Header Ads

Breaking News

अटल पेंशन योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती| Atal Pension Yojana Information In Marathi|

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एका नवीन योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. त्या योजनेचे नाव आहे, ‘अटल पेन्शन योजना’ (Atal Pension Yojana). ही योजना प्रामुख्याने देशातील मजूर वर्गाला आर्थिक सहाय्यक करण्याच्या उद्देशाने जून २०१५ मध्ये देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.

‘अटल पेन्शन योजना’ (Atal Pension Yojana) | APY SBI ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) या संस्थेद्वारे प्रशासित केली जाते.

आजच्या या लेखात आपण याच ‘अटल पेन्शन योजनेबद्दल’ संपूर्ण माहिती घेणार आहोत, जसे की अटल पेन्शन योजना काय आहे? अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये, अटल पेन्शन योजनेचा उद्देश, अटल पेन्शन योजनेचे फायदे, अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे, अटल पेन्शन योजनेचा अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

अटल पेन्शन योजना काय आहे? Atal Pension Yojana In Marathi|

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजूर यांना उतार वयात पेन्शनची सुविधा नसते. त्यामुळे अशा कामगारांना आणि मजुरांना उतरवात आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.

या कामगारांची आणि मजुरांची हीच समस्या लक्षात घेऊन, केंद्र सरकारने ‘अटल पेन्शन योजनेची’ सुरुवात केली आहे. जेणेकरून असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचतिची सवय होईल. आणि त्यांनी केलेल्या बचतीमुळे उतारवयात त्यांचे हाल होणार नाही किंवा ते दुसऱ्या कोणावर अवलंबून राहणार नाहीत.

भारतात असंघटित क्षेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगार वर्गाच्या ८८% आहे. म्हणजेच जवळपास ४७.४९ कोटी लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रात कार्यरत आहे. आणि त्यांचे उत्पन्नाचे साधन कमी प्रमाणात आहे.

म्हणूनच असंगठित क्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवरील उपाय म्हणून या कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचतीची सवय लागावी या उद्देशाने ‘अटल पेन्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.

२०१५-१६ च्या आर्थिक संकल्पात केंद्र सरकारने सर्व भारतीयांसाठी सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली आहे. ‘अटल पेन्शन योजना’ या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना पेन्शन देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. ‘अटल पेन्शन योजना’ ही योजना १ जून २०१५ पासून कार्यरत आहे.

अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे? Atal Pension Yojana Eligibility|

  • १८ ते ४० वर्ष वयोगटातील सर्व भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत.
  • योजनेसाठी लाभार्थ्याचे बँक खाते असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदारा इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभार्थी नसावा.
  • ज्या व्यक्तींना त्यांच्या निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारच्या पेन्शनची व्यवस्था नसेल, असेच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.

अटल पेन्शन योजनेचे फायदे| Atal Pension Scheme Benefits|

  • भारत सरकारकडून हमीभावाच्या स्वरूपात कमी जोखमीचा सेवानिवृत्तीचा पर्याय.
  • सदस्यांनी केलेल्या वर्गणीच्या आधारावर, १,००० रु, २,००० रु, ४,००० रु किंवा ५,००० रु पेंशनची गॅरंटी.
  • अटल पेन्शन योजनेमधील वर्गणीची रक्कम आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सिसीडी (१), अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहेत.
  • भारतीय रहिवाशांसाठी या योजनेचे सदस्यत्व घेणे सोपे आहे. मग ते स्वयंरोजगार असोत किंवा नोकरी करणारे.
  • लागू नियमानुसार अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास या योजनेचा त्याच्या जोडीदाराला फायदा मिळतो.
  • पेन्शन रक्कम म्हणून सुलभ सबस्क्रीप्शन सबस्क्राईबरच्या निवडीनुसार अपग्रेड किंवा डाऊनग्रेड केली जाऊ शकते.
  • अटल पेन्शन योजनेची सदस्यता संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे.

अटल पेन्शन योजना अंतर्गत खाते उघडण्याची प्रक्रिया| Atal Pension Scheme SBI Account Opening Process|

  • अटल पेन्शन योजने अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी तुमच्या स्थानिक बँकेच्या शाखेत अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरा आणि सबमिट करा.
  • तुमचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्या.
  • खाते उघडण्याच्या वेळी तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून, वर्गणीची पहिली रक्कम कापली जाईल.
  • तुमची बँक तुम्हाला पावती क्रमांक / PRAN क्रमांक जारी करेल.
  • त्यानंतर वर्गणी तुमच्या बँक खात्यातून स्वयं डेबिट केले जाईल.

वर्गणी देण्याची पद्धत आणि देय तारीख

  • तुम्हाला तुमच्या बँकेचे सेविंग अकाउंटचे डिटेल्स, मोबाईल क्रमांक, आणि अधिकृततापत्र प्रदान करणे आवश्यक आहे. जेणेकरून बँक दरमहा तुमच्या खात्यातून वर्गणी वजा करू शकेल.
  • वर्गणी मासिक (एक महिना), त्रैमासिक (तीन महिने) किंवा सहामाही (सहा महिने) केली जाऊ शकते. आणि ऑटो डेबिटसाठी स्थायी सूचना सेट केल्या पाहिजेत.
  • मासिक वर्गणीची देय तारीख वर्गणीच्या पहिल्या तारखेपासून निर्धारित केली जाते. त्यानंतर सर्व महिन्यातील वर्गणी त्याच तारखेवर आधारित असेल म्हणजेच या महिन्याच्या १४ तारखेला जर तुम्ही वर्गणी जमा केले असेल तर दुसऱ्या महिन्याच्या १४ तारखेलाच तुमची वर्गणी तुमच्या खात्यातून कापली जाईल. आणि असेच पुढे सुरू राहील.

अटल पेन्शन योजनेत वर्गणी कशी भरावी

‘अटल पेन्शन योजनेची’ वर्गणी तुमच्या बँकेसोबत ऑटो डेबिट सूचना सेट करून वजा केली जाते. वर्गणी देण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही ऑटो डेबिट साठी खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक न ठेवल्यास, खालील प्रमाणे दंड आकारला जाईल.

  • जर दर महा वर्गणी १०० रुपये असेल तर, १ रुपये दंड आकारला जाईल.
  • दर महा वर्गणी १०१ रुपये ते ५०० रुपये या दरम्यान असेल तर, २ रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • दर महा वर्गणी ५०१ रुपये ते १,००० रुपये या दरम्यान असेल, तर ५ रुपये दंड आकारला जाईल.
  • दर महा वर्गणी जर, १००१ रुपयांपेक्षा जास्त असेल, तर दहा रुपये दंड आकारला जाईल.

अटल पेन्शन योजनेतून पैसे काढण्याची प्रक्रिया

अटल पेन्शन योजनेतून लाभार्थ्याला स्वेच्छेने बाहेर पडण्याची परवानगी केवल दुर्धर आजारासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिली जाऊ शकते. खाते बंद करण्याच्या विनंतीवर प्रक्रिया बंद करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या बँकेत तुम्ही तुमचे अटल पेन्शन योजना खाते उघडले आहे, त्या बँकेत पूर्णपणे भरलेला अटल पेन्शन योजना खाते बंद फॉर्म सबमिट करणे.

तुमच्याकडून फॉर्म प्राप्त केल्यानंतर, बँक विनंतीवर प्रक्रिया करेल, आणि तुमच्या खात्यात जमा केलेली एकूण योगदान आणि व्याज मोजेल. आणि त्यानंतर कोणतेही लागू होणारे अटल पेन्शन योजना खाते बंद / देखभाल शुल्क वजा करेल. शिल्लक रक्कम तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात एक रकमी रक्कम म्हणून जमा केली जाईल.

अटल पेंशन योजनेचा अर्ज कसा करायचा

अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. आणि या योजनेचा लाभ मिळू शकतात.

मित्रांनो, अटल पेन्शन योजनेच्या संपूर्ण माहितीचा हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि सर्व नातेवाईकांना जरूर शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळून ते उतार वयात या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत