Header Ads

Breaking News

पंतप्रधान ग्रामिण आवास योजना काय आहे? PM Gramin Awas Yojana In Marathi| PM Gramin Awas Yojana Online Apply|

 मित्रांनो, आजही देशात असे अनेक नागरिक आहेत. ज्यांना स्वतःच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे घर बांधता येत नाही. आणि जे जुने घर आहे, त्याची दुरुस्ती करून घेण्या इतके पैसे त्यांच्याकडे नसतात.

अशा सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान ग्रामीण आवास योजना’ सुरू केली आहे.

‘पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची’ सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये सुरू केली होती.

या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराच्या बांधकामासाठी आणि दुरुस्तीसाठी आर्थिक रक्कम दिली जाते. येईना अंतर्गत दिली जाणारी आर्थिक रक्कम मैदानी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये आहे तर, डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रुपये आहे.

मित्रांनो, या लेखाद्वारे ‘पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेबद्दलची’ संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्यामुळे आपण या लेखात पंतप्रधान ग्रामीण योजनेची सुरुवात कधी झाली? पंतप्रधान ग्रामीण योजनेअंतर्गत कोणा कोणाला लाभ घेता येतो, पंतप्रधान ग्रामीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पंतप्रधान ग्रामीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र| PM Gramin Awas Yojana Maharashtra|

या योजनेअंतर्गत एकूण खर्च १,३०,०७५ कोटी रुपये आहे. PMAY ग्रामिण अंतर्गत येणारा एकुन खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात ६०:४० सामाईक क्षेत्रांमधे आणि ९०:१० डोंगराळ भागासाठी करावयाचा आहे.

‘पंतप्रधान ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र’ अंतर्गत देशात २०२२ पर्यंत सर्व घरे पक्के करण्याचे काम केले जाणार होते. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत दुर्बल घटकांची लोकांना पक्के घर बांधण्यासाठी देण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात राहणाऱ्या उर्वरित आणि पात्र नागरिकांना पक्की घरे मिळू शकणार आहेत.

या योजनेचा विस्तार केल्यानंतर राहिलेली १५५.७५ लाख घरे बांधली जातील. यामुळे २.९५ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट गाठण्यात मदत होणार आहे. १५५.७५ लाख घरे बांधण्यासाठी सरकार १,९८,५८१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचा तपशील| PM Gramin Awas Yojana Detailed Information|

योजनेचे नावपंतप्रधान ग्रामिण आवास योजना
संबंधित मंत्रालयग्रामिण विकास मंत्रालय भारत सरकार
योजनेची सुरुवात२०१५
उद्देशसर्व असहाय्य कुटुंबांना पक्के घर बांधून देणे
योजनेचा प्रकारकेंद्र सरकारची योजना
लाभार्थ्यांची निवडSECC – 2011 Beneficiary
अनुदानाची रक्कम१,२०,०००
राज्याचे नावमहाराष्ट्र
जिल्हामहाराष्ट्रातील सर्व जिल्हे
अधिकृत संकेतस्थळpmay.g.nic.in
पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची उद्दिष्टे

आपल्या देशातील ग्रामीण भागात राहणारे आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोक, ज्यांना स्वतःचे घर बांधायचे आहे. परंतु त्यांच्या कमकुवत परिस्थितीमुळे ते स्वतःचे पक्के घर बांधू शकत नाही, अशा लोकांना या योजनेतून आर्थिक मदत देऊन पक्के घर बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे.

देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ नागरिकांना एक लाख वीस हजार रुपये पर्यंतची मदत पक्के घर बांधण्यासाठी देण्यासोबतच, बारा हजार रुपयांची मदत शौचालय बांधण्यासाठी दिली जाणार आहे.

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचे लाभार्थी

  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
  • कोणत्याही जाती किंवा धर्माच्या महिला
  • मध्यमवर्ग १
  • मध्यमवर्ग २
  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • कमी उत्पन्न असलेले लोक

पंतप्रधान आवास योजनेचे वैशिष्ट्ये| PM Awas Yojana In marathi|

  • पंत प्रधान ग्रामिण आवास योजने अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत स्वयंपाक घरासाठीच्या क्षेत्रासह गृहनिर्माणासाठीची जागा २० चौरस मीटर वरून २५ चौरस मीटर पर्यंत वाढवली जाईल.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत मैदानी भागात एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागात एक लाख तीस हजार रुपये असणार आहे.

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची पात्रता| PM Gramin Awas Yojana Eligibility|

  • या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदाराच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसावे.
  • अर्जदार दारिद्र रेषेखाली (BPL) जगत असावा किंवा त्याचे कुटुंबाचे उत्पन्न ०३ ते ०६ लाख रुपये दरम्यान असावे.
  • अर्जदार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा कमी उत्पन्न गटातील किंवा दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत कोणत्याही अर्जदाराच्या फक्त एका बांधकामाला मंजुरी दिली जाईल.

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| PM Gramin Awas Yojana IMP Documents|

  • पत्त्याचा पुरावा
  • आधार कार्ड
  • घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र
  • ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा| PM Gramin Awas Yojana Online Apply|

  • पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला डेटा एन्ट्री चा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • आता pmayg ऑनलाइन अर्ज तुमच्या स्क्रीनवर उघडेल, तुम्हाला या फॉर्म वरती दोन पर्याय दिसतील एक शहरी भागासाठी आणि दुसरा ग्रामीण भागासाठी.
  • आता तुम्हाला ग्रामीण ऑनलाईन अर्जावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर ग्रामीण अर्जाचा फॉर्म उघडेल ह्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावायाची आहे. आणि आवश्यक असलेले कागदपत्रे या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे.
  • यानंतर सबमिट पर्यावरण क्लिक करून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज करू शकता.

मित्रांनो, या लेखातील पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची संपूर्ण माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना जरूर शेअर करा. जेणेकरून त्यांना योजनेची माहिती मिळेल आणि या योजनेचा ते लाभ घेऊ शकतील धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत