पीेएम सूर्योदय योजना काय आहे? पीेएम सूर्योदय योजना कधी पासुन सुरू होणार?
PM Suryodaya Yojana – २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी एका चांगल्या अशा पंतप्रधान सूर्योदय नावाची योजना सुरू करण्याची घोषणा केली. भारत देशातील एक कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. देशातील दुर्गम भागांमध्ये वीज घराघरांमध्ये पोहोचली पाहिजे आणि देशातील सर्व सामान्य जनतेवरील विज बिलाचा भार कमी झाला पाहिजे. यासाठी सरकारकडून ही ख़ास योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेमुळे देशातील गरीब लोकांना विज बिलाचा त्रास सहन करावा लागणार नाही. प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ च्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या घरावर सौर पैनल बसवले जाणार आहेत. जेणेकरून सौर ऊर्जेचा वापर होईल आणि त्यांचे विज बिल कमी करता येईल. या योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना त्यांच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देणार आहे. देशातील मध्यमवर्गीय लोकांना आणि गरिबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. आजच्या या लेखात तुम्हाला पंतप्रधान सूर्योदय योजने संबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे. जसे की, पंतप्रधान सूर्योदय योजनेत अर्ज कसा करायचा? पंतप्रधान सूर्योदय योजनेचे फायदे, पंतप्रधान सूर्योदय योजनेची उद्दिष्टे, पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी पात्रता, पंतप्रधान सूर्योदय योजनेत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयीची संपूर्ण माहिती या लेखात तुम्हाला मिळणार आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेचे प्रमुख मुद्दे
या योजनेअंतर्गत वर्षभरात देशातील एक कोटी कुटुंबांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ज्यामुळे २०२६ पर्यंत ४० GW रूफटॉफ सोलर इंस्टालेशन्स साध्य करण्याच्या मोठ्या उद्दिष्टास मदत होणार आहे. केंद्र सरकार ने २०१४ मधे रूफटॉप सोलर कार्यक्रम सुरू केला होता. ज्याचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत ४० मेगावाट किंवा ४० गीगावाटची क्षमता साध्य करणे आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेचा तपशील
योजना - पंतप्रधान सूर्योदय योजना
कोणी सुरू केली - माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
अधीकृत संकेत स्थळ - www.solarrooptop.gov.in
लाभार्थी - देशातील मध्यम वर्गीय नागरिक आणि गरीब लोक
योजनेची घोषणा - २४ जानेवारी २०२४
अर्ज करण्याची प्रक्रिया - ऑनलाइन किंवा ऑफलाइन
उद्देश - सामान्य नागरिकांवरील विज बिलाचा भार कमी करने आणि पर्यावरण सुरक्षा
लाभ - सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार
श्रेणी - केंद्र सरकारची योजना
वर्ष - २०२४
PM Suryodaya Yojana Detailed Information
पंतप्रधान सूर्योदय योजनेची उद्दिष्टे
पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश देशातील गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या घरावर अनुदान देऊन सोलर पॅनल बसवणे आहे. ज्याच्या माध्यमातून गरीब आणि सामान्य लोकांना विज बिलापासून सुटका मिळेल. आणि स्वच्छ ऊर्जा म्हणजेच हरित ऊर्जेला जास्तीत जास्त वापरून पर्यावरणाचे संरक्षण करणे हा उद्देश आहे. यासाठी लोकांना सरकार तर्फे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देऊन प्रत्येक नागरिकाच्या घरावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. आपल्या देशातील जे नागरिक विजेच्या वाढत्या किमतीमुळे कंटाळले आहेत, त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशभरात सुमारे एक कोटी कुटुंबांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने सुमारे एक कोटी पेक्षा अधिक नागरिकांच्या घरावर सौर पॅनल बसवण्याची हमी दिली आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
पंतप्रधान सूर्योदय योजनेचा प्रथम लाभ देशातील गरिबांना व मध्यमवर्गीय लोकांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांचे उत्पन्न सुमारे एक लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेचे फायदे
- पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरावर सौर पॅनल बसवले जातील.
- जेणेकरून त्यांच्या वीज बिलाचा खर्च कमी होईल.
- पंतप्रधान सूर्योदय योजनेचा थेट फायदा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना होईल.
- पंतप्रधान सूर्योदय ही योजना वीज कपातीची समस्या असलेल्या भागात आणि विज बिल कमी करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.
- या योजनेमुळे गरीब कुटुंबांच्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे विज बिल तर कमी होणारच आहे, त्यासोबत भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्यात होण्यास मदत होणार आहे.
- रूफटॉफ सोलर पॅनल म्हणजे इमारतीच्या / घराच्या छतावर बसवलेले फोटोहोल्टीक पॅनल जे मुख्य वीज पुरवठा युनिटला जोडलेले असतात. त्यामुळे ग्रीड कनेक्टेड विजेचा वापर कमी होतो आणि ग्राहकांचे वीज बिलही कमी होते.
- सौर ऊर्जा हा हरित ऊर्जा स्त्रोत आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनांचा वापरही कमी होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी होण्यास मदत होईल.
- तसेच तुमच्या भागात जर वीज पुरवठा कमी करण्याच्या समस्येपासून तुम्हाला समाधान मिळवायचे असेल, तर त्या पासुन देखिल आराम मिळेल.
पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी आवश्यक कागद पत्रे
- अर्जदाराचे आधारकार्ड
- अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- विज बिल
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पास पोर्ट आकाराचा फोटो
- शीधा पत्रिका
पंतप्रधान सूर्योदय योजना ख़र्च आणि अनुदान
इमारतीच्या किंवा घराच्या छतावर वेगवेगळ्या क्षमता असलेल्या पॅनल किंवा बॅटरी बसविण्यात येतात. तुम्हाला तुमच्या घरावर किती किती क्षमतेचे पॅनल बसवायचे आहे. त्यानुसार बॅटरीचा सेटअप असतो. आणि यावरच तुमचा एकुण खर्च अवलंबून असतो. साधारणत एक किलोवॅट क्षमतेचा सेटअप बसवण्यासाठी पन्नास हजार रुपये ते एक लाख रूपये एवढा खर्च येऊ शकतो. तसेच पाच किलोवाट क्षमतेचा सेटअप साठी अडीच ते सव्वातीन लाख रुपये एवढा खर्च येतो. केंद्र सरकार पंतप्रधान सूर्योदय योजनेत पैनल सेटअप साठी ४०% सबसिडी देत आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (www.solarruftop.gov.in) जावे लागेल.
यानंतर होम पेजवर गेल्यानंतर Apply निवडा.
आता तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि बाकीची विचारलेली माहिती भरा.
यानंतर तुमचा विज बिल क्रमांक भरा.
वीज खर्चाची माहिती आणि प्राथमिक माहिती भरल्यानंतर सौर पॅनल तपशील समाविष्ट करा.
तुमच्या छताचे क्षेत्रफळ मोजून घ्या आणि भरा.
तुम्हाला तुमच्या छताच्या क्षेत्रफळानुसार सोलर पॅनल निवडावे लागतील.
आता अर्ज सबमिट करा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार या योजनेमधे सोलर पैनल बसवण्याची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा करेल.
पंतप्रधान सूर्योदय योजनेशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे
पंतप्रधान सूर्योदय योजना कधी आणि कोणाकडून जाहीर करण्यात आली?
केंद्र सरकारने २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू करण्याची घोषणा केली.
पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे?
पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या आणि गरीब लोकांच्या घरावर सौरपॅनल बसवून त्यांना विज बिलातून मुक्त केले जाइल. यासाठी केंद्र सरकार नागरिकांना त्यांच्या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देणार आहे.
देशातील कोणत्या नागरिकांना पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ मिळणार आहे
देशातील मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत देशात किती सोलर पैनल बसवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे?
पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील एक कोटी पेक्षा जास्त घरांवर सौर पॅनल बसवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत