Header Ads

Breaking News

बालिका समृद्धी योजना| केंद्र सरकारची बालिका समृद्धी योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती.

मित्रांनो आजही काही समाजात मुलींना दुय्यम स्तराची वागणूक मिळते. काही मोजके कुटुंब वगळले तर, आजही काही समाजात मुलगी जन्माला आल्यावर तिचे लोकांना ओझे वाटू लागते.

तरीही, आजच्या समाजात मुलींबद्दल हळूहळू सकारात्मक दृष्टीकोन तयार होत आहे. मुलींना त्यांचे संपूर्ण अधिकार मिळावे या दृष्टीने सरकार नेहमी प्रयत्नशील असते. आणि मुलींच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. अशीच सरकारची एक योजना आहे ‘बालिका समृद्धी योजना’ आज या लेखात ‘बालिका समृद्धी योजनेबद्दल’ तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. बालिका समृद्धी योजना म्हणजे काय? या योजनेची उद्दिष्टे, फायदे, वैशिष्ट्ये, योग्यता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी माहिती या लेखात देण्यात आलेली आहे. चला तर, मित्रांनो तुम्हाला ‘बालिका समृद्धी योजनेबद्दल’ संपूर्ण माहिती मिळवायची आहे तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

बालिका समृद्धी योजना

‘बालिका समृद्धी या योजनेअंतर्गत’ मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्यात सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर ५०० रुपयांची मदत दिली जाईल. यानंतर मुलगी दहावीपर्यंत पोहोचेपर्यंत तिला प्रत्येक वर्षी निश्चित स्वरूपाची एक रक्कम दिली जाईल.

मुलींच्या शिक्षणाला चालना आणि मुलींची प्रगती होण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. मुलगी १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर ती बँकेतून ही रक्कम काढू शकते. १५ ऑगस्ट १९९७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालिका किंवा मुली ‘बालिका समृद्धी योजनेचा’ लाभ घेऊ शकतात.

बालिका समृद्धी योजना शिष्यवृत्तीची रक्कम

पीएम बालिका समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलींना दरवर्षी त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार केंद्र सरकारकडून दरवर्षी शिष्यवृत्ती (आर्थिक मदत) दिली जाईल. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या बालिका समृद्धी योजनेअंतर्गत, इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल. ‘बालिका समृद्धी योजनेच्या’ माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती खालील प्रमाणे आहे –

वर्ग आणि शिष्यवृत्तीची रक्कम

  • इयत्ता १ ली ते ३ री - ३०० रु
  • इयत्ता ४ थी - ५०० रु
  • इयत्ता ५ वी - ६०० रु
  • इयत्ता ६ वी ते ७ वी - ७०० रु
  • इयत्ता ८ वी - ८०० रु
  • इयत्ता ९ वी ते १० वी - १००० रु

बालिका समृद्धी योजनेचा तपशील

  • योजनेचे नाव - बालिका समृद्धी योजना
  • योजना कोणी सुरू केली - भारत सरकार
  • लाभार्थी - देशातील मुली
  • उद्दिष्ट - मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
  • शिष्यवृत्तीची रक्कम - ३०० रु ते १००० रु
  • मंत्रालय - महिला व बाल कल्याण मंत्रालय

बालिका समृद्धी योजनेची उद्दिष्टे

  • दारिद्र रेषेखालील मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक मदत करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींबद्दलची लोकांची नकारात्मक विचारधारा ही सुधारेल आणि मुलींना शिक्षण घेताना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
  • बालिका समृद्धी योजना २०२४ च्या माध्यमातून मुलींच्या पालकांनाही त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

बालिका समृद्धी योजनेचे फायदे आणि वैशिष्टे

  • योजनेच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्यानंतर आणि तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मुलीला सरकार कडून आर्थिक मदत केली जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींबद्दलची नकारात्मक विचारधारणा सुधारेल.
  • मुलीच्या जन्मावर सरकार पाचशे रुपयांची आर्थिक मदत करेल.
  • मुलीचे शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण होईपर्यंत प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम दिली जाईल.
  • मुलगी मुलगी १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर सरकारने दिलेली रक्कम काढू शकते.
  • दारिद्र रेषेखालील कुटुंबातील, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
  • बालिका समृद्धी योजना २०२४ चा लाभ फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या मुलीच घेऊ शकतात.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म १५ ऑगस्ट १९९७ किंवा त्यानंतर झालेला असावा.
  • बालिका समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या पालकांनाही त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • जर लाभार्थी मुलीचा १८ बर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला, तरी खात्यात जमा असलेली रक्कम काढता येईल
  • मुलीचे वय १८ असण्यापूर्वीच लग्न झाल्यास, त्या मुलीला या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.

बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती

  • योजने अंतर्गत लाभार्थी मुलीच्या शिष्यवृत्तीची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डायरेक्ट मुलीच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.
  • जर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तीचे लग्न झाले तर, मुलीला शिष्यवृत्तीची रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज सोडून द्यावे लागेल. ती फक्त जन्मानंतरचे अनुदान आणि त्यावरील व्याज घेऊ शकते.
  • या योजनेचा लाभ फक्त अविवाहित मुलीच घेऊ शकतात. लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीला अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र नगरपालिका किंवा ग्रामपंचायत द्वारे दिले जाते.
  • शिष्यवृत्तीची रक्कम मुलींना गणवेश किंवा पाठ्यपुस्तके विकत घेण्यासाठी वापरली जाऊ शकते.
बालिका समृद्धी योजनेसाठी पात्रता
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेत फक्त मुलीच अर्ज करू शकतात.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुलगी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावी.
  • मुलीचा जन्म १५ ऑगस्ट १९९७ किंवा त्यानंतर झालेला असावा.
  • एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शीधा पत्रिका
  • जन्म प्रमाणपत्र
  • पालकांचे ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया.
  • बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जर, तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर, तुम्हाला सर्वप्रथम अंगणवाडी केंद्रात जावे लागेल. आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर, तुम्हाला सर्वप्रथम आरोग्य अधिकाऱ्याकडे जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून अर्ज घ्यावा लागेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि खरी माहिती भरायची आहे.
  • यानंतर अर्जात दिलेली व सर्व महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • यानंतर तो अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकता.
बालिका समृद्धी योजनेशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे

बालिका समृद्धी योजना २०२४ चा लाभ कोणत्या कुटुंबातील मुली घेऊ शकतात?

बालिका समृद्धी योजना २०२४ या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील किंवा गरीब कुटुंबातील मुली घेऊ शकतात.

बालिका समृद्धी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

सध्या तुम्ही बालिका समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. यासाठी तुम्ही गावातील किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता.

‘बालिका समृद्धी योजनेचा’ अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट काय आहे?

‘बालिका समृद्धी योजनेसाठी’ अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट अद्याप सुरू झालेली नाही. यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

‘बालिका समृद्धी योजने’ अंतर्गत मुलींना किती शिष्यवृत्ती दिली जाते?

‘बालिका समृद्धी योजनेअंतर्गत’ मुलींना ३०० रु ते १००० रु पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

मित्रांनो हा लेख तुमच्या मित्र, मैत्रीणींना आणि गरजवंत मुलींच्या पालकांना जरूर शेअर करा. जेणे करून त्यांना या योजनेची माहिती होउन, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत