Header Ads

Breaking News

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती.

भारतात विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात. देशात शांतता आणि सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी सर्व जातीय भेदभाव बाजूला सारून सर्व जाती आणि धर्मांनी एकत्र सालोख्याने राहिले पाहिजे.

राज्यातील लोकांमध्ये जातीय सलोखा प्रस्थापित व्हावा या दृष्टीने राज्य सरकारने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत पहिले आंतरजातीय विवाहाच्या लाभार्थी जोडप्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात येत होती. जी रक्कम या वर्षी राज्य सरकारने वाढवून तीन लाख रुपये केली आहे.

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत, जोडप्यातील जोडीदारांपैकी एक अनुसूचित जातीतील (दलीत) असेल तर, त्यांना आता प्रोत्साहन पर रक्कम म्हणून ३ लाख रुपये मिळतील.

महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह योजना

महाराष्ट्र राज्यातील एखाद्या सामान्य प्रवर्गातील मुलाने किंवा मुलींने एखाद्या अनुसूचित जातीतील प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीशी विवाह केल्यास या जोडप्याला तीन लाख रुपये प्रोत्साहन रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. केवळ महाराष्ट्रातील ज्या जोडप्यांनी हिंदू विवाह कायदा, १९५५, किंवा विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत आपले विवाह नोंदणीकृत केले आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

लाभार्थी जोडप्यांना यांना देण्यात येणारा निधी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२३ अंतर्गत देण्यात येईल. ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार दोन्हींकडून ५० – ५० % टक्के देण्यात येणार आहे.

या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.

आंतरजातीय विवाह योजनेचा उद्देश

आपल्या देशात पूर्वीपासूनच जातींच्या आधारे खूप मोठा भेदभाव केला जातो. हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु हा भेदभाव कमी करण्यासाठी सरकार बऱ्याच वेळा विविध योजना राबवत असते आणि काही कार्यक्रमही राबवत असते. यातीलच एक योजना म्हणजे आंतरजातीय विवाह योजना आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून तीन लाखांपर्यंत प्रोत्साहन पर रक्कम दिली जाईल.

आंतरजातीय विवाह योजनेचा तपशील

योजनेचे नावअंतर्जातीय विवाह योजना महाराष्ट्र
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील अंतर्जातीय विवाह करणारे जोडपे
अधिकृतसंकेत स्थळsjsa.maharashtra.gov.in

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेत लाभार्थ्याला एकूण तीन लाख रुपये सरकारी मदत मिळणार आहे. ज्यामध्ये राज्य सरकारकडून ५० हजार रुपये आणि डॉ. आंबेडकर फाउंडेशन कडून अडीच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना २०२३ द्वारे राज्यातील सर्व जातींमधील भेदभाव कमी करून, सर्व धर्मांमध्ये समानता आणण्याचा सरकारचा उद्देश आहे.
  • या योजनेचा लाभ त्याच जोडप्यांना दिला जाईल, ज्या जोडप्यांमध्ये जोडीदारांपैकी एक जण अनुसूचित जाती किंवा जमातीतील असेल.
  • महाराष्ट्र राज्य आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
  • त्यामुळे लाभार्थ्यांचे बँक खाते असावे व बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
  • या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रद्द करण्यात आलेली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. 

आंतरजातीय विवाह योजनेसाठी पात्रता

  • आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे .
  • अंतर्जातीय विवाह या योजनेचा लाभासाठी पात्र असण्यासाठी मुलगा आणि मुलगी यांचे लग्न होण्याच्या वेळेला वय अनुक्रमे २१ आणि १८ वर्षे पेक्षा कमी नसावे.
  • महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित जोडव्यापैकी एक जण किंवा कोणत्याही सर्वसामान्य प्रवर्गातील मुलगा किंवा मुलींनी अनुसूचित जाती किंवा जमातीतील मुलगा किंवा मुलीशी लग्न केलेले असावे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या रकमेचा लाभ घेण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील कोणताही मुलगा किंवा मुलीने अनुसूचित जाती जमातीतील मुलगी किंवा मुलाशी लग्न केले असेल तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • बँकपास बुक
  • जात प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • न्यायालयीन विवाह प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना 2023 साठी अर्ज कसा करावा.

  • सर्वप्रथम अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुखपृष्ठ आपल्यापुढे उघडेल.
  • या होम पेजवर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजनेचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढले पेज उघडेल.
  • या पृष्ठावर नोंदणी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, लग्नाची तारीख, आधार कार्ड नंबर व इतर विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. अशाप्रकारे तुमची ऑनलाईन, आंतरजातीय विवाह योजनेत नोंदणी होईल.

अंतर्जातीय विवाह योजने संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे

अंतर्जातीय विवाह योजने अंतर्गत विवाह केल्यास किती पैसे मिळतात?

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत विवाह केल्यास केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे दोन्हीकडून तीन लाख रुपयांची रक्कम मिळते.

आंतरजातीय विवाह योजना काय आहे?

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाह योजना सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत