शिबिरे उभारण्यासाठी कृषी ग्रामीण विकास, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग कौशल्य विकास, शालेय शिक्षण यासह विविध विभागांना दिलेला निधी खर्च करण्यास सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.
शासन आपल्या दारी योजनेचा तपशील
| योजनेचे नाव | शासन आपल्या दारी |
| योजना कोणी सुरू केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| उद्दिष्टे | घरोघरी सरकारी सेवा पुरावणे |
शासन आपल्या दारी योजनेचा तपशील
शासन आपल्या दारी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील नागरिकांना शासकीय योजना आणि कागदपत्रे यांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अडचणींचे निवारण करणे आहे. बऱ्याचदा एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला सरकारी योजनांसाठी जर अर्ज करायचा असेल तर, अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. अनेक सरकारी कार्यालयांना व अधिकार्यांना भेट द्यावी लागते. आणि विविध प्रकारचे कागदपत्र सादर करावे लागतात. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य व्यक्तीस खूप वेळ निघून जातो.
सामान्य नागरिकांच्या या गैरसोयीचे निवारण करण्यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. जेणेकरून त्यांना सर्व सरकारी सुविधा आणि लाभांचा फायदा एकाच ठिकाणी मिळू शकेल.
शासन आपल्या दारी योजनेची उद्दिष्टे
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे काही प्रमुख उद्दिष्टे आणि फायदे खालील प्रमाणे आहेत
- माननीय मुख्यमंत्र्यांनी या योजनेची सुरुवात सातारा जिल्ह्यापासून केली.
- अधिकाऱ्यांमध्ये कार्यक्षम समन्वयाची हमी देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
- आपली कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दिलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. अज्ञानामुळे आणि संपूर्ण माहिती नसल्यामुळे ते अनेक चांगल्या योजनांचा फायदा मिळवु शकत नाही.
- नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी १३ एप्रिल रोजी शासनाच्या सूचनेनुसार सर्व समस्या सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याची घोषणा केली.
- जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) आणि विधानसभा सदस्य लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम (MLALAD) निधी, प्रत्येकी २० लाख रुपये दोन्ही उद्देश्यांसाठी वापरला जाऊ शकतो.
योजनेची उद्दिष्टे
सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजनेचे कागदपत्रे आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
सर्व जिल्हा प्रशासनांना आपापल्या भागात दोन दिवशीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जेणेकरून योजना आणि लाभांचे वाटप सुलभ होईल.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ७५ हजार लोकांना लाभ मिळणे अपेक्षित आहे.
शासन आपल्या दारी या योजनेत समावीष्ट योजना
- कृषि सेवा केंद्रांचे परवाने
- आधार कार्ड
- पास पोर्ट
- विवाह नोंदणी
- जॉबकार्ड
- शिकाऊ चालक परवाना
- पीेएम घरकुल योजना
- ई – श्रम कार्ड
- सेवानिवृत्त लाभ
- भरती मेळावा
- सखी किट वाटप
- पीेएम किसान
- मनरेगा
- मुलींना सायकल वाटप
- नविण मतदार नोंदणी
- शेतकरी ते ग्राहक बाजरपेठ
- कृषि प्रदर्शन
- डिजिटल इंडिया
- दिव्यांग साहित्य वाटप.
शासन आपल्या दारी योजने संबंधित प्रश्न आणि उत्तरे
शासन आपल्या दारी योजना म्हणजे काय?
शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सर्व योजनांचे लाभ एकाच छताखाली मिळवून देणे अपेक्षित आहे.
शासन आपल्या दारी या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
शासन आपल्या दारी योजनेचा मुख्य उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करणे हा आहे.
शासन आपल्या दारी ही योजना कोणी सुरू केली?
शासन आपल्या दारी ही योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत