Header Ads

Breaking News

पीेएम किसान संपदा योजना काय आहे? पीेएम किसान संपदा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? PM Kisan Yojana Online Application In Marathi|

कृषि क्षेत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारकडून अनेक योजना आणि कार्यक्रम राबवले जातात. ज्याद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातुन अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्या मुळे या योजनेची संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकरी बांधवाकडे असणे गरजेचे आहे. त्या मुळे आम्ही या लेखात ‘पीेएम संपदा योजनेची’ संपूर्ण माहिती देणार आहोत. जेणे करून सर्व शेतकरी बांधवांना या योजनेची माहिती मिळून, या योजनेचा लाभ घेता येईल.

या लेखात तुम्हाला ‘पीेएम किसान संपदा योजनेची’ उद्दिष्टे, फायदे, वैशिष्टे, पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्जकरण्याची प्रक्रिया इत्यादीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पीेएम किसान संपदा योजना काय आहे?

केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ कृषि सागरी प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया क्लस्टर (Agro marine processing and Development of Agro Processing Clusters) उद्योग विकसित करण्यासाठी तयार केली आहे.

ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत राबवली जाणार आहे. किसान संपदा योजना हे एक सर्व समावेशक पॅकेज आहे. याद्वारे फार्म गेट पासुन ते रीटेल आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापणासह आधुनिक पायाभुत सुविधा मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातील.

या योजनेच्या माध्यमातुन देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्राचा विकास तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांना चांगला परतावा देखिल मिळेल. ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रभावी ठरेल.

याशिवाय या योजनेच्या माध्यमातुन देशातील ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. २०२० मधे या योजने अंतर्गत ३२ नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले होते. त्यासाठी सरकारने ४०६ कोटी रुपयांची तरतुद केली होती.

पीेएम किसान संपदा योजनेचा तपशील

योजनेचे नावपीेएम किसान संपदा योजना
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभार्थीदेशातील शेतकरी
अधिकृत वेबसाइटhttps://www.mofpi.gov.in

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे उद्दिष्ट

कृषि सागरी प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया क्लस्टर विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या शिवाय शेतापासुन ते रीटेल आउटलेट पर्यंत कार्यक्षम व्यवस्थापणासह पुरवठा साखळी तयार करणे हा देखिल या योजनेचा मुख्य हेतु आहे.

या योजनेमुळे कृषि क्षेत्राचा विकास होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न देखिल वाढणार आहे. याशिवाय या योजनेच्या माध्यमातुन ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.

योजनेचे वैशिष्टे आणि फायदे

  • या योजनेद्वारे कृषि – सागरीय प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया क्लस्टर विकसित केले जातील.
  • किसान संपदा योजना हे एक सर्व समावेशक पॅकेज आहे, ज्या द्वारे फार्म गेट पासुन ते रीटेल आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापणासह आधुनिक पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातील.
  • देशात अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकास होईल आणि शेतकऱ्यांना चांगला परतावा देखिल मिळेल.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पात्रता आणि महत्वाची कागद पत्रे

  • अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका
  • वयाचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

पीएम किसान संपदा योजनेसाठी अर्ज कसा करावा

  • पीेएम किसान संपदा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान संपदा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
  • होम पेजवर तुम्हाला अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या स्क्रीनवर अर्ज उघडेल.
  • तुम्हाला या अर्जात विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती भरायची आहे.
  • आता तुम्हाला सर्व महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी अर्ज करू शकता.

मित्रांनो या योजनेची माहिती आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून ते या योजनेची माहिती मिळवून या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत