‘पीेएम ई बस सेवा योजना’ काय आहे? ‘पीेएम ई बस सेवा योजनेसाठी’ पात्रता काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती.
मित्रांनो मोदी सरकारकडून देशाच्या विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि पर्यावरणासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या जात आहेत. याचप्रमाणे देशात आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक अनोखी योजना सुरू केली आहे. या योजनेला सरकारने ‘प्रधानमंत्री ई बस सेवा योजना’ असे नाव दिले आहे.
या योजनेअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये ‘पीएम ई बस’ सुरू करण्यात येणार आहे, या लेखात तुम्हाला ‘पीएम ई बस सेवा योजना’ काय आहे? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? ‘पीएम ई बस सेवा योजनेचा’ लाभ कसा घ्यायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
पीएमई बस सेवा योजनेचा तपशील
| योजनेचे नाव | ‘प्रधानमंत्री ई बस सेवा योजना’ |
| योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
| लाभार्थी | देशातील नागरिक |
| उद्दिष्ट | इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे |
| वाटप रक्कम | ५७,६१३ कोटी रुपये |
| अर्ज प्रक्रिया | अजून सुरू झालेली नाही |
| अधिकृत संकेतस्थळ | अजून सुरू झालेले नाही |
पीेएम ई बस सेवा योजना 2024 काय आहे?
या योजनेद्वारे देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार या योजनेवर काम करत आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशभरातील विविध राज्यातील, विविध ठिकाणी इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहे. सरकारकडून असे सांगण्यात आली आहे की, या योजनेअंतर्गत देशभरातील विविध शहरांमध्ये जलद बस वाहतूक, आणि बाईक शेअरिंग आणि सायकल लेन देखील बांधल्या जातील. जेणेकरून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळू शकेल.
पीएम ई बस सेवा योजनेचे उद्दिष्ट
योजनेचे मुख्य उद्दिष्ट सांगायचे झाल्यास या योजनेअंतर्गत ज्या शहरांमध्ये चांगली बस सेवा उपलब्ध नाही. त्या शहरांमध्ये चांगली बस सेवा उपलब्ध करून देण्याचा आणि त्या शहरांमध्ये चांगल्या व इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ही योजना २०३७ पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेचे दोन भाग आहेत – १६९ शहरांमध्ये शहर बस सेवा वाढवण्याचे उद्दिष्ट आणि १८१ शहरांमध्ये ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे.
या योजनेअंतर्गत ०३ लाख ते ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येही बसेस उपलब्ध करून देण्याचे धेय ठेवण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात शंभरहून अधिक शहरांची निवड केली जाईल आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत सुमारे १०,००० इलेक्ट्रॉनिक बसेस सुरू केल्या जातील
पीएम ई बस सेवा योजनेचे बजेट
अर्थसंकल्पातील बजेट बद्दल बोलायचे झाल्यास, सरकारने या योजनेसाठी ५७,६१३ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. यातील २०,००० कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत तर, बाकीचे उरलेले सर्व बजेट राज्य सरकार देणार आहे.
‘पीएम ई बस सेवेची’ किंमत
‘पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत’ चालणाऱ्या पीएम ई बसेसच्या भाड्याची किंमत अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही, मात्र या बसचे भाडे पेट्रोल, डिझेल आणि सिटी बस प्रमाणेच असेल, अशी अपेक्षा आहे.
‘पीएम ई बस सेवा योजनेचे’ फायदे आणि वैशिष्टे
- या योजनेद्वारे सरकार देशातील विविध शहरांमध्ये दहा हजार इलेक्ट्रिक बस चालवणार असून, त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होणार आहे.
- या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील १६९ शहरांमध्ये दहा हजार ईलेक्ट्रिक बसेस चालवलेल्या जाणार आहेत.
- इलेक्ट्रॉनिक वाहने चालवण्यामुळे देशातील वातावरणात मिसळणाऱ्या हवा प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी होणार आहे.
- या योजनेमुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी होऊन भारताच परकीय कर्जही कमी होण्यास मदत होईल.
- देशात ज्या शहरांची लोकसंख्या तीन लाख किंवा त्यापेक्षाही अधिक आहे. अशा शहरांना या योजनेत समाविष्ट करण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे.
- सरकारने असे देखील म्हटले आहे की, यु टी एस आणि डोंगराळ राज्यातील राजधानीची सर्व शहरे या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून देशातील १६९ शहरांमध्ये बसच्या संचालनात सुधारणा करण्याचे काम केले जाईल.
- आणि त्याचवेळी सरकार देशातील १८१ शहरांमध्ये ही बसेस चालवणार आहे.
- या योजनेअंतर्गत देशातील जवळपास ५५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होणार आहे.
‘पीएम ई बस सेवा योजनेसाठी’ पात्रता
भारतीय रहिवासी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. पीएम ई बस सेवा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. या योजनेत अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाहतूक नियमांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
‘पीएम ई बस सेवा योजनेसाठी’ आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळख पत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाइल नंबर
- बँक खाते विवरण
- पासपोर्ट आकाराचा फोटो
‘पीएम ई बस सेवा योजनेसाठी’ अर्ज कसा करायचा
मित्रांनो आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की, सरकारने जरी या योजनेची घोषणा केलेली असली तरी, या योजनेत अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याची कोणती माहिती अद्याप पर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. जशी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची माहिती जाहीर केली जाईल तशी, सर्वप्रथम या लेखात समाविष्ट केली जाईल.
‘पीेएम ई बस सेवा योजने’ संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे
पीएम ई बस सेवा योजना काय आहे?
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील विविध शहरांमध्ये ई बसेस चालवल्या जाणार आहेत.
पीएम ई बस सेवा योजनेचे बजेट किती आहे?
पीेएम ई सेवा या योजनेचे बजेट ५७ हजार ६१३ कोटी रुपये एवढे आहे.
पंतप्रधान ई बस सेवा ही योजना कोणी सुरू केली?
पंतप्रधान ई बस सेवा योजना केंद्र सरकारने सुरू केली.
पीएम ई बस सेवा या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत