महाराष्ट्र सरकार योजना 2024| Maharashtra Government Schemes 2024|
मित्रांनो, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक तसेच अपंग असलेले लोक, विधवा स्त्रिया, युवा, विद्यार्थी यांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी महाराष्ट्र सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते, तसेच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठीही विविध प्रकारच्या योजना राबवत असते.
या राबवलेल्या योजनांमुळे ज्या लोकांना गरज असते, त्या लोकांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवन सुधारत असते. आणि त्यामुळे आपल्या राज्याची प्रगती होत असते. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये सुरू केलेल्या संपूर्ण योजनांची माहिती घेणे गरजेचे आहे. आणि तुम्ही या योजनांचा लाभही घेऊ शकता. आजच्या या लेखात आम्ही महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र सरकार योजना २०२४ (Maharashtra Government Schemes 2024) सर्व योजनांची माहिती देणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
वसंतराव नाईक कर्ज योजना| Vasantrao Naik Karja Yojana|
केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील जनतेच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे वसंतराव नाईक कर्ज योजना.
देशातील आणि राज्यातील बेरोजगार तरुणांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी, राज्य शासनाकडून वसंतराव नाईक भटक्या जमाती, विमुक्त जाती विकास महामंडळातर्फे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील प्रत्येक तरुणास महाराष्ट्रात सरकारी नोकरी देणे शक्य नसल्याने, तसेच महाराष्ट्र राज्यातील उद्योग धंदे वाढवण्यासाठी आणि राज्यातील तरुण वर्गाला उद्योगधंद्यांमध्ये उतरवण्यासाठी, प्रयत्न करण्याची हेतूने राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली. आपल्या राज्यातील तरुनांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, किंवा पहिला व्यवसाय मोठा करायचा आहे. त्यासाठी महामंडळातर्फे या तरुणांना थेट कर्ज दिले जाते.
शेळी व मेंढी पालन आणि गाय व म्हैस पालन योजना| Maharashtra Govenment Sheli And Mendhi Palan Scheme|
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून, राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून, शेळी व मेंढी पालन तसेच, गाय व म्हैस पालन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे दुधाळ गाई आणि म्हशी वाटप करण्यात येणार आहे. तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी १,००० पक्षांचे वाटपही करण्यात येणार आहे.
शबरी घरकुल योजना 2024| Shabari Gharakul Yojana 2024|
महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी अनुसूचित जातीतील लोकांना अजूनही राहण्यासाठी पक्की घरे उपलब्ध नाहीत. माती आणि दगडांपासून तयार केलेल्या घरांमध्ये आजही या समाजाचे लोक वास्तव्य करताना दिसत आहे. या लोकांना स्वतःच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित अनुसूची जमातीच्या लोकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी ‘शबरी घरकुल योजनेची’ सुरुवात केली.
‘शबरी घरकुल योजनेअंतर्गत’ अनुसूचित जमातीतील लाभार्थी कुटुंबाला २६९ चौरस क्षेत्र असलेले पक्के घर उपलब्ध करून दिले जाते. तसेच त्या कुटुंबाला स्वच्छ भारत योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जमातीतील कुटुंबाला, तसेच पारधी समाजातील कुटुंबाला, विधवा महिला निराधार कुटुंबाला, दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या कुटुंबांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. तसेच या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना ५ टक्के आरक्षण देखील देण्यात येते. दिव्यांग महिलांना देखील या योजनेत सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येते.
महाज्योती फ्री टेबल योजना 2024| Mahajyoti Free Tablet Scheme 2024|
राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. तसेच शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही अडनींचा सामना करावा लागू नये. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून महाराष्ट्र शासनाने ‘महाज्योती योजना’ (Mahajyoti Yojana 2024) सुरू केली आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी व विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यासाठी अनेक कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. त्यातील अनेक विद्यार्थी मागणी कोचिंग क्लासेस लावतात आणि शिक्षण घेतात, परंतु राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व मेडिकल अशा फील्डमध्ये करिअर घडवायचे असते. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना या फील्डमध्ये करिअर घडवण्याला अडचणी निर्माण होतात. या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन क्लासेस, कोचिंग प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना टॅबलेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मोफत शिक्षण घेता येणार आहे.
आण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024| Annasaheb Patil Karja Yojana 2024|
मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की, महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांची संख्या सध्या वाढतच चालली आहे. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी महाविद्यालयाने कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे. परंतु प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे शक्य नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या खूप वेगाने वाढत चालली आहे. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने तरुणांना करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४’ या योजनेची सुरुवात केली आहे. जेणेकरून बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय टाकता येईल. आणि ज्या तरुणांनी आधीपासून स्वतःचा व्यवसाय टाकलेला आहे, त्यांना त्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायत रूपांतर करता येईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुशील आणि सुशिक्षित तरुणांना स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी किंवा आधीपासून करत असलेला व्यवसाय एक्सपांड करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या तरुणांना १० लाख रुपये ते ५० लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. ज्या कुटुंबातील व्यक्तींचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबांना या योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होते. तसेच कर्जाचे हप्ते जर, अर्जदाराने वेळेत भरले तर, अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे व्याज देण्याची गरज राहत नाही.
मधमाशी केंद्र योजना| Madhmashi Kendra Yojana|
महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येचा विचार केल्यास असे बघायला मिळेल की जवळपास ७० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. परंतु दुष्काळ, नैसर्गिक वादळ, अनियमित पडणारा पाऊस, रोगराई, बाजारभाव यासारख्या अनेक समस्यांमुळे शेतकरी आपल्याला नेहमी तोट्यात जाताना पहावयास मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला शेती सोबतच शेतीसंलग्न जोड व्यवसाय असावा, ज्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवून त्याचा फायदा होईल.
आपल्याला माहीतच असेल, की मधमाशांमुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि हा व्यवसाय शेतकरी सहजरित्या करू शकतो. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून प्रामुख्याने हे सांगितले जाते की, मधमाशी पालन वेतनमुख्य उद्योगधंदा म्हणून मधमाशीपालन व्यवसाय करावा. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. मधमाश्यांच्या पेट्या जिथे फळबागा आहेत व जिथे फुलांची शेती देखील केली जाते. आणि जंगलांच्या जवळपास ठेवल्यास मधमाशांद्वारे परागीभवन होऊन, पिकांचपिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार १०% ते ४०% पर्यंत उत्पादन वाढू शकते.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना| Savitribai Phule Scolarship Scheme|
महाराष्ट्र राज्यात आज देखील काही असे कुटुंब आहेत, जे आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही. त्यांच्या कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजाही त्यांना भागवता येत नाही. अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची शिकण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थितीत दुर्बल असल्यामुळे ते या परिस्थितीत शिक्षण घेऊ शकत नाही.
त्यामुळे अशी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास सही होत नाही. आजही समाजात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्या कुटुंबात मुलींच्या शिक्षणाला महत्व दिले जात नाही. या गोष्टींचे निवारण करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले व मुलींना शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून महाराष्ट्र सरकारने ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची’ सुरुवात केली.
आंतरजातीय विवाह योजना| Inter Caste Marriage Scheme|
आपल्या देशात आणि राज्यात विविध जातीधर्माचे लोक राहतात. त्यामुळे जाती जातींमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये भेदभाव सर्रास पाहायला मिळतो. आपल्या देशातील जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह योजना राबवली जाते.
आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यास २,५०,००० रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून मंजूर केली जाते. या योजनेत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, शिख, लिंगायत या धर्मातील असेल तर, तो विवाह आंतरजातीय विवाह समजण्यात येईल.
मोफत सायकल वाटप योजना| Mofat Cycle Vatap Yojana|
महाराष्ट्र राज्यात आजच्या काळातही खेडोपाडी दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या आणि येण्यासाठी खूप अडचणी सहन कराव्या लागतात. यासाठी महाराष्ट्र सरकारने मोफत सायकल योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत सायकल देणार आहे. जेणेकरून त्यांना शाळेत जाणे आणि येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
मित्रांनो, या सर्व योजनांच्या माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्यांच्या परिस्थितीनुसार ते या योजनांची माहिती मिळून, योजनांचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत