Header Ads

Breaking News

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना| PM Jan Aushadhi Pariyojana In Marathi|

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमकुवत नागरिकांना, परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक औषधी मिळावी, यासाठी भारत सरकारने ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना’ सुरू केली आहे.

यासाठी, भारत सरकारने सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी प्रधानमंत्री जनऔषधि केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी या योजनेअंतर्गतची औषधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मित्रांनो, या लेखात आपण प्रधानमंत्री जन औषधी परियोजने बाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे फायदे, उद्दिष्टे, योजनेसाठी अर्ज कसा करायचा? योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणते आहेत? याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री जन औषधी योजना म्हणजे काय? PM Jan Aushadhi Yojana In Marathi|

‘प्रधानमंत्री जन औषधि योजना’ १ जुलै २०१५ पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली आहे. देशाचे विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ही परियोजना सुरू केली होती.

या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचे औषधे सामान्य नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

त्या अनुषंगाने देशातील प्रत्येक शहरात जन औषधी केंद्र सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, या केंद्रांमध्ये उच्च दर्जाचे औषधे कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत.

ब्रँडेड फार्मा कंपन्यांच्या औषधांमध्ये वापरली जाणारी महागडी आणि गुणवत्ता पूर्ण कंपाऊंडस् या औषधांमध्येही असणार आहेत, त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत कोणताही फरक असणार नाही.

प्रधानमंत्री जन औषधि योजनेचा उद्देश

  • ही योजना सुरू करण्यामागचा सरकारचा मुख्य उद्देश, आपल्या देशातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना चांगल्या दर्जाची औषधे कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना बाजारभावापेक्षा ६० ते ७० टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • मित्रांनो, आपल्या देशात जास्तीत जास्त लोक मध्यमवर्ग कुटुंबातील आहे. अशा कुटुंबातील लोकांची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खूप कमकुवत असते, त्यामुळे ते एखादा आजार झाल्यास किंवा उपचार करण्यासाठी औषधे महागडी औषधे घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. जेणेकरून ते लोक कोणत्याही उपचारातून वंचीत राहणार नाही.
  • त्यामुळे या योजनेअंतर्गत सरकारने आपल्या देशातील सर्व शहरांमध्ये मध्यमवर्गी नागरिकांना परवडणारी औषधी उपलब्ध करून दिली आहे. जी औषधी देशातील कोणताही नागरिक सहज मिळवू शकतो.

प्रधानमंत्री जन औषधि केंद्रात काय उपलब्ध आहे?

‘भारतीय जन औषधि केंद्रांमध्ये’ १७५९ औषधी आणि २८० शस्त्र क्रिया उपकरणे उपलब्ध आहेत.

याशिवाय नवीन औषधे आणि न्यूट्रॉसिटीकल्स उत्पादने जसे की प्रोटीन पावडर, माल्ट आधारित अन्नपुरक, प्रोटीन बार, इम्युनिटी बार, सॅनिटायझर, मास्क, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर इत्यादी उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचे फायदे| PM Jan Aushadhi Yojana Benefits In Marathi|

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी योग्य व कमी दरात औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
  • या योजनेचा लाभ भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांना मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत जेनेरिक औषधी खरेदी करण्यावर भर दिला जाणार आहे
  • या योजनेअंतर्गत अर्जदाराला प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडल्यानंतर, सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
  • ‘प्रधानमंत्री जन औषधी’ केंद्र सुरू झाल्यानंतर लोकांना रोजगार मिळून बेरोजगारी दूर होण्यास मदत होणार आहे.
  • देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ४२०० जन औषधी केंद्र स्थापन केली जात आहेत.
  • या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक लाख रुपये मोफत औषधांच्या स्वरूपात दिले जातील.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला संगणक प्रिंटर इंटरनेट इत्यादींसाठी प्रतिपूर्ति म्हणून ५० हजार रुपये दिले जातील.
  • या योजनेच्या अंतर्गत १२ महिन्यांच्या विक्रीवर, लाभार्थ्यांना १०% अतिरिक्त प्रोत्साहन मिळेल. जे प्रति महिना अंदाजे दहा हजार रुपये असेल.

प्रधानमंत्री जन औषधि योजनेसाठी पात्रता

  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • सर्व वर्गातील लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • बेरोजगार आणि नोकरी करणारे दोन्ही लाभार्थी अर्ज करू शकतात.
  • अर्जदार नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार डॉक्टर किंवा मेडिकल स्टोअर मध्ये कार्यरत असावा.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षां पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराकडे BPHARMA / DPHARMA पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे किमान १२० चौरस फूट स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली जागा असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री जन औषधि योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे| PM Jan Aushadhi Yojana IMP Documents|

  • बँक खाते.
  • आधार कार्ड.
  • जात प्रमाणपत्र.
  • वैद्यकीय कागदपत्रे.
  • मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेसाठी अर्ज कसा करावा| PM Jan Aushadhi Yojana Online Apply|

  • प्रधानमंत्री जन औषधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • तुम्ही अधिकृत वेबसाईटवर क्लिक करताच तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
  • या पेज वरती तुम्हाला ‘अप्लाय फॉर केंद्र’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • आता तुम्हाला या पेजवरील ‘अप्लाय ऑनलाइन’ या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
  • यानंतरचे पेज आल्यानंतर तुम्हाला ‘रजिस्टर नाऊ’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर या योजनेचा नोंदणी फॉर्म उघडेल.
  • आता हा फॉर्म तुम्ही काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि यात विचारलेली सर्व माहिती खरी भरायचे आहे. सोबतच यात अपलोड करण्याचे डॉक्युमेंट नीट अपलोड करायचे आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर सब्मिट बटणावर क्लिक करा. सब्मिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होऊन अर्ज स्वीकारला जाईल.

प्रधानमंत्री जन औषधि केंद्र हेल्पलाइन क्रमांक

हेल्पलाइन नंबर – 1800-180-8080

मित्रांनो, ‘प्रधानमंत्री जन औषधि योजनेबद्दल’ ची संपूर्ण माहिती तुम्ही या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. त्यामुळे ही पोस्ट तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून या योजनेची माहिती त्यांना मिळून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत