Header Ads

Breaking News

महाराष्ट्र शासन कन्यादान योजना काय आहे? कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा करायचा? Kanyadan Yojana In Marathi|

मित्रांनो, देशात महागाई दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अशा परिस्थितीत जर घरात लग्न समारंभ असेल, तर खर्चाचा डोंगर वाढतच जातो. हे तर आपल्या सर्वांना माहीतच असेल.

परंतु, जर गरीब कुटुंबांचा विचार केला, तर त्यांना लग्न समारंभांमध्ये इतका मोठा खर्च परवडणारा नसतो. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील आणि मागासवर्गीय कुटुंबातील विवाह समारंभ कमी खर्चात होऊ शकतील.

आजच्या या लेखात आपण महाराष्ट्र शासन कन्यादान योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला महाराष्ट्र शासन कन्यादान योजनेची संपूर्ण माहिती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

महाराष्ट्र सरकार कन्यादान योजना 2024| Kanyadan Yojana 2024|

महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय कुटुंबांना लग्नसमारंभांमध्ये आर्थिक मदत करण्यासाठी आणि सामूहीक लग्न समारंभांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ‘कन्यादान योजना २०२४’ ची सुरुवात केलेली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन, विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले जाते। जेणेकरून या कुटुंबांचा होणारा अनाठायी खर्च वाचतो. त्यामुळे या कुटुंबांचा खर्च नियंत्रित राहतो. व हे कुटुंब कर्जबाजारी होण्यापासून वाचतात.

यासाठी अशा कुटुंबांमधील सामूहिक विवाहांमध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना २०,००० रुपये इतके अर्थ सहाय्य वधू-वरांच्या आई वडील किंवा फलकांचे नावे मंजुर करण्यात येते.

मित्रांनो, महाराष्ट्र शासन कन्यादान योजनेअंतर्गत देण्यात येणारी १० हजार रुपये आर्थिक मदत वाढवून आता २० हजार रुपये करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक दृष्ट्या अस्थिर असलेल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मुलीच्या लग्नासमारंभासाठी सामूहीक लग्न सोहळ्यात सहभागी झाल्यास २०,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.

कन्यादान योजनेचा तपशील| Kanyadan Yojana Detailed Information In Marathi|

योजनेचे नावमहाराष्ट्र शासन कन्यादान योजना
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
विभागसमाज कल्याण विभाग
लाभमागासवर्गीय कुटुंबांना विवाह खर्च म्हणून आर्थिक मदत
अधीकृत वेबसाइटhttps://sjsa.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन कन्यादान योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्रात अनुसूचित जाती (नवबौद्धांसह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर आणि वंजारींसह), विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहीक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना २०,००० रूपये इतके अर्थ सहाय्य वधूच्या वडिलांच्या नावावर मंजूर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

त्याचप्रमाणे, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या विवाह संस्था व संघटनांना प्रत्येकी जोडप्यावर ४,००० रुपये प्रोत्साहन पर अनुदान देणे.

महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी पात्रता| Maharashtra Kanyadan Yojana Eligibility|

  • वधू व वर महाराष्ट्रातील रहिवासी असावे
  • नवविवाहित जोडप्यांपैकी वधू-वर यापैकी एक किंवा दोन्ही जण अनुसूचित जाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जमाती किंवा मागास प्रवर्गातील असावा.
  • दांपत्यातील वराचे वय २१ वर्षांपेक्षा आणि वधूचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये.
  • वधू व वर यांच्या प्रथम विवाहसाठीच हे अनुदान देण्यात येईल.
  • बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदा या कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग दांपत्याकडून झालेला नसावा / याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेले असावे.
  • आंतरजातीय विवाह असल्यास त्यासाठी शासन निर्णय क्रमांक. युटीए – १०१९ / प्र.क्र.४५ / मावक – २, दिनांक ३० जानेवारी १९९९ नुसार जे फायदे मिळतात, ते ही फायदे अनुज्ञेय राहतील.

कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Kanyadan Yojana Important Documents|

महाराष्ट्र शासनाच्या कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे –

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • पती-पत्नीचे ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र

महाराष्ट्र शासन कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा करावा

महाराष्ट्र शासन कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेचा अर्ज संबंधित समाज कल्याण विभागाकडे जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून, या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कन्यादान योजनेच्या संपूर्ण माहितीचा हा लेख आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत