सोलर रुफटॉप सब्सिडी योजना काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती| Solar Rooftop Subsidy Scheme In Marathi|
मित्रांनो, सध्या ज्या वेगाने मानव स्वतःच्या उपयोगासाठी पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करत आहे, त्या अर्थाने पृथ्वीवर लवकरच या पारंपारिक स्रोतांची समाप्ती होईल असे मानले जात आहे. त्यामुळे वेळीच जर, आपण सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याची सवय करून घेतली तर ते आपल्या भविष्यासाठी योग्य राहील.
सौर ऊर्जा म्हणजे, सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि उष्णता यांचा वापर करून मानवाला उपयोगी होईल अशा स्वरूपात तयार केलेली ऊर्जा म्हणजेच सौर ऊर्जा होय. सौर ऊर्जा हा पृथ्वीसाठी एक भरवशाचा ऊर्जा स्त्रोत आहे. ज्याच्या वापरामुळे वायू मंडळातील वातावरणात प्रदूषणाचे प्रमाण वाढत नाही.
भारत सरकारने देखील देशात सौर ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी सरकारने, एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे, ‘सोलर रूफटॉप सबसिडी योजना’ (Solar Rooftop Subsidy Yojana In Marathi) जेणेकरून देशातील अधिकाधिक लोक सौर पॅनल स्थापित करून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील.
या योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना त्यांच्या घराच्या छतावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सौर पॅनल बसवायचे आहेत. त्यांना सरकार सौर पॅनल बसवू ण्यावर अनुदान देत आहे. सोलर रुफटॉप सबसिडी योजना काय आहे? आणि या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, तसेच योजनेअंतर्गत कोणकोणते फायदे देशातील नागरिकांना होणार आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा तपशील| Solar Rooftop Subsidy Yojana In Marathi|
| योजनेचे नाव | सोलर रुफटॉप सब्सीडी योजना |
| योजना कोणी सुरू केली | उर्जा मंत्रालय |
| लाभार्थी | भारताचे नागरिक |
| वर्ष | २०२४ |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
| उद्दिष्ट | देशात सौर ऊर्जेला चालना देणे. |
| अधिकृत वेबसाइट | Solarrooftop.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 1800-180-3333 |
सोलर रुफटॉप सब्सीडी योजना काय आहे? Solar Rooftop Subsidy Scheme In Marathi|
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने सौर रुफटॉप सबसिडी योजनेची सुरुवात केली आहे. योजनेच्या नावावरूनच असे दिसते दिसत आहे की, या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि सौरऊर्जेचे पॅनल आपल्या घरावरील छतावर बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाईल.
देशात विजेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप मोठा आर्थिक तान सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत देण्यात येणारे सोलर मध्यमवर्गीय कुटुंबांचा विजेसाठी लागणारा पैसा वाचवणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वसामान्य कुटुंबांसाठी कल्याणकारी आहे.
आजच्या काळात भारत सरकार बरोबरच लोकांनाही विजेचा स्वस्त पर्याय हवा आहे. जेणेकरून लोकांचे पैसे वाचतील आणि पारंपारिक ऊर्जा संसाधनांचाही अपव्यय होणार नाही, त्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशात सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर ही सरकार भर देत आहे. या योजनेअंतर्गत ज्यांना, त्यांच्या घरी किंवा छतावर सौर पॅनल बसवायचे आहे, अशा लोकांना शासन अनुदान देणार आहे. आणि या अनुदानाच्या माध्यमातून लोकांना सौर पॅनल उपलब्ध होणार आहेत. या योजनेअंतर्गत सरकार तीन किलोच्या सौर रुफटॉप पॅनलच्या स्थापनेवर ४०% सब्सीडी आणि ३ किलोवैट पासुन ते १० किलोवैट पर्यंत २०% अनुदान देईल.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचे उद्दिष्ट
केंद्र सरकारच्या ‘सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेचा’ मुख्य उद्देश देशात सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे. आणि अधिकाधिक नागरिकांच्या घराची छतावर सौर पॅनल बसवण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा आहे. जेणेकरून देशातील नागरिकांचे विजेवरील अवलंबत्व कमी होईल. या योजनेचे परिणामकारकतेमुळे सरकारचे तसेच देशातील नागरिकांचे विजेवरील अवलंबत्व कमी होणार आहे.
कारण सरकार आणि लोक त्यांचे महत्त्वाचे कामासाठी सौर ऊर्जेचा वापर करतील. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यासाठी जास्त जागेची गरज नाही. या योजनेच्या अवलंबत्वामुळे जनरेटरचा वापरही कमी होईल, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमी होण्यास मदत होणार आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सौर ऊर्जेचा वापर नागरिकांना कमीत कमी खर्चात करतात येणार आहे. त्यामुळे नागरिकांवरील आर्थिक तान कमी होणार आहे.
सोलर रुफटॉप सब्सीडी योजनेचे फायदे| Solar Rooftop Subsidy Scheme Benefits|
- या योजनेअंतर्गत जमीनीत बसवण्यात येणारे सोलर पॅनल जास्त जागा घेणार नाहीत. त्यामुळे जमिनीची मोठी बचत होणार आहे. याशिवाय कामही सहज करता येते. त्यामुळे ग्राहकाला ग्रीड पॉवरवर अवलंबून राहण्याची कोणत्याही प्रकारची गरज भासणार नाही.
- ही योजना सुरू झाल्यामुळे लोक डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापरही कमी करतील. जेणेकरून डिझेलचा वापर डिझेलचा वापर कमी होऊन. वायु प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
- जे लोक व्यवसाय चालवतात आणि ज्या लोकांच्या व्यवसायाला विजेची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते त्या लोकांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. कारण या योजनेतून मिळणारी वीज ही स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. जेणेकरून विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकार येत्या ५ वर्षात ६०० कोटी ते ५,००० कोटी रुपये खर्च करणार आहे.
- या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनल मुळे कार्बन उत्सर्जन कमी करता येऊ शकते. ज्यामुळे जागतिक तापमान वाढ कमी होण्यासही मोठी मदत होणार आहे.
- या योजनेचा लाभ नागरिकांना घरीबसल्या मिळू शकतो. कारण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेसाठी पात्रता| Solar Rooftop Subsidy Scheme Eligibility|
- भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे 18 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट असलेले लोकच या योजनेसाठी पात्र असतील.
सौर रूफटॉप सब्सिडी योजनेसाठी कागदपत्रे| Solar Rooftop Scheme Documents|
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- इतर आवश्यक कागदपत्रे
सौर रुफटॉप सब्सिडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज| Solar Rooftop Subsidy Scheme Online Registration|
- सौर रुफटॉप सबसिडी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने सर्वप्रथम राष्ट्रीय अधिकृत पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.
- तुम्ही या अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला एक सूची दिसेल, या सूचीमध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर तुम्हाला ती कंपनी निवडायची आहे, ज्या कंपनीद्वारे सौर पॅनल ची ग्राहक सुविधा वितरित केली जात आहे.
- यानंतर तुम्हाला ग्राहक खाते क्रमांक निवडावा लागेल, जो तुम्हाला छतावर सौर पॅनल बसवायचा आहे, त्या पत्त्याच्या वीज बिलाचा ग्राहक खाते क्रमांक आहे.
- यानंतर तुम्हाला ‘नेक्स्ट’ पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ‘Sandesh App QR Code’ नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ते ॲप्लिकेशन उघडायचे आहे. आणि रिकाम्या जागेवर तुमचा फोन नंबर टाकून, ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या फोन नंबर मध्ये येणारा ओटीपी इंटर ओटीपी या बॉक्समध्ये टाकून सत्यापित करायचा आहे.
- अशाप्रकारे तुमची सोलर रुपटॉप सबसिडी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मित्रांनो, ‘सोलर रुपटॉप सबसिडी योजनेच्या’ (Solar rooptop Yojana In Marathi) माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्यांना सर्वांना या योजनेची माहिती मिळवून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत