Header Ads

Breaking News

पीेएम मुद्रा योजना काय आहे? PM Mudra Yojana In Marathi| What Is Mudra Loan Yojana?

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात तुम्हाला पीेएम योजना काय आहे? मुद्रा योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे कोणते? मुद्रा योजनेचे काय फायदे काय आहे? मुद्रा योजनेचे वैशिष्ट्ये? मुद्रा योजनेचे उद्दिष्ट आणि मुद्रा योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो जर तुम्हाला तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, अशा परिस्थितीत प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला १०,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दलचा हा संपूर्ण लेख जरूर वाचा.

मुद्रा योजना काय आहे? Mudra Yojana In Marathi

मित्रांनो पीएम मुद्रा योजने करिता केंद्र सरकारने ०३ लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते. त्यापैकी १.७५ लाख कोटी रुपयांची कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

मुद्रा योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मुद्रा कर्ज घेण्यासाठी मुद्रा कार्ड दिले जाते.

मुद्रा कर्जासाठी कर्जदाराकडून कोणत्याही तारणाची आवश्यकता नसते.

पीेएम मुद्रा योजनेचा तपशील PM Mudra Yojana Detailed In Marathi|

योजनेचे नावप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
योजना कोणी सुरू केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लाभार्थीमध्यम व लहाण उद्योजक
उद्दिष्टव्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणे
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mudra.org.in

पीेएम मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्ट

आज जरी भारत विकसनशील देश असला, तरी प्रचंड वेगाने विकसित देश बनण्याकडे वाटचाल करीत आहे. अशातच देशातील लहान, मोठे उद्योग भारताच्या विकसित राष्ट्र होण्याच्या प्रवासात हातभार लावताना दिसत आहेत.

त्यामुळेच केंद्र सरकारने अशा लहान, मोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी, आणि या उद्योगांची भरभराट करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना या योजनेची सुरुवात केलेली आहे.

या योजनेअंतर्गत भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगात गुंतलेले व्यापारी किंवा लाभार्थी कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. किंवा पहिल्यापासून चालू असलेला व्यवसायात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकतात.

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील अधिकाधिक तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. जेणेकरून देशातील बेरोजगारी आणि गरिबी कमी होईल त्यासोबत देशाची प्रगती झपाट्याने होईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रकार

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

मुद्रा कर्जाचे प्रकारकर्ज वाटपाची रक्कम
शीशु५०,००० रु पर्यंत
किशोर५०,००० ते ५,००,००० रु पर्यंत
तरूण५, ००,००० ते १०,००,००० रु पर्यंत.

पीेएम मुद्रा योजने अंतर्गत कोण कर्ज मिळवू शकते.

एकल मालक (सोलर प्रॉपराइटर)
पार्टनरशीप
सेवा क्षेत्रातील कंपण्या
सूक्ष्म उद्योग
दुरुस्तीची दुकाने
ट्रक मालक
अन्न संबंधित व्यवसाय
माइक्रो मेनूफैक्चरिंग फर्म

पीेएम मुद्रा कर्ज योजनेचे फायदे

  • देशातील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
  • या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, हमीशिवाय कर्ज दिले जाईल.
  • याशिवाय कर्ज प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क घेतले जात नाही.
  • मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज परत फेडीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
  • कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्याला मुद्रा कार्ड मिळते. ज्याच्या मदतीने मिळालेली रक्कम व्यावसायिक गरजांवर खर्च करता येते.

मुद्रा कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Mudra Loan Yojana Important Documents|

मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते –

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अर्जदाराचा कायमचा पत्ता
  • व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
  • मागील तीन वर्षांची बॅलन्स शीट
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा सामग्री यांचे कोटीशन किंवा बिले.

मुद्रा कर्ज योजनेसाठी पात्रता| Mudra Loan Yojana Eligibility|

  • मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेणारा अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
  • या योजनेचा लाभ फक्त सरकारी बँकेतच घेता येणार.
  • लहान व्यवसाय सुरू करणारे लोक आणि ज्या लोकांना त्यांचा लहान व्यवसाय आणखी वाढवायचा आहे, अशे लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या बँका

अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, आयसीआयसीआय बँक, जे एंड के बँक, पंजाब आणि सिंध बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, बँक ऑफ महाराष्ट्र,,देना बँक, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, कर्नाटक बँक, तमिळनाडू मर्कंटाइल बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, फेडरल बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, सारस्वत बँक, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, इंडियन ओवरसिज बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया. इत्यादी बॅंका पीएम मुद्रा कर्ज योजनेच्या मिल आहेत.

मुद्रा लोन साठी अर्ज करण्याची पद्धत| PM Mudra Loan Online Apply|

  • सर्वप्रथम कोणत्याही सरकारी बँकेच्या वेबसाईटवरून मुद्रा लोन अर्ज डाऊनलोड करा.
  • आता डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या या सोबतच महत्त्वाची कागदपत्रे जोडा.
  • रेफरन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज सबमिट करा
  • यानंतर कर्जाची औपचारिकता पुढे नेण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. त्यामुळे संदर्भ आयडी क्रमांक तुमच्या जवळ जपून ठेवा.
  • कर्जाचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर केली जाईल आणि बँकेद्वारे तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

कर्जदार मुद्रा लोन योजनेतून कर्ज घेण्यासाठी उद्यममित्र पोर्टलवर (www.udyamimitra.in) ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

मुद्रा कर्ज योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया| Mudra Loan Offline Apply|

  • पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पीएम मुद्रा कर्ज योजना ऑफर करण्यासाठी तयार असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेला भेट द्या.
  • बँकेच्या काउंटरवर सर्व आवश्यक कागदपत्रांसह कर्जाचा अर्ज भरा आणि आणि बँकेत जमा करा.
  • बँकेसोबत कर्जाची पुढील सर्व औपचारीक प्रक्रिया पूर्ण करा.
  • सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि कागद पत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्ज मंजूर केले जाईल.
  • कर्ज मंजुरीनंतर, निश्चित केलेली रक्कम, कर्ज खात्यात काही दिवसात जमा केली जाईल.

मित्रांनो, पंतप्रधान मुद्रा लोन योजनेची माहिती तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. तसेच नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळून, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील, आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत