Header Ads

Breaking News

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे? जानून घ्या माझी कन्या भाग्यश्री योजनेची संपूर्ण माहिती| Majhi Kanya BhagyaShree Yojana In Marathi|

मित्रांनो, लिंग गुणोत्तरात मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी, आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ रोजी ‘माझी कन्या भाग्यश्री योजनेची’ (Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi) सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही बालिकेच्या आई किंवा वडिलांनी तीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी करून घेतली तर, ५०,००० हजार रुपयांची रक्कम सरकार बँकेत मुलीच्या नावावर जमा करेल.

‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ काय आहे? Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi|

‘माझी कन्या भाग्यश्री योजने’ अंतर्गत जर मुलीच्या जन्मानंतर तिच्या आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनासाठी नसबंदी केली असेल, तर नसबंदी नंतर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५०० रुपये जमा केले जातील. जेणेकरून त्या मुली आपले पुढील शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतील.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या फक्त दोन मुलींनाच लाभ दिला जाणार आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ २०२३ अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत पालकांना किंवा आईला नसबंदी करावी लागेल. आणि दुसरी मुलगी जन्मल्यानंतर सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे बंधनकारक आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ या योजनेअंतर्गत पूर्वी ज्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी आहे, असे बीपीएलधारक कुटुंब पात्र होते, परंतु आता नवीन धोरणानुसार, ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ अंतर्गत मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रूपये आहे, ते देखील या योजनेसाठी पात्र असतील.

‘माझी कन्या भाग्यश्री योजनेचा’ तपशील| Majhi Kanya Bhagyashree Yojana Detailed Information|

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
योजना सुरू करण्याची तारीख१ एप्रील २०१६
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
उद्दिष्टराज्यातील मुलींचे जीवन मान उचावणे
Majhi Kanya BhagyaShree Yojana Detailed Information In Marathi

‘माझी कन्या भाग्यश्री योजनेचे’ उद्दिष्ट

मुलींना ओझ माणणारे आणि मुलींची भ्रूणहत्या करणारे तसेच मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणारे, असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री २०२३ या योजनेची, सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे बालिकांचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री करणे, लिंग निर्धारण आणि स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे, बालिकांना समान दर्जा आणि शैक्षणीक प्रोत्साहना करिता समाजात कायमस्वरूपी सामूहिक चळवळ निर्माण करणे, ‘माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३’ च्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आणि राज्यातील लोकांची मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी बदलणे.

तसेच, या योजनेद्वारे मुलींचे भविष्य उज्वल बनवने, जिल्हा, तालुका व विविध स्तरावर इतर संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडून आणणे. हे प्रामुख्याने माझी कन्या भाग्यश्री २०२४ या योजनेचे उद्दिष्ट आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठीच्या’ शर्ती व अटी

‘सुकन्या’ योजनेचा समावेश नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत करण्यात आल्यामुळे ‘सुकन्या’ योजनेसाठी लागणाऱ्या सर्व शर्ती व अटी ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी लागणार आहेत. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे –

  • ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी सर्व गटातील बीपीएलधारक कुटुंबे पात्र असतील. तसेच दारिद्र रेषेवरील कुटुंबात जन्मलेल्या अपत्या वरील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • लाभार्थी मुलीचे आई आणि वडिल महाराष्ट्र राज्याचे मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालीकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
  • विम्याचा लाभ घेताना बालिकेचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तिने येता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आणि १८ वर्षे वयापर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसुतिच्या वेळेस जर दोन जुळ्या मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली या योजनेसाठी पात्र असतील.
  • बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहिल.
  • प्रकार – १ च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर आणि प्रकार – २ च्या लाभार्थी कुटुंबास दोन मुली नंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
  • या योजनेअंतर्गत मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर एलआयसी कडून जे १,००,००० रुपये मिळतात त्यापैकी किमान १०,००० रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील.
  • ज्या लाभ धारकांचे खाते जनधन योजनेअंतर्गत आहे. त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळतील. 

लाभाचे स्वरूप

  • ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे.
  • मात्र एक मुली व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| MKBY Yojana IMP Documents|

  • लाभार्थी मुलीच्या पालकांचे रहिवाशी प्रमाणपत्र
  • मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
  • दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बीपीएल श्रेणी रेशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर
  • मुलीचे व आईचे बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी अर्ज कसा करायचा| MKBY Yojana Registration|

या योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बालविकास), यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन इंटरनेटवरूनही डाऊनलोड करू शकता. तसेच या योजनेचा अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन मिळून या योजनेत विचारलेली संपूर्ण माहिती भरून आणि अर्जात सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे या अर्जाला जोडून तुम्ही हा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करू शकता.

अशा प्रकारे ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

मित्रांनो, ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या माहितीचा हा लेख आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल आणि माहिती मिळाल्यास ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत