आम आदमी विमा योजना काय आहे? आम आदमी विमा योजने ची संपूर्ण माहिती
मित्रांनो आपल्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या असंघटीत क्षेत्रात कार्यरत आहे. त्यातही कमी उत्पन्न असलेल्या गटात काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा गटातील कर्मचारी त्यांच्या कमकुवत आर्थिक परिस्थिती मुळे विमा संरक्षण घेण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, दुर्दैवाने अशा कर्मचाऱ्यांचा अपघाती, दुःखापत, आजार किंवा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आघाताबरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागते.
आणि म्हणुनच असंघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने, भारत सरकार ने २ ऑक्टोबर २००७ रोजी आम आदमी विमा योजना (AAVY) सुरू केली.
देशातील कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील कमवत्या व्यक्तिच्या नैसर्गिक किंवा अपघाती निधनानंतर त्याच्या परिवाराला आर्थिक संरक्षण मिळते.
आमआदमी विमा योजनेचा तपशील
योजनेचे नाव - आम आदमी विमा योजना
योजनेचा प्रकार - केंद्र सरकार पुरस्कृत योजना
योजना कोणत्या प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे - सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू.
योजनेचा उद्देश - विमा संरक्षण
संपर्क कार्यालय - जिल्हाधिकारी कार्यालय /तहसिलदार संजय गांंधी योजना / तलाठी कार्यालय
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाइन
आम आदमी विमा योजना काय आहे?
आम आदमी विमा योजना (AAVY) ही केंद्र सरकार पुरस्कृत सामाजिक संरक्षण योजना आहे. ही योजना केंद्र सरकार द्वारे २ ऑक्टोबर २००७ रोजी सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या मृत्यु किंवा अपंगत्व यांसारख्या आकस्मिक परिस्थिती विरुद्ध त्याच्या कुटुंबाला आरोग्य विमा संरक्षण प्रदान केले जाते.
प्रामुख्याने, ग्रामिण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन शेत मजुरांना तसेच २.५ एकर पेक्षा कमी बागायती किंवा ५ एकर पेक्षा कमी जिरायती शेत जमीन धारण करणाऱ्यांना या योजने अंतर्गत विमा संरक्षण देण्यात येते.
या योजनेचा वाॅर्षिक विमा हप्ता रु २०० इतका आहे. त्या पैकी केंद्र सरकार मार्फत रु १०० तर, राज्य सरकार मार्फत रु १०० इतका विमा हप्ता भारतीय आयुर्विमा महा मंडळाला देण्यात येतो.
विमा योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप
या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे केवळ विमा संरक्षण एवढाच लाभ न देता, या योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु १०० प्रति महा, प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती ही देण्यात येते.
त्याचप्रमाणे, लाभार्थ्यासोबत काही अनैसर्गिक घटना घडल्यास लाभार्थ्याच्या वारसास / लाभार्थ्यास लाभाची रक्कम देण्यात येते.
या योजनेतुन मिळणाऱ्या लाभाची रक्कम खालील प्रमाणे आहे –
प्रकार आणि मूल्य
नैसर्गिक मृत्यू - ३०,००० रु
अपघाती मृत्यु - ७५,००० रु
अपघातामुळे कायमचे अपंगत्व - ७५,००० रु
अपघातामुळे दोन्ही डोळे व दोन्ही पाय गमावल्यास - ७५,००० रु
अपघातामुळे एक डोळा व एक पाय गमावल्यास - ३७,००० रु
आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी कोण आहे?
- भूमिहीन शेत मजुर
- ग्रामिण भागातील कामगार
- अल्प भूधारक शेतकरी
- ग्रामिण भागातील मच्छीमार
- ग्रामिण भागातील हस्तकला कारागीर
- ग्रामिण भागातील विणकाम कारागीर
त्याच प्रमाणे शहरी भागातील पूढिल मजुरांसाठी ही योजना लागू आहे
- स्ट्रीट वैंडर्स
- कचरा उचलणारे मजुर
- स्वच्छता कामगार इत्यादी
आम आदमी विमा योजनेची उद्दिष्टे
- ग्रामीण भागातील शेतमजूर तसेच भूमिहीन गटातील लोकांना विमा संरक्षण पुरवणे.
- अशा लाभार्थ्यांच्या नववी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या दोन मुलांना दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती देणे.
हे आम आदमी विमा संरक्षण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून अशा कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती सुधारेल.
आम आदमी विमा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर – अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा.
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- फोटो अकरा चा फोटो
- वय प्रमाणपत्र
- बँक डिटेल्स
- व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी
आम आदमी विमा योजनेसाठी पात्रता
- अर्जदार कुटुंबाचा प्रमुख असावा, त्याचप्रमाणे तो कुटुंबातील कमावणारा एकमेव सदस्य असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ५९ या वयोगटातील असावे.
- अर्जदार दारिद्र्यरेशे खालील किंवा दारिद्ररेषेच्या किंचित वरचा असावा.
- अर्जदार व्यक्ती हा ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा अल्पभूधारक असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील केवळ एक सदस्य या योजनेत सहभागी होऊ शकतो.
आम आदमी विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुमच्या मित्र मैत्रीणींना जरूर शेअर करा, जेणे करून ते या योजनेस पात्र असल्यास योजनेचा लाभ घेऊ शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत