प्रधानमंत्री उज्वला योजना काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती| PM Ujwala Yojana In Marathi|
PM Ujwala Gas Yojana Information In Marathi : मित्रांनो, आजही आपल्या भारत देशात असे बरेच दुर्गy भाग आणि गावे आहेत. जिथे स्वयंपाकासाठी गॅसचा उपयोग होत नाही किंवा तेथील लोक त्यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ परिस्थितीमुळे स्वयंपाकासाठी गॅस विकत घेऊ शकत नाहीत. किंबहुना त्यांच्या गावात तो अजूनही उपलब्ध झालेला नाही.
अशा परिस्थित अशा दुर्गम आणि ग्रामीण भागातील स्त्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनातील स्वयंपाक आणि इतर गोष्टी या चुलीवरच करतात. यासाठी त्यांना दररोज दूरवर रानावनात जाऊन लाकडे गोळा करून आणावे लागतात.
याचा दुष्परिणाम असा असा होतो की, घरगुती कामासाठी आणि जाळण्यासाठी लाकडांची तोड केली जाते. शिवाय चुलीमधून निघणारा धूर आरोग्यासाठी आणि मानवी डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने दुर्गम भागातील आणि ग्रामीण भागातील लोकांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री उज्वला योजना’ (PM Ujwala Yojana 2024) ची सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एपीएल, बीपीएल आणि शिधापत्रिकाधारक महिलांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करून दिला जाईल.
‘प्रधानमंत्री उज्वला योजना’ काय आहे? PM Ujwala Yojana In Marathi|
मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की, फक्त काही वर्षांपूर्वी भारतातील संपूर्ण खेड्यापाड्यांमध्ये फक्त आणि फक्त चुलीवरच स्वयंपाक केला जात होता. या चुलींमधून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असे. आणि या परिणामामुळे महिलांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत होता.
आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांमध्ये लाकुड, शेणाच्या गौऱ्या यासारख्या गोष्टी इंधन म्हणून स्वयंपाकासाठी वापरल्या जातात. त्यातून निघणार धूर अनेक आजारांचे मुळ आहे. अशा गरीब कुटुंबांकडे कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठीही पैसे नसतात.
या समस्येतून गरिब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांची सुटका करण्यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री उज्वला योजना २०२४’ ची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ०१ मे २०१६ रोजी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस मोफत, कोणत्याही शुल्का विना पोहोचवला जातो.
या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या बीपीएलधारक कुटुंबांना लाभ दिला जातो. या योजनेची सुरुवात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून केली होती.
ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर १,६०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. जेणेकरून लाभार्थी इतर आवश्यक गोष्टीही खरेदी करू शकतील.
त्याचप्रमाणे गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी देखील सरकार ईएमआय सुविधा उपलब्ध करून देते. आणि या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दरवेळेला नवीन गॅस सिलेंडर घेताना. त्यावर सरकारकडून सबसिडी दिली जाते. जेणेकरून महिला फक्त गॅसचा वापर करतील.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा तपशील| PM Ujwala Gas Yojana Detailed Information In Marathi|
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना |
| योजना कधीपासून सुरू झाली | १ मे २०१६ |
| योजनेचा प्रकार | केंद्र सरकार योजना |
| डिपार्टमेंट | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय |
| उद्दिष्ट | आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देणे. |
| लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
| अधिकृत वेबसाइट | www.pmuy.gov.in |
| टोल फ्री क्रमांक | 1800266669 |
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे मुख्य मुद्दे
- भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांची इंधनाची समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात केली आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणारे १,६०० रुपये थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंब घेऊ शकतात.
- आतापर्यंत सुमारे ८ कोटी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आणि या योजनेची वाढती मागणी पाहता या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे.
- प्रत्येकी १४.२ किलोचे तीन सिलेंडर वर्षभरात सरकारकडून मोफत दिले जातात.
- जर कोणी बीपीएल कार्डधारक नागरिक प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत पहिल्यांदाच गॅस किंवा शेगडी खरेदी करत असेल, तर त्याला ईएमआयची सुविधाप्रदान केली जाते.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे उद्दिष्ट
- भारतातील ग्रामीण भागात पूर्वी स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळसा किंवा शेणाच्या गौऱ्या जाळल्या जायच्या. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात दूर तयार व्हायचा. या धुरामुळे स्वयंपाक घरात काम करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असे, सोबतच प्रदूषणाचे प्रमाण हे वाढत असे.
- त्याचप्रमाणे इंधनासाठी लाकूडतोडे मोठ्या प्रमाणात व्हायची, याचे वातावरणावर दुष्परिणाम होत असे, या सर्व समस्या लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली स्वच्छ इंधनाच्या वापरावर भर देत ‘पंतप्रधान उज्वला योजनेची’ सुरुवात केली.
- या योजनेचा मुख्य उद्देश भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात ज्या ठिकाणी आजही स्वयंपाकासाठी लाकडी कोळशाचा आणि शेणाच्या गौऱ्यांचा वापर केला जातो. त्या ठिकाणी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करून देणे. आणि स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना देणे हा आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत येणारे लाभार्थी
- SECC २०११ अन्तर्गत येणारे सर्व लोक.
- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सर्व एससी /एसटी कुटुंबातील लोक.
- दारिद्र्यरेषेखालील लोक.
- अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेले लोक.
- वनवासी लोक.
- चहा आणि पुच चहा बागायत जमात.
- बेटांवर राहणारे लोक.
- नदीच्या बेटांवर राहणारे लोक.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे| PM Ujwala Yojana Benefits|
- पूर्वी चुलीवर लाकडे जाळून स्वयंपाक केल्यामुळे धुराचे प्रमाण खूप वाढून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागत असत. परंतु या योजनेमुळे महिलांना या परिणामांपासून सुटका मिळणार आहे.
- लाकडे आणि शेणाच्या गौऱ्या जाळल्यामुळे धुराचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढत वाढत होते. परंतु या योजनेमुळे आता प्रदूषणाच्या वाढण्याला अळ बसणार आहे.
- या योजनेचा लाभ दारीद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळत असल्याने त्या कुटुंबातील महिला सुखी झाल्या आहेत.
- या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्रता| PM Ujwala Yojana Benefits|
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असावा.
- अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे आधीपासून कोणत्याही प्रकारचे एलपीजी कनेक्शन नसावे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| PM Ujwala Yojana IMP Documents|
- बीपीएल प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत्र (आधार किंवा मतदान प्रमाणपत्र)
- बीपीएल रेशन कार्ड
- कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार कार्ड क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पत्त्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
पंतप्रधान उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा| PM Ujwala Yojana Registration|
- पंतप्रधान उज्वला योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून मिळेल.
- यानंतर या अर्जामध्ये आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर किंवा इतर विचारलेली संपूर्ण माहिती योग्य रीत्या भरा.
- यानंतर अर्जासोबत तुमची आवश्यक कागदपत्रे जोडा आणि तुमच्या जवळचे गॅस एजन्सी मध्ये जाऊन सबमिट करा.
- गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्याने तुमचा अर्ज आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, तुमची एलपीजी कनेक्शन १० ते १५ दिवसांच्या आत जारी केले जाईल.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा| PM Ujwala Yojana Online Registration|
- प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- आता तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
- होम पेजवर तुम्हाला Apply For PMUY Connection या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीन मध्ये तीन पर्याय दिसतील.
- या तिन्ही पर्यायांमधून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर तुम्हाला वितरकाचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि इतर विचारलेली संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरायची आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे सर्व योग्य कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- आता तुम्हाला ‘Apply’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
अशाप्रकारे तुम्ही पंतप्रधान उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
मित्रांनो, पंतप्रधान उज्वला योजनेच्या माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्या सर्वांना या योजनेची माहिती होऊन त्यांना गरज असेल, तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत