बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती| Beti Bachao Beti Padhao Scheme In Marathi|
मित्रांनो, पूर्वीपासूनच आपल्या समाजात स्त्रीभ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे. आजच्या प्रगतीशील भारतात काही प्रमाणात स्त्रीभ्रूण हत्तेचे प्रमाण कमी झाले असले तरी, ते पूर्णपणे बंद झालेले नाही.
आजही समाजात बरेच लोक आहेत, ज्यांना मुलीचा जन्म त्यांच्या घरी नको असतो. अशा लोकांमुळे आजही स्त्री भृण हत्या चालूच आहे.
मुलाप्रमाणेच मुलींनाही या जगात जन्म घेण्याचा समान अधिकार आहे. म्हणूनच देशातील सरकार मुलींना वाचवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी, वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रम राबवत असते.
या योजनांच्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेपासून, त्यांना सामाजिक आणि आर्थिक मदतीसह सर्व काही गोष्टी पुरवल्या जातात. केंद्र सरकारने 2015 मध्ये मुलींसाठी अशीच एक योजना सुरू केली होती या योजनेचे नाव आहे, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ योजना.
या योजनेच्या माध्यमातून सरकार मुलींच्या सुरक्षेची काळजी तर घेणारच आहे. शिवाय या योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना| Beti Bachao Beti Padhao Scheme In Marathi|
या योजनेअंतर्गत मुलींना उच्च शालांतर्गत शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाईल। त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे लिंग गुणोत्तर सुधारण्यावर देखील भर दिला जाईल.
या योजनेच्या माध्यमातून मुलींचे शिक्षणासाठी आणि स्त्रीभ्रूणहत्या चे प्रमाण रोखण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेमुळे मुलींचे जीवनमान उंचावेल आणि त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना सरकारने २०१४-१५ मध्ये केवळ १०० जिल्ह्यांसाठी सुरू केली होती. त्यानंतर सन २०१५-१६ मध्ये या योजनेमध्ये देशातील आणखी ६१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. परंतु आता ही योजना संपूर्ण देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा तपशील| Beti Bachao Beti Padhao Scheme Detailed Information In Marathi|
| योजनेचे नाव | ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना |
| योजना कोणी सुरू केली | भारत सरकार |
| लाभार्थी | महिला व मुली |
| उद्दिष्ट | मुलींचे संरक्षण करणे आणि लिंग गुणोत्तर सुधारणे. |
| अधिकृत संकेतस्थळ | https://wcd.nic.in/bbbp-Schemes |
योजनेचे स्वरूप
तुम्ही तुमच्या मुलीच्या खात्यात दर महा १००० रुपये जमा करत असाल, आणि तुम्ही एका वर्षात सलग १२,००० रुपये जमा केले, तर तुमच्या मुलीच्या वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत. तुमच्या मुलीच्या बँक खात्यात १,६८,००० रुपये जमा होतील.
तुमची मुलगी १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्यातील काही रक्कम काढायची असेल तर, तुम्ही फक्त त्यातील ५०% रक्कम काढू शकता. आणि उरलेली ५०% रक्कम तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी काढता येईल.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची पात्रता| Beti Bachao Beti Padhao Scheme Eligibility|
मित्रांनो, जर तुम्हाला ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला या योजनेची पात्रता काय आहे. हे माहीत असणे गरजेचे आहे. या योजनेची पात्रता खालील प्रमाणे आहे –
- ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे.
- अर्जदार कोणत्याही भारतीय राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलीचे वय १० वर्षे असणे आवश्यक आहे.
- मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ फक्त मुलींना जाता येणार आहे.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजने साठी आवश्यक कागद पात्रे| Beti Bachao Beti Padhao Scheme IMP Documents|
मित्रांनो तुम्हाला ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ योजनेचा अर्ज करण्यासाठी लागत असणाऱ्या कागदपत्रांची माहिती असल्यास, तुम्ही या योजनेचा अर्ज सहजपणे करू शकाल, त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
- पालकांचे ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आदिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे आधार कार्ड
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेत काही नवीन घटकांचा समावेश करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेला २०२३ मध्ये नवीन स्वरूप दिले आहे. या योजनेचे नवीन स्वरूप खालील प्रमाणे आहे –
- मुलींना कौशल्य प्रदान करणे
- माध्यमिक शिक्षणात त्यांची नोंदणी वाढवणे
- मुलींना मासिक पाळीतील स्वच्छतेबद्दल जागृत करणे.
- बालविवाह समाप्त करणे इत्यादी.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचे उद्दिष्ट
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लिंग गुणोत्तर सुधारणे आणि मुलींच्या पालकांना आणि मुलींना माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण देण्यास प्रोत्साहीत करणे.
देशातील नागरिकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत.
ही योजना भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. याशिवाय, या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य उज्वल होऊन त्यांची शैक्षणिक यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होणार आहे.
मुली आणि मुलांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचे फायदे
- या योजनेच्या माध्यमातून मुलींचे जगणे, त्यांचे शिक्षण, त्यांचे सुरक्षितता याची संपूर्ण खात्री केली जाईल.
- या योजनेच्या माध्यमातून लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गत स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यात येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत.
- या योजनेच्या माध्यमातून मुलींचे जीवनमान उंचावेल, त्यांच्या वर्तमानाची सुरक्षा सुरक्षा होईल, आणि त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेसाठी अर्ज कसा करायचा| Beti Bachao Beti Padhao Scheme Registration|
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गत इच्छुक असणाऱ्या लाभार्थींना अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावे.
- आवश्यक कागदपत्रे सोबत असू द्यावी.
- आता तुम्ही पोस्ट ऑफिस व बँकेमध्ये गेल्यावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा अर्ज करू शकता.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरावी आणि अर्जाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून, अर्ज पोस्ट ऑफिस किंवा बँकेतील संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
- अशा प्रकारे, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गतची तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मित्रांनो, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती होऊन ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत