मत्स्य संपदा योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती.
मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात १२ मे २०२० रोजी आत्मनिर्भर भारत या मोहिमेची घोषणा केली होती.
देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करून भारताला स्वावलंबी बनवणे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासाला नवी दिशा देणे हा या अभियानामागचा उद्देश आहे.
आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत अनेक लहान मोठ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक मत्स्य उत्पादन करणारा देश आहे. आणि देशांतर्गत मत्स्यपालनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. आणि म्हणूनच देशात मच्छी व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मत्स्य संपदा ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे या लेखात आपण पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काय आहे?
आपल्या देशात जवळपास ११ लाखां पेक्षा अधिक लोकांचा रोजगार मत्स्यपालन व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना (PMMSY) भारत सरकार द्वारे राबविण्यात येत आहे. ज्यामुळे मत्स्य व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या मासेमारी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास, तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
सध्या सरकार मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. भारतातील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सुरुवात केलेली आहे.
योजनेला केंद्रातील मोदी सरकारने ‘ब्लू रिवोल्युशन’ असे नाव दिले आहे. योजनेअंतर्गत मत्स्य पालनाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बँक कर्ज, विमा आदि विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
PMMSY योजनेअंतर्गत, केंद्र सरकार मच्छी पालन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ०३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २० हजार ५० कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात आलेला आहे.
ही रक्कम पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरली जाईल, जेणेकरून या क्षेत्रात रोजगाराची वाढ होण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची संपूर्ण माहिती
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |
| योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
| योजनेचे लाभार्थी | मत्स्य व्यावसायिक |
| योजनेची सुरुवात | १० सप्टेंबर २०२० |
| योजनेचे एकुण बजेट | २००५० कोटी रुपये |
| योजनेचा कालावधी | २०२० ते २०२५ पर्यंत |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
| अधीकृत संकेतस्थळ | https://pmmsy.dof.gov.in/ |
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे वेशिष्ट्ये.
- मत्स्य व्यवसायाच्या इकोसिस्टममध्ये २००५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणे.
- मत्स्य उत्पादन १३.७५ दशलक्ष मेट्रिक टन वरून २२ दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढवणे.
- मच्छी निर्यात ४६००० कोटींवरून शंभर हजार कोटी करणे.
- पोस्ट हार्वेस्ट लॉस्ट २० ते २५% वरून १० टक्क्यांपर्यंत कमी करणे.
- मच्छिमार आणि मच्छी पालनाचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.
- १५ लाख प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करणे.
- मच्छी पालन व्यवसायात खाजगी गुंतवणूक आणि उद्योजकता वाढीस सुलभ करणे
- कृषी GVA मधे मत्स्यपालन क्षेत्राचे योगदान ७.२८% वरून सुमारे ९% पर्यंत वाढवने.
- देशांतर्गत मासोळीचा वापर दरडोई ५ किलो पासून १२ किलो पर्यंत करणे.
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेची उद्दिष्टे.
- मत्स्य शेती होणाऱ्या भागापासून रिटेल मार्केट पर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या पुरवठा साखळीत सुधारणा करणे.
- PMMSY देशामधे मत्स्य शेती तयार करण्याच्या भागाचा विकास करेल.
- परिणामी देशाची जीडीपी सुधारण्यास मदत होईल, आणि रोजगार वाढण्यातही हातभार लागेल.
- या योजनेच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायात होणारी नासाडी कमी करण्याचे प्रयत्न केले जातील.
- त्याच त्याचप्रमाणे उत्तम दर्जाचे प्रोडक्शन टार्गेट केले जाईल, ज्यामुळे कोळी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होईल.
- उपलब्ध जमीन आणि पाण्याचा किफायतशीर, सक्षम, सर्व समावेशक आणि फायदेशीर वापर करून मत्स्य निर्मिती आणि कार्य क्षमता सुधारणे.
- मच्छिमार आणि मच्छी पालन करणाऱ्यांसाठी सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा निश्चित करणे.
- सक्रिय मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासकीय संरचना तयार करणे.
प्राधान्य उपक्रम
- थंड पाण्यात मत्स्यपालन
- समुद्री शैवाल लागवड
- सागरी मत्स्य पालन
- अंतरदेशीय मत्स्यपालन
- मच्छिमारांचे कल्याण
- पायाभूत सुविधा आणि काढणी नंतरचे व्यवस्थापन
- जलीय आरोग्य व्यवस्थापन
- शोभेचे मत्स्यपालन
- इतर महत्वाचे उपक्रम
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी.
- फिशर
- मत्स्य शेतकरी
- मासे कामगार आणि मासे विक्रेते
- बचत गटांमधे (SHGS) / सयुक्त दायित्व गट (JLGS)
- मासेमारी क्षेत्र
- मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था
- मासेमारी संघटना
- युद्योजक आणि खाजगी कंपण्या
- मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था / कंपण्या (FFPos/Cs)
- अनुसूचित जाती/जमाती/महिला/विविध अपंग व्यक्ति.
आवश्यक पात्रता
- अर्जदार हा भारताचा कायमचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- या योजने अंतर्गत देशातील सर्व मच्छीमार आणि शेतकरी अर्ज करू शकतात.
- नैसर्गिक आपत्ति ग्रस्थांना या योजनेचा लाभ दिला जाइल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मासेमारी कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- बँक खाते तपशील
- अर्जदाराचे कास्ट प्रमाणपत्र
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईट https://pmssy.dof.gov.in वर् जावे लागेल.
मुखपृष्टावर, योजना विभागातील PMMSY या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पीेएम मत्स्य संपदा योजनेच्या बुकलेट वर क्लिक करावे लागेल.
आता योजनेचा अर्ज तुमच्या पुढे उघडेल, यात सर्व माहिती बरोबर भरा आणि सब्मिट वर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्हाला या योजनेचा अर्ज भरता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत