Header Ads

Breaking News

घरबसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? विद्यार्थ्यांनी घरबसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे?

नमस्कार मित्रांनो तुम्ही घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग शोधत आहात का? तुम्ही घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग शोधत असाल तर, हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. आजच्या इंटरनेटच्या युगात कोणीही घरी बसून पैसे कमवू शकतो. मग तो विद्यार्थी असो, किंवा गृहिणी असो, इंटरनेटचे हे क्षेत्र सर्वांसाठी २४ तास खुले आहे. चला तर मग, जाणून घेऊया घरी बसून पैसे कसे कमवायचे?

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या ऑनलाईन नोकऱ्यांना खूपच लोकप्रियता मिळाली आहे. याचे कारण बहुतेक विद्यार्थी साइन इन्कम च्या शोधात आहेत. जेणेकरून ते त्यांचा वरचा खर्च, कॉलेजची फी, शैक्षणिक गरजा भागवु शकतील. अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून ऑनलाईन नोकरी सुरू करून, पुढे चालून या क्षेत्रात कायमस्वरूपी करिअर घडवता येते. कारण आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी अनेक ऑनलाइन जॉब्स उपलब्ध आहेत.

या लेखात विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवण्यासाठीच्या नोकऱ्यांची यादी दिलेली आहे. ज्या नोकऱ्या भारतात खूप लोकप्रिय आहेत आणि या नोकऱ्यांच्या माध्यमातून भारतातील लोक चांगल्या प्रमाणात ऑनलाइन पैसे कमवत आहेत. तुम्हाला या ऑनलाइन जॉब बद्दल जाणून घ्यायचे असल्यास हा लेख शेवटपर्यंत वाचा.

विध्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी नोकऱ्या

मित्रांनो जर तुम्ही साईड इन्कम करण्यासाठी एक जॉब शोधत असाल तर सुरुवातीला तुम्हाला फक्त एक कम्प्युटर किंवा तुमचा स्मार्टफोन आणि एका इंटरनेट कनेक्शन ची गरज आहे.

या लेखामध्ये खाली काही ऑनलाईन पैसे कमवण्याची कामे आणि नोकऱ्या दिलेल्या आहेत. यापैकी तुम्हाला जे सोपे किंवा चांगले वाटेल ते तुम्ही निवडू शकता.

ऑनलाइन शिकवणी

आज इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. ज्या ऑनलाइन ट्युशन घेतात. आणि यासाठी त्यांना एका चांगल्या टीचरची म्हणजे शिक्षकाची गरज असते. अशा साईट सोबत तुम्ही पार्ट टाइम काम करून चांगला इन्कम करू शकता.

आजच्या स्पर्धेच्या युगात टयूशनची गरज प्रत्येकालाच आहे. जर तुम्हाला कोणत्याही एका क्षेत्रात किंवा तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रात चांगले ज्ञान आहे, तर तेच ज्ञान दुसऱ्यांना शिकवून तुम्ही एक चांगले शिक्षक बनू शकता. आणि या संधीचा फायदा घेऊ शकता. बदलत्या काळामुळे आजकाल मुले आणि पालक दोघेही ऑनलाइन शिकवणीला प्राधान्य देत आहेत.

अशा अनेक वेबसाईट उपलब्ध आहे. जिथून तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेऊ शकता. अशात तुम्हाला शिकवण्यासाठी मुले शोधण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्ही ज्या साईट वरती नोंदणी करणार असाल, ती साईट तुम्हाला मुले उपलब्ध करून देणार आहे.

तुम्ही ऑनलाईन शिक्षकाची नोकरी फुल टाइम किंवा पार्ट टाइम अशा दोन्हीही प्रकारे करू शकता. अशा साइटवर कामाचे पेमेंट हे सामान्यतः हवरली असते. म्हणजेच तुम्ही जितके तास काम कराल त्या तासाच्या हिशोबावर तुम्हाला पैसे दिले जातात.

अशा अनेक साईट आहे. ज्या तुम्हाला ऑनलाईन ट्यूटर म्हणजे ऑफर देत असतात. त्यातील काही वेबसाईट खाली दिलेल्या आहेत –

CheggIndia

MeritNation

Vedantu

Vidhyalai

Learnpick

Teamlearn

Teaching Care

Bharat Tutors

Udemy

Unacademy

Plainmath

ग्राफीक्स डिज़ाइनिंग

सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. तुम्ही बघत असाल की कुठल्याही सोशल वेबसाईट किंवा एप्लीकेशनवर खूप मोठ्या प्रमाणावर जाहिराती असतात. कधी जाहिराती इमेज च्या स्वरूपात असतात तर, कधी फोटो ऍड असतात. मग तुम्ही कधी विचार विचार केलाय का? की हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आणि इमेजेस कोण बनवत असेल?

हे सर्व काम एक ग्राफिक डिझायनर करतो. ग्राफिक डिझायनरचे काम करण्यासाठी केवळ एक कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. सध्याच्या काळात जवळपास ९०% ग्राफिक डिझाईनर फ्रीलान्सिंगचे काम करीत आहेत. म्हणजेच ते घरी बसल्या – बसल्या पैसे कमावत आहेत.

कोणीही तरुण व्यक्ती या डिजिटल युगात अनेक कंपन्यांसोबत फ्रीलान्सिंगचे काम करून घरबसल्या हजारो रुपये महिन्याला कमवू शकतो. आजच्या आधुनिक युगात सर्वत्र तंत्रज्ञानाचा विस्तार वाढला आहे. आणि त्यामुळेच या क्षेत्रात कामाच्या आणि नोकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत.

तंत्रज्ञानामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे. याचा सर्वात मोठा फायदा जाहिरात करणाऱ्यांना आणि संपर्क संस्थांना झालेला आहे. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी ग्राफिकचा वापर करते. लोगो डिझाईन करणे असो, किंवा जाहिरात मोहीम तयार करणे असो, प्रत्येकालाच ग्राफिक डिझाईन चा अवलंब करावा लागतो.

जर तुम्ही क्रिएटिव असाल आणि तुम्हाला ग्राफिक डिझाईनिंगची आवड असेल. तर तुम्ही घरबसल्या काम करून ऑनलाईन महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. खाली काही फ्रीलान्सिंग ग्राफिक्स डिझाईनचे काम करण्यासाठी फ्रीलान्सिंग वेबसाईट दिलेल्या आहेत. यावर तुम्ही आपली प्रोफाईल बनवू शकता.

  • Fiver
  • Frelancer
  • Upwork
ऑनलाइन ट्रान्सक्रिप्शन जॉब

तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ पाहता आणि बऱ्याच वेळेस असे पाहिले असेल की, तो व्हिडिओ एका भाषेत असतो, आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत त्या व्हिडिओचा मजकूर खाली लिहून येत असतो.

जसे की, तुम्ही एखादा मराठी व्हिडिओ युट्युब वरती पाहत असाल, त्याचवेळी त्या व्हिडिओचा इंग्रजी मजकूर खाली येत असतो. एखाद्या ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात असलेली माहिती मजकूरात रूपांतरित करणे म्हणजे ट्रान्सस्क्रीप्शन होय.

तुम्ही ट्रान्स क्रिप्शन जॉब बद्दल ऐकले असेल, किंवा नाही. परंतु, अशा प्रकारचे जॉब करून अनेक लोक घरी बसल्या हजारो आणि लाखो रुपयांमध्ये पैसे कमावत आहेत. ट्रान्सक्रिप्शन करण्याचे काम खूप सोपे आहे. हे काम कोणताही विद्यार्थी गृहिणी आणि नोकरी करणारा व्यक्तीही पार्ट टाइम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो.

ट्रान्सक्रिप्शन म्हणून काम करण्यासाठी, तशी खूप काही गोष्टींची गरज नसते. पण खाली दिलेल्या गोष्टींची आवश्यकता असते.

तुमच्याकडे मोबाईल लॅपटॉप किंवा संगणक असणे आवश्यक आहे .
एक विश्वसनिय इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
ट्रान्सस्क्रीप्शन चे काम मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या ट्रान्सस्क्रीप्शन पोर्टलवर नोंदणी करून काम सुरू करू शकता. खाली काही वेबसाईटची यादी दिलेली आहे. ज्यावर तुम्ही नोंदणी करून ट्रान्सस्क्रीप्शनच्या कामातून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवू शकता.

Transcribeme.com
Castingwords.com
Rev.com
GMR Transcription Job
Transcription hub

 
शेअर ट्रेडींग –

मित्रांनो तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग करूनही पैसे कमावू शकता. जर तुमच्याकडे थोडे कॅपिटल असेल तर, तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून दिवसाला पाचशे ते हजार रुपये कमवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला शेअर मार्केटचे संपूर्ण ज्ञान घ्यावे लागेल. शेअर मार्केट तुम्ही यूटयूब वरूनही शिकू शकता. आणि गुगलवर अनेक वेबसाईट शेअर मार्केट बद्दल अपडेट देत असतात.

शेअर मार्केट मध्ये संपूर्ण आणि चांगले ज्ञान घेऊनच ट्रेडिंग करा. (शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग स्वतःच्या जिम्मेदारीवर करा).

ब्लॉगिंग

आजच्या काळात घरबसल्या पैसे कमवण्यासाठी आणि पूर्णवेळ करिअर घडवण्यासाठी ब्लॉगिंग हा सर्वात चांगला पर्याय आहे. अनेक लोक ब्लॉगिंगच्या माध्यमातून घरबसल्या हजारो रुपये कमवत आहेत. लोक आपला स्वतःचा ब्लॉग बनवून प्रत्येक गोष्टीविषयी माहिती देऊन घरबसल्या पैसे कमवत आहेत.

ब्लॉग ही अशी गोष्ट आहे की, ज्यातून तुम्ही फक्त चांगले पैसे कमवू शकत नाही. तर, ब्लॉगिंग फील्डमध्ये तुम्हाला रोज नवीन – नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. मी स्वतः बऱ्याच कारणांसाठी ब्लॉगिंग सुरू केले आहे. या क्षेत्रात पूर्ण वेळ करिअर घडवण्यासाठी आणि स्वतःकडे काही गोष्टीबद्दल असणारी माहिती. सर्व माहिती नसणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे माझे ध्येय आहे.

ब्लॉग नियमितपणे अपडेट केलेले वेबसाईट आणि वेब पेज असते. ब्लॉग सामान्यतः एकाद्या व्यक्तीने अनौपचारिक आणि संभाषणात्मक शैलीने लिहिलेला असतो. ब्लॉग हे एक व्यासपीठ आहे. ज्या ठिकाणी लेखक किंवा ब्लॉगर आपले विचार लिहून ऑनलाईन लोकापर्यंत पोहोचवू शकतात.

ब्लॉगिंग मधून पैसे कमावण्यासाठीचे सर्वात प्रचलित व लोकप्रिय असलेले तीन मार्ग आहेत ते खाली दिलेले आहेत.

Google Adsense
Affiliate Marketing
Sponsored Links

कंटेंट राइटिंग वर्क

कन्टेन्ट रायटिंग म्हणजे कुठल्याही विषयाची संबंधित आवश्यक माहिती लेखनाद्वारे देणे. कॉन्टेन्ट रायटिंग विविध प्रकारची असू शकते. जसे की, ब्लॉग लिहिणे यूट्यूब व्हिडिओ साठी स्क्रिप्ट लिहिणे, पॉडकास्टसाठी स्क्रिप्ट लिहिणे, वर्तमानपत्र किंवा मासिकांसाठी लेख लिहिणे इत्यादी.

डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा वाढता आलेख पाहता, लेखकांची मागणी वाढताना दिसत आहे. कॉन्टेन्ट रायटिंग एक क्रिएटिव फील्ड असल्यामुळे तुम्ही तुमच्या कलेच्या जोरावर जगात कोणत्याही क्षेत्रात सहज नोकरी मिळवू शकता. कारण चांगल्या लेखकांची सर्वत्र गरज असते.

आणि विशेष म्हणजे कॉन्टेन्ट रायटरला त्याचे काम करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. आज कंटेंट रायटर ऑनलाईन घरबसल्या त्याचे काम करू शकतो.

युट्यूब चॅनेल

इंटरनेटवर ऑनलाईन पैसे कमवण्याचा यूट्यूब हा एक सर्वात सोपा मार्ग आहे. आजच्या काळात युट्युब मनोरंजनासोबतच पैसे कमावण्यासाठीचे चांगले पर्याय देखील उपलब्ध करून देत आहेत. आणि बरेच लोक या संधीचा फायदा घेऊन, घर बसल्या यूटूब वरून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. यूटूब वरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला यूटूब वरती सर्वप्रथम चैनल तयार करावे लागेल. आणि असे कंटेंट तयार करावे लागेल, जे लोकांना आवडते.

डोमेन नेम खरेदी आणि विक्री.

हा व्यवसाय असा करावा लागतो, ज्यात आपल्याला डोमेन नेम स्वस्त किमतीत विकत घ्यावे लागते. आणि फायदेशीर किंवा जास्त किमती विकावी लागते.

या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक अतिशय सोपा व्यवसाय आहे. जो कष्ट न करता उद्योजकाला भरपूर पैसे मिळवून देऊ शकतो. चांगली डील मिळाल्यानंतर उद्योजकाला जर, त्याचे डोमेन नेम ताबडतोब विकायचे असेल तर, तो विकू शकतो. किंवा चांगला नफा मिळवण्यासाठी तो भविष्यासाठी होल्ड करून ठेवू शकतो.

स्वस्त दरात डोमेन खरेदी करणे आणि जास्त किमतीला विकणे याला डोमेन फ्लिपिंग व्यवसाय असे म्हणतात. डोमेन स्लीपिंग व्यवसाय करण्यासाठी चांगल्या आणि विश्वसनी वेबसाईट म्हणजे गो डॅडी आणि बिग रॉक या आहेत.

डोमेन खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाइट बद्दल बोलायचे झाल्यास, या वेबसाईट डोमेन खरेदीदार आणि विक्रीदार यांच्यामध्ये ब्रोकर म्हणून काम करतात.

मित्रांनो आम्हाला आशा आहे की, या लेखाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी घरी बसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? याबद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. हा लेख तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती होईल, घर बसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? आणि ते या संधीचा फायदा घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत