Header Ads

Breaking News

जननी सुरक्षा योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती| Janani Suraksha Yojana In Marathi|

आपल्या देशाचे सरकार नवजात बाळ आणि गर्भवती महिलांची प्रकृती सुधारण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम आणि योजना राबवत असते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून अशाच एका सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. या योजनेचे नाव आहे, जननी सुरक्षा योजना. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला जननी सुरक्षा योजनेसंबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे. जसे की, जननी सुरक्षा योजना काय आहे? या योजनेचा उद्देश, फायदे, महत्त्वाचे कागदपत्रे, योजनेची वैशिष्ट्ये, योजनेसाठी अर्ज कसा करायचा? योजनेची पात्रता यबद्दलची सर्व माहिती जानून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जननी सुरक्षा योजना काय आहे? Janani Suraksha Yojana In Marathi|

जननी सुरक्षा योजना ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गर्भवती महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजने या योजनेच्या माध्यमातून देशातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांची स्थिती सुधारण्यात मदत होईल. या योजनेचा लाभ फक्त दारिद्ररेषेखालील महिलाच घेऊ शकतात.

ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्या महिलांना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सरकारने गर्भवती महिलांचे दोन वर्ग केलेले आहेत. त्या श्रेणीच्या आधारे त्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्या दोन श्रेणी खालील प्रमाणे आहे.

  • ग्रामीण भागातील गरोदर महिला – जननी सुरक्षा योजने अंतर्गत गरोदर असलेल्या (प्रसूतीच्या वेळी) आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना सरकारकडून १४०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याशिवाय आशा सहयोगींना प्रसूती प्रोत्साहनासाठी ३०० रु आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी ३०० रुपये दिले जातील.
  • शहरी भागातील गर्भवती महिला – या योजनेअंतर्गत प्रसूतीच्या वेळी सर्व गर्भवती महिलांना १००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय आशा सहयोगींना प्रसूतीसाठी २०० रुपये आणि प्रसूती नंतरची सेवा प्रदान करण्यासाठी २०० रुपये दिले जातील.

जननी सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट

मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की, दारिद्र्यरेषेखालील महिला आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या गर्भवती अवस्थेत, त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही किंवा चांगले उपचार उपचार घेऊ शकत नाही. शिवाय ग्रामीण भागात चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे, अजूनही खूप कठीण आहे. या अडचणी लक्षात घेऊन आणि गर्भवती महिलांना सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजनेची सुरुवात केली.

‘जननी सुरक्षा योजना २०२४’ द्वारे गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांना आर्थिक अडचण न येता चांगल्या वैद्यकीय सुविधा प्रदान करणे आणि आर्थिक मदत करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार केवळ मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणार नाही, तर नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी करण्यास मदत होणार आहे. या योजनेद्वारे गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांची रुग्णालयात जाऊन चांगल्या पद्धतीने आणि उपचाराच्या माध्यमातून प्रसूती होऊ शकेल आणि नवजात बालकालाही योग्य वेळेत चांगला उपचार मिळू शकेल.

जननी सुरक्षा योजनेची संबंधित काही महत्त्वाची माहिती

  • जननी सुरक्षा योजना २००५ साली केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली.
  • जननी सुरक्षा योजना सरकारद्वारे देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाते.
  • या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तरांचल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उडीसा आणि जम्मू काश्मीर या राज्यांना विशेष लक्ष केले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे एमसीएच कार्ड सोबत जेएसवाय कार्ड असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांची यादी वितरणाच्या तारखेला उपकेंद्र, पीएचसी, सीएचसी, जिल्हा रुग्णालयातील डिस्प्ले बोर्डवर अनिवार्य पणे प्रदर्शित केली जाईल.
  • या योजनेचा ४ टक्के निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरला जाऊ शकतो.
  • प्रसूतीच्या वेळी चांगली सुविधा देण्यासाठी प्रत्येक ब्लॉक मध्ये किमान दोन इच्छूक खाजगी संस्थांना अनुमती दिली जाईल.
  • जर पाल्याच्या आई किंवा वडिलांनी प्रसूतीच्या आधी नसबंदी केलेली असल्यास, त्यांना त्याची नुकसान भरपाई देखील दिली जाईल.
  • होम डिलिव्हरीच्या बाबतीत ५,००० हजार रुपयांची रक्कम प्रदान केली. ही रक्कम फक्त दोन अपत्यांच्या जन्मावरच दिली जाईल.
  • ही रक्कम डिलिव्हरीच्या ७ दिवसाच्या आत सरकारकडून वितरित केली जाईल.
  • सिजेरियन विभागासाठी या योजनेतून प्रसूतीसाठी रक्कम दिली जाईल. याशिवाय १,५०० रुपयांच्या आर्थिक रक्कमही दिली जाणार आहे.
  • गर्भवती महिला सोबत राहणारे आशा सहयोगींना ६०० रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाईल. या शिवाय सरकारकडून आशा सहयोगींना 250 रुपयांची, वाहतुकीसाठी आर्थिक मदत दिली जाईल.

जननी सुरक्षा योजनेची वैशिष्टे| Janani Suraksha Yojana In Marathi|

  • जननी सुरक्षा योजना २०२४ ही १००% केंद्र प्रायोजित योजना आहे. ही योजना रोख आर्थिक सहाय्य प्रदान करते.
  • या योजनेच्या माध्यमातून ASHA ला मान्यताप्राप्त समाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणून ओळखले जात आहे.
  • ज्या गर्भवती महिला अंगणवाडी किंवा आशांच्या मदतीने मुलाला घरी जन्म देतात. अशा उमेदवारांना पाचशे रुपये मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत बालकांची मोफत प्रसूती झाल्यानंतर, पुढील पाच वर्षाचे बालकांचे लसीकरणही मोफत केले जाते.
  • जननी सुरक्षा योजनेअंतर्गत किमान दोन प्रसूती पूर्वीच्या प्रसुती तपासण्या, पूर्णपणे मोफत दिल्या जातील. याशिवाय आशा आणि अंगणवाडी केंद्रातील कार्यकर्त्या ही त्यांना प्रसूती आणि त्यानंतर संबंधित सेवांसह मदत करतील.

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा सेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका

  • लाभार्थ्यांची ओळख आणि नोंदणी करणे.
  • सर्व महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यास महिलांना मदत करणे.
  • मागील तीन एएमसी तपासण्यांमध्ये लाभार्थ्यांना सहायता करणे.
  • सरकारी आरोग्य केंद्र आणि मान्यता प्राप्त खाजगी आरोग्य संस्था ओळखणे.
  • लाभार्थ्यांना इन्स्टिट्यूशन डिलिव्हरीसाठी प्रोत्साहित करणे.
  • १४ आठवड्यांपर्यंतच्या नवजात बाळाच्या लसीकरणाची व्यवस्था करणे.
  • ANM किंवा MO यांना मुलाच्या किंवा आईच्या जन्म किंवा मृत्युबद्दल माहिती देणे.
  • आईच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे.
  • कुटुंब नियोजनाचा प्रचार करणे.

जननी सुरक्षा योजनेची पात्रता| Janani Suraksha Yojana Eligibility|

  • लाभार्थी स्त्री दारिद्ररेषेखालील असावी.
  • महिलेचे वय १९ बर्षां पेक्षा जास्त असावे.
  • या योजनेअंतर्गत त्या सर्व अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांचा समावेश केला जाईल, ज्यांचे प्रस्ताव सरकारी आरोग्य केंद्र किंवा खाजगी मान्यता प्राप्त संस्थाद्वारे केले गेले आहे.

जननी सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Janani Suraksha Yojana IMP Documents|

  • बीपीएल रेशन कार्ड.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र.
  • पत्त्याचा पुरावा.
  • शासकीय रुग्णालयाकडून वितरण प्रमाणपत्र.
  • जननी सुरक्षा कार्ड.
  • बँक खाते.
  • मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

जननी सुरक्षा योजनेचा अर्ज कसा करायचा| Janani Suraksha Yojana Registration|

देशातील इच्छुक गर्भवती महिला, ज्यांना जननी सुरक्षा योजना २०२४ अंतर्गत सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळवायचे आहे, त्यांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जननी सुरक्षा योजना २०२४ च्या अर्जाची पीडीएफ डाउनलोड करायची आहे.

अर्जाची पीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये किंवा अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती खरी आणि चांगली चांगल्या पद्धतीने भरावी लागेल. अर्जात संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावे लागतील. आणि त्यानंतर अर्ज अंगणवाडी किंवा महिला आरोग्य केंद्केंद्रात जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही जननी सुरक्षा योजना २०२४ साठी अर्ज करू शकता.

मित्रांनो, जननी सुरक्षा योजना २०२४ चा हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळून ते योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत