इंदिरा गांधीं राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना| Indira Gandhi National Old Age Pension Scheme In Marathi|
मित्रांनो, राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या एका सर्वेक्षणानुसार, भारतात वृद्ध नागरिकांची लोकसंख्या ९% टक्के होती. त्यानंतर या सर्वेक्षणात असा अंदाज वर्तवण्यात आला की २०३६ पर्यंत भारतातील वृद्ध नागरिकांची संख्या १८% पर्यंत पोहचु शकते.
आणि म्हणूनच, भारताला नजिकच्या भविष्यात वृद्धांसाठी दर्जेदार जीवन सुनिश्चित करायचे असेल तर, त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी आतापासून सुरू झाली पाहिजे.
याच अनुषंगाने देशातील केंद्र सरकार वृद्ध नागरिकांसाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवत असते. त्यात त्यापैकीच एक योजना म्हणजे ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’.
मित्रांनो, आपण आजच्या या लेखात ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेबद्दल’ ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना काय आहे? Indira Gandhi Pension Yojana In Marathi|
आजही आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत आहे. अशा सर्व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना शासनाकडून विविध योजनांद्वारे आर्थिक लाभ दिला जातो. जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.
अशाच आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारने ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेची’ सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील वयोवृद्ध नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करता येतील.
‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’ केंद्र सरकारने देशातील वृद्ध नागरिकांसाठी २००७ साली सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार देशातील ६५ वर्ष किंवा त्यावरील वयाच्या वृद्धांना पेन्शनच्या स्वरूपात आरती मदत करते.
या योजनेअंतर्गत देशातील वयोवृद्ध लोकांना मासिक पेंशन दिली जाते. या योजनेचा लाभ फक्त बिपिएल कुटुंबातील वृद्धांना दिला जातो. या योजनेअंतर्गत ऑफलाइन अर्ज करू तुम्ही या योजनेचा लाभ मिळ शकता.या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला पंचायत किंवा जिल्हा स्तरावरील कार्यालयात संपर्क करावा लागेल.
‘इंदिरा गांधीं राष्ट्रिय वृद्धावस्था पेंशन योजनेची’ उद्दिष्टे
या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. या योजने अंतर्गत मिळणारी पेंशन दर महा दिली जाते.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना होऊ नये. आणि त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुणावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. जेणे करुन असे वृद्ध स्वावलंबी बनतील.
इंदिरा गांधी राष्ट्रिय वृद्धावस्था पेंशन योजनेचा तपशील
| योजनेचे नाव | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना |
| योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
| विभाग | समाज कल्याण विभाग |
| उद्दिष्ट | वयोवृद्ध नगरीकांना पेंशन द्वारे आर्थिक मदत |
| लाभार्थी | देशातील वृद्ध लोक, विधवा, अपंग लोक |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेचे फायदे| Indira Gandhi Pension Yojana Benefits|
- ही योजना एक नॉन कंट्रीब्यूटर पद्धत आहे, याचा अर्थ लाभार्थ्यांना पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी कोणते योगदान देण्याची गरज नाही.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पेन्शन फक्त एका व्यक्तीसाठी मर्यादात नाही तर, या योजनेत बीपीएल कार्डधारक ६५ वर्षांवरील सर्व नागरिक पेंशन साठी पात्र आहेत.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेअंतर्गत, ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, अल्प उत्पन्न कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना ६०० रुपये मासिक पेन्शन मिळते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
दारिद्र रेषेखालील 65 वर्षांवरील किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली नागरिक या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र श्रावणबाळ सेवा राज्य सेवा निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत २०० रु प्रति महा मिळतात.
तसेच, भारत सरकारकडून ४०० रुपये मिळतात. म्हणजेच राज्य सरकारचे २०० रू आणि केंद्र सरकारचे ४०० रु मिळून वृद्ध नागरिकांना ६०० रुपयांचे मासिक पेन्शन मिळते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
दारिद्र रेषेखालील 65 वर्षांवरील किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली नागरिक या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र श्रावणबाळ सेवा राज्य सेवा निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत २०० रु प्रति महा मिळतात.
तसेच, भारत सरकारकडून ४०० रुपये मिळतात. म्हणजेच राज्य सरकारचे २०० रू आणि केंद्र सरकारचे ४०० रु मिळून वृद्ध नागरिकांना ६०० रुपयांचे मासिक पेन्शन मिळते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी पात्रता
- अर्जदार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बीपीएल रेशन कार्ड
- वय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा
इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो.
जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालयात संबंधित योजनेच्या अर्जासाठी विचारणी करून अर्ज मिळवावा. त्यानंतर अर्ज विचारलेली माहिती व्यवस्थितरित्या भरावी आणि अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडावी त्यानंतर अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
अशाप्रकारे, अर्जदार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
मित्रांनो, ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेच्या’ माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्यांच्या घरातील वृद्ध नागरिक या योजनेची माहिती मिळवून या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत