बिज भांडवल योजना काय आहे? महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज, जानून घ्या संपूर्ण माहिती.
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक मदत करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रम सुरू केलेले आहेत.
जेणेकरून त्यांची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती साध्य होईल, आणि ते मुख्य प्रवाहात येतील.
आजच्या पोस्ट मध्ये आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
आजच्या या लेखामध्ये बीज भांडवल योजनेबद्दलची संपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहेत. त्यामुळे बीज भांडवल योजना कशी काम करते? बीज भांडवल योजना कोणत्या तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देते? बीज भांडवल योजना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयतर्फे राबवली जाते? बीज भांडवल योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? बीज भांडवल योजनेची पात्रता काय आहे? या सर्वांबद्दलची माहिती तुम्हाला या लेखात देणार आहोत त्या त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
बिज भांडवल योजनेचा तपशील
| योजनेचे नाव | बिज भांडवल योजना २५% बिज भांडवल रु २५,००० हजार थेट कर्ज. |
| योजनेचा प्रकार | राज्य शासन योजना |
| योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे. | विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग. |
| योजनेचा उद्देश | रोजगार निर्मिती / आर्थिक प्रगती |
| संपर्क कार्यालयाचे नाव | वसंतराव नाईक भटक्या जाती व विमुक्त जमाती (मर्यादित) मुख्यालय : जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस, रोड नं ९, जे. व्हि. पी. डी स्कीम, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई – ४०० ०४९ |
| अर्जकरण्याची पद्धत | ऑफलाइन |
| संपर्क कार्यालयाचे नाव | वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ. |
बीज भांडवल योजना काय आहे?
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी सवलतीच्या व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे, आणि आर्थिक सहाय्य करणे.
जेणेकरून या समूहांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकेल आणि ते मुख्य प्रवाहात येण्यास मदत मिळेल. ही योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे चालवण्यात येते.
या योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते
१) २५% बिज भांडवल योजना – या प्रकारात अर्जदाराला पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
यामध्ये बँकेचा सहभाग ७५% असतो आणि वसंतराव नाईक भटक्या जाती व विमुक्त जमाती विकास महामंडळाच्या सहभाग २५% असतो.
२) २५,००० रु थेट कर्ज योजना – या प्रकारात महामंडळातर्फे २५,००० रुपयांचे थेट कर्ज अर्जदाराला उपलब्ध करून दिले जाते.
या दोन्ही प्रकारांच्या तपशील खालील प्रमाणे आहे
| २५% बिज भांडवल योजना | २५,००० हजार थेट कर्ज योजना | |
| प्रकल्प मर्यादा | ५,००,००० रु | २५,००० रु |
| बँकेचा सहभाग | ७५% | नाही |
| महामंडळाचा सहभाग | २५% | १००% |
| व्याज दर | ४% | २% |
| परतफेड कालावधी | ५ बर्षे | ४ बर्षे |
बिज भांडवल योजनेचे उद्दिष्ट
विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या प्रकारचे अर्थसहाय्य मिळून या प्रवर्गातील मागासलेली लोक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगती पथावर येऊन मुख्य प्रवाहात शामिल होतील. आणि त्यांची प्रगती करणे शक्य होईल, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
बिज भांडवल योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत अर्जदाराला पाच लाखांपर्यंत चे कर्ज केवळ चार टक्के व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाते .
- पंचवीस हजार रुपयांचे थेट कर्ज केवळ दोन टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते
- अशाप्रकारे सवलतीच्या दरात कर्ज मिळाल्याने या विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील तरुणांमध्ये रोजगार निर्मिती करणे शक्य होईल. आणि या समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होईल.
बीज भांडवल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- वाहन परवाना (ऑटो रिक्षा साठी)
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाइल नंबर – अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- २ जमींदारांनी कागदपत्रे इत्यादी.
बीज भांडवल योजनेसाठी पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असायला हवा.
- अर्जदार केवळ विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ४५ दरम्यान असावे.
बीज भांडवल योजनेच्या प्रमुख अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय, निम शासकीय किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज थकीत असू नये.
राज्य महामंडळाच्या योजनांकरिता शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न रु १,००,००० आणि केंद्रीय महामंडळाच्या योजना करिता शहरी भागा करिता १,२०,००० तर, ग्रामिण भागाकरीता ९८,००० पर्यंत असावे.
या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त शासकीय उपक्रमातून लाभार्थ्याला लाभ घेता येणार नाही. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला, एकदाच कर्ज मिळेल .
बीज भांडवल योजनेसाठी अर्ज कसा करावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळ या ठिकाणी अर्ज करावा लागेल.
अर्जदाराने अर्ज संपूर्ण भरावा, अर्जात कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये. अर्ज दोन प्रतीत भरून आपले दोन पासपोर्ट फोटो दोन्ही अर्जावर लावून अर्ज सादर करावे.
या अर्जासोबतच महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक राहील.
सोबतच माहिती दरपत्रक, कच्चा माल कसा तयार होणार व तयार माल कसा विकणार आणि आपल्या व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
तसेच अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रांची सत्यप्रत सोबत ठेवणे आवश्यक राहील.
मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या बीज भांडवल या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे, आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि या लेखाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना या कर्ज योजनेची माहिती होऊन ते योजनेचा लाभ घेऊ शकतील. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत