Header Ads

Breaking News

महाराष्ट्र सरकार विश्वकर्मा योजना काय आहे? महाराष्ट्र सरकार विश्वकर्मा योजना|

मित्रांनो आपल्या भारत देशात विविध जाती धर्मांचे लोक राहतात. त्यातील काही विशिष्ट लोक विशिष्ट प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतलले असतात. अशाच प्रकारचा एक समाज आपल्या देशात आहे तो म्हणजे विश्वकर्मा समाज.

या विश्वकर्मा समाजातील लोक विविध पारंपारिक व्यवसायात गुंतलेले आहेत. या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुशंगाने देशाचे पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी विश्वकर्मा सामाजाच्या कल्याणासाठी उपयुक्त अशी, विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नुकतीच सुरू केली आहे.

सरकारने या योजनेला ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ असे नाव दिले आहे. ज्यामध्ये विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे १४० जातींचा समावेश केला जाणार आहे. अखेर या योजनेत काय विशेष आहे आणि या योजनेत सरकारचे धेय काय आहे. तसेच पीेएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, पीेएम विश्वकर्मा कौशल सन्मान या योजनेविषयीची संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

पीेएम विश्वकर्मा योजनेचा तपशील

योजनेचे नाव - पीेएम विश्वकर्मा कौशल योजना

योजनेची घोषणा कोणी केली - अर्थमंत्री निर्मला सितारामन

योजना कधी जाहीर केली २०२३-२०२४ च्या अर्थ संकल्पात

योजनेची सुरुवात कधी झाली - १७ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवशी

योजनेचे उद्दिष्टे - विश्वकर्मा समाजातील लोकांना प्रशि्क्षण आणि निधी प्रदान करणे

लाभार्थी - विश्वकर्मा समाजातील जाती

अधीकृत संकेतस्थळ https://pmvishwakarma.

टोल फ्री नंबर १८००२६७७७७७ आणि १७९२३

pm vishva karma yojana detailed information

पंतप्रधान विश्वकर्मा योजना काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती निमित्त ‘पीेएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना’ या योजनेची घोषणा केली. योजने अंतर्गत पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना तारण न घेता, कमी व्याजावर कर्ज प्रदान केले जाईल.

महाराष्ट्र पंतप्रधान विश्वकर्मा योजना काय आहे?

या योजने अंतर्गत विश्वकर्मा समाजातील मोठ्या लोकसंख्येला फायदा होणार आहे. या योजनेला भगवान विश्वकर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे १४० जाती आहे. या सर्व जाती या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहे. या जाती भारतातील विविध भागात राहतात.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत या समुदायातील लोकांना त्यांचे कौशल्य वाढवण्याची संधी दिली जाईल. तसेच त्यांना तंत्रज्ञान शिकण्याची संधी दिली जाईल. सरकार तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांना आर्थिक मदतही करणार आहे.

या योजनेअंतर्गत विश्वकर्मा समाजातील पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना कमी व्याजदरावर कर्ज वितरित केले जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पात पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी अर्थ सहाय्य पॅकेज घोषित करण्यात आले आहे.

पाच वर्षांच्या कालावधीसाठी १३००० कोटींच्या आर्थिक बोजासह या योजनेचा लाभ विनकर, लोहार, सोनार, लॉन्ड्री, आणि नाई कामगार यांच्यासह पारंपारिक कारागीरांच्या सुमारे ३० लाख कुटुंबांना होईल असा अंदाज आहे.

पारंपारिक कामगारांद्वारे बनवलेल्या सेवांची आणि उत्पादनांची गुणवत्ता आणि सुलभता वाढवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

पंतप्रधान विश्व कर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा, तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री यांनी म्हटले होते की, कारागिरी स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भारताचे खऱ्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात. आणि या योजनेचा फायदा महिला आणि समाजातील दुर्बल घटकांना होईल. जेणेकरून ते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतील.

पीेएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजने साठी पात्रता काय आहे?

पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्रसाठी फक्त भारतीय रहिवासी अर्ज करू शकतील .

या योजनेसाठी विश्वकर्मा समाजात येणाऱ्या १४० जाती अर्ज करण्यास पात्र असतील.

या योजनेत नमूद केलेल्या कुटुंब – आधारित अठरा पारंपारिक व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायात गुंतलेला व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहील.

ज्यांना त्यांचा स्वयंरोजगार सुरू करायचा आहे, ते विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर म्हणून नोंदणी करण्यास पात्र असतील.

नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष असणे गरजेचे आहे.

जर एखाद्या व्यक्तीला पीेएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत काम करायचे असेल तर, त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल, ज्या व्यवसायाची त्याने नोंदणी करतेवेळी माहिती दिली होती.

तसेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकार च्या PMEGP, PM स्वनिधि, मुद्रा इ. सारख्या क्रेडिट कार्ड आधारीत योजना अंतर्गत गेल्या ५ बर्षात कोणतेही कर्ज घेतलेले नसावे.

सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असणार नाही.

पीेएम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्डची छायाप्रत

शीधा पत्रीकेची छायाप्रत

अधिवास प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

फोन नंबर

ईमेल आयडी

बँक तपशील

पास पोर्ट आकाराचा रंगीत फोटो

पीेएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना रजिस्ट्रेशन

पीेएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र मध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला नोंदणी फॉर्म भरावा लागेल, यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. तेथून तुम्हाला ‘हाउ टू रजिस्ट्रर’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही पुढे सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून मिळेल.

पीेएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ऑनलाइन अप्लाय

२०२३ च्या अर्थसंकल्पा दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीेएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेची घोषणा केली केली होती. तसेच या योजनेची नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सर्वप्रथम, या योजनेच्या पोर्टलच्या मुख्य पृष्ठावर जावे लागेल, तेथे ‘हाऊ टू रजिस्टर’ या पर्यायावर क्लिक करावे.

यानंतर तुम्हाला तुमच्या संगणकाच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर नोंदणी करण्याच्या स्टेपची काही माहिती दिली जाईल.

या माहितीनुसार नोंदणी करण्यासाठी प्रथम आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करा.

यानंतर तुमच्या पुढे लाभार्थी नोंदणी फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि नोंदणी फॉर्म सादर करावा लागेल.

अशाप्रकारे तुमची या योजनेत नोंदणी केली जाईल.

पीेएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना लॉगिन

एकदा तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिनसाठी युजरनेम आणि पासवर्ड मिळेल .

तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागेल. यानंतरच तुम्हाला प्रशिक्षणाविषयी माहिती मिळेल.

प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला पीेएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र मिळेल. याद्वारे तुम्ही या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेऊ शकता.

यानंतर शेवटी तुम्हाला योजनांच्या घटकांसाठी अर्ज करावा लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या योजनेची माहिती मिळेल.

पंतप्रधान विश्वकर्मा योजने संबंधित प्रश्न आणि उत्तरे

पीेएम विश्वकर्मा योजना कोणी सुरू केली?

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना सुरू केली.

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना कधी सुरू झाली?

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सुरू झाली.

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा लाभ विश्वकर्मा समाजातील कारागिरांनी मिळणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत