प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना| Pramod Mahajan Kaushalya Vikas Yojana In Marathi|
मित्रांनो, राज्यातील तरुणांना विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेची’ सुरुवात केली आहे. योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या या लेखात आपण ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेबाबतची’ संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला ‘प्रमोद महाजन ग्रामीण विकास कौशल्य योजनेची’ संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना काय आहे? Pramod Mahajan Kaushalya Vikas Yojana In Marathi|
आपल्या भारत देशात असे काही कुशल कारागीर आहे. ज्यांच्याकडे अत्यंत कमी किमतीत आणि कमी कष्टात चांगल्या दर्जेदार वस्तू बनवण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत देशातील वाढती बाजारपेठ विदेशी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करीत आहे. त्यामुळे भारतीय कामगारांसाठी देशात विविध क्षेत्रात आणि जागतीक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.
या संधीच्या माध्यमातून आणि यांचा फायदा घेण्यासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृद्धी आणि विकास होण्यासाठी, प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्योग व इतर क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्यासाठी, देशातील तरुणांना सध्याच्या युगात असलेल्या विविध उद्योग क्षेत्रांमधील बदलत्या आर्थिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेची’ सुरुवात करण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या या संकल्पनेच्या आधारे महाराष्ट्र सरकारने ‘कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र’ हे धोरण समोर ठेवले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील युवक आणि युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या, उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान’ या अभिनयाची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेचा उद्देश
- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली करणे.
- १५ ते ४५ या कार्यक्षम वयोगटातील उमेदवारांना कौशल्य प्रदान करून, त्यांना कार्यक्षम बनवणे.
- त्यापैकी किमान ७५% टक्के उमेदवारांना स्वयंरोजगार किंवा प्रत्यक्ष नोकरी मिळवून देणे.
- राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणे, जेणेकरून त्या उद्योगांची उत्पादकता वाढेल.
- नवीन निर्माण होणारी कूशळ मनुष्यबळाची क्षेत्रे शोधून, त्या अनुषंगाने मनुष्यबळाची निर्मिती करणे.
- कृषीपूरक, पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील कौशल्य शिक्षण देण्यावर भर.
- विविध शालेय तसेच उच्च अभ्यासक्रमात कौशल्य क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम समाविष्ट करणे.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचे विकास साधला जालना देण्यासाठी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
कौशल्य विकास हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच आत्मीयतेचा राहिलेला आहे. म्हणूनच राज्य सरकारने पंतप्रधानांच्या संकल्पनेवर आधारित, ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे की, रोजगारासाठी तरुणांचे गावाकडून – शहराकडे स्थलांतर होऊ नये. तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला तर शहराकडे येणारी तरुणांची मोठी लोकसंख्या थांबवता येईल आणि शहरातील लोकसंख्या कमी करता येईल. जेणेकरून शहरी व्यवस्थेवर व यंत्रणेवर जास्त लोकसंख्येचा ताण पडणार नाही. हा उद्देश साध्य करण्यासाठी कौशल्य विकास केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.
याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर २०२३ गुरुवार रोजी महाराष्ट्रात ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ केला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जगभरात भारतीय कुशल तरुणांची मागणी वाढत आहे. जगात असे अनेक देश आहेत, जिथे तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त आहे. आणि काम करण्यासाठी प्रशिक्षित तरुण मिळणे खूप कठीण आहे.
आपल्या भाषणात पुढे एका सर्वेक्षणाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील १६ देश जगभरातील सुमारे ४० लाख कुशल तरुणांना नोकऱ्या देऊ इच्छित आहे.
म्हणूनच या नवीन निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी, आज आपण आपल्या देशासाठीच नव्हे तर, जगासाठी कुशल व्यवसायिक कामगार विकसित करीत आहोत.
भविष्यात राज्यातील या प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक कुशल कामगार आपल्या देशात तयार होतील.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची अंमलबजावणी
बाजारातील विविध प्रकारच्या रोजगाराच्या मागण्या लक्षात घेऊन बाजारपेठेत आवश्यक असलेले कौशल्य निर्माण करून, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्यातील ३५० तालुक्यांतील ५११ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मा. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर 2023 गुरुवार रोजी ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ केला.
भविष्यात या कौशल्य विकास केंद्रांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास’ कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, उद्योग यांच्या बरोबरच महसूल व ग्रामविकास यांच्याबरोबरच महिला व बाल विकास विभागांचा यामध्ये समावेश असणार आहे.
या कौशल्य विकास कार्यक्रमात राज्यातील लोकप्रतिनिधीं बरोबरच आशा व अंगणवाडी सेविका यांचा समावेश केला जाणार आहे. जेणेकरून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत हे अभियान पोहोचवता येईल.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी सुद्धा या योजनेचा भाग होऊ शकतात.
मित्रांनो, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल आणि बेरोजगार असाल तर सरकारच्या या योजनेचा नक्कीच फायदा घ्या आणि ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या’ माहितीचा संपूर्ण लेख आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या कार्यक्रमाची माहिती मिळून ते या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत