Header Ads

Breaking News

आयुष्यमान भारत कार्ड काय आहे? आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कसा करायचा? Ayushman Bharat Card In Marathi| Ayushman Bharat Yojana Online Apply|

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की, आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवनात आरोग्य विमा किती महत्त्वाचा आहे. परंतु आजही आपल्या देशातील बरीच लोकसंख्या या विम्यापासून दूर राहते.

त्याचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबांची आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने देशातील बहुतांश परिवार इच्छा असूनही, आरोग्य विमा करू शकत नाही. कारण त्यांना तो खर्च परवडणारा नसतो.

तथापि, देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिवारांना सरकारकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. जेणेकरून देशातील कोणताही नागरिक त्याच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारच्या उपचारापासून वंचित राहून.

त्याच, अनुषंगाने कमकुवत परिस्थिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांनाही आरोग्य विम्याचा लाभ घेता यावा. या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने, आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो.

मित्रांनो, आजच्या या लेखातून तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेसंबंधी किंवा आयुष्यमान भारत कार्ड संबंधी संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखात तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेचे फायदे, आयुष्यमान भारत योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती तसेच आयुष्मान भारत योजनेबद्दल इतर माहिती या लेखातून तुम्हाला जाणून घेण्यास मिळणार आहे.

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना काय आहे? PM Ayushman Bharat Yojana In Marathi|

‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेद्वारे’ गरीब कुटुंबातील लोकांना किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा उपलब्ध करून दिला जातो. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलिकृत रुग्णालयांद्वारे पाच लाख रुपयांपर्यंतचे सर्व उपचार मोफत करून दिले जातील.

देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. ‘आयुष्यमान भारत योजना’ ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १८ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू केली होती. देशातील ४० कोटींहुन अधिक नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे लक्ष आहे.

आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ही योजना कार्यान्वयीत झाल्यामुळे देशातील एकही नागरिक आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही उपचारापासून वंचित राहणार नाही. याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशातील नागरिकांचे जीवनमानही उंचावण्यास मदत होईल.

आयुष्यमान भारत योजनेचा तपशील| Ayushman Bharat Yojana Detailed Information In Marathi|

योजनेचे नावप्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना
योजना कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेन्द्र मोदी
योजना कधी सुरू झाली१४-०४-२०१८
लाभार्थीभारताचे नागरिक
उद्दिष्टआर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना ०५ लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध करून देणे.
अधिकृत वेबसाइटhttps://pmjay.gov.in/

आयुष्यमान भारत योजनेची उद्दिष्टे

देशातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांमध्ये, एखाद्या व्यक्तीस दुर्धर आजार झाल्यास, कुटुंबातील आर्थिक अडचणीमुळे, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होत नाही.

सर्वसामान्य जनतेची समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्यमान भारत योजना’ ही योजना सुरू केलेली आहे.

‘आयुष्मान भारत योजनेच्या’ माध्यमातून देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना आरोग्य विमा प्रदान करून, आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा

वैद्यकीय तपासणी आणि उपचार
रुग्णालयात दाखल होणे
औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
रुग्न देखभाल सेवा
क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
वैद्यकीय मलमपट्टी सेवा
आवास लाभ
अन्न सेवा
उपचारादरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशन्स चे उपचार
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंतचे फॉलोअप
विद्यमान रोगावर उपचार

आयुष्यमान भारत योजनेचे फायदे| Ayushman Bharat Yojana Benefits In Marathi|

  • या योजनेच्या माध्यमातून १० कोटींहुन अधिक बीपीएलधारक परिवारांचा समावेश या योजनेत केला जाणार आहे.
  • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना उपचारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा दिला जातो.
  • २०११ मध्ये जी कुटुंबे सूचीबद्ध आहेत. त्यांचाही PMJAY योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.
  • या योजनेअंतर्गत रुग्णांवरील औषधांचा उपचारांचा खर्च शासन करणार असून, १३५० आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही रुग्णाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.
  • आयुष्यमान भारत योजना जन आरोग्य योजना म्हणून ओळखले जाते.
  • या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि परिस्थितीने कमकुवत असणाऱ्या गरीब लोकांना उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता करण्याची गरज नाही.

आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Ayushman Bharat Yojana IMP Documents|

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर

आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करायचा? Ayushman Bharat Yojana Online Application|

  • सर्वप्रथम, आयुष्यमान भारत योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल. तुमच्या सर्व मुळ कागद पत्रांच्या छायाप्रती तेथे सब्मिट कराव्या लागतील.
  • यानंतर, लोकसेवा केंद्र (CSC) चा एजेंट तुमच्या सर्व कागद पत्रांची पडताळणी करेल आणि या योजने अंतर्गत नोंदणी सुनीश्चीत करल आणि तुम्हाला नोंदणी प्रदान करेल.
  • त्यानंतर, १० ते १५ दिवसांनंतर तुम्हाला लोक सेवा केन्द्रा द्वारे आयुष्यामान भारतचे गोल्डन कार्ड प्रदान केले जाइल.
  • यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होईल.

आयुष्यमान भारत हेल्पलाइन नंबर| Ayushman Bharat Yojana Helpline Number|

Toll Free Call Center Number – 14555/1800111565

मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेच्या माहितीचा हा लेख तुमच्या सर्व मित्र – मैत्रीणींना शेअर करा, जेणे करून त्यांना या योजनेची माहिती मिळेल आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत