Header Ads

Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे? जाणून घ्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेविषयी संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील कुटुंबे आणि राज्यातील निराधार जनतेला मोफत उपचार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात केली आहे.

योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबांना आणि गरीब कुटुंबांना तसेच मागासवर्गीय कुटुंबांना आरोग्य विषयीचे उपचार मोफत मिळणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत निवडक आजारांवर शासकीय किंवा खाजगी अंगीकृत रुग्णालयांच्या मार्फत पात्र शिधापत्रिकाधारक आणि अन्य पात्र लाभार्थी गटांना निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

ही योजना पूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती.

या योजनेला ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावात परिवर्तन करून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ असे नाव देण्यात आले.

दिनांक २३ सप्टेंबर २०१८ पासून भारत सरकारचे आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या सुरू करण्यात आलेल्या आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना कोविड-१९ चे उपचार सुद्धा मोफत दिले जातात. ही योजना लाभार्थी कुटुंबासाठी जास्तीत जास्त १,५०,००० रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा तपशील

योजनेचे नावमहत्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र आरोग्य मंत्रालय
योजनेचे उद्दिष्टगरजूंना आरोग्य सेवा पुरावने
लाभार्थीमहाराष्ट्राचे नागरिक
अधिकृत संकेत स्थळwww.jeevandayee.gov.in
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची पात्रता काय आहे?

  • ही योजना राज्यातील कोणत्याही गरीब व निराधार व्यक्तीस आरोग्य कवच प्रदाण करते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे अन्नपूर्णा कार्ड / पिवळे व केशरी राशन कार्ड / किंवा अंत्योदय अन्न योजना कार्ड (AAY) असावे.
  • कृषी संकटग्रस्त चौदा जिल्ह्यातील शेतकरीही या योजनेत समाविष्ट आहे.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

शिधापत्रिकांव्यतिरिक्त लाभार्थीच्या पडताळणी वेळी खालील कागदपत्रे केवायसीसाठी आवश्यक असतील.

  • पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड /राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पहिल्या पानाच्या छायाचित्रासह.
  • शिधापत्रिका.
  • ड्रायव्हिंग लायसन्स / शाळा / कॉलेज आयडी.
  • पासपोर्ट.
  • अर्जदाराच्या छायाचित्रावर तहसीलदारांचे शिक्के.
  • अपंग असल्यास अपंग असल्याचे.
  • भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने जारी केलेला कोणताही एक फोटो आयडी पुरावा.
  • केंद्र किंवा राज्य सरकारने जाहीर केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड.
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र.
  • जर नवजात बालकाचा फोटो उपलब्ध नसल्यास, तर पालक त्याचा फोटो जन्माचा दाखला आणि शिधापत्रिकेसोबत सादर करू शकतात.
  • शेतकरी कुटुंबातील सदस्य हा शेतकरी असल्याचे नमूद केलेले प्रमाणपत्र.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये

  • विम्याची रक्कम एका कुटुंबासाठी वार्षिक १.५ लाख रुपये.
  • या योजनेत औषध, शस्त्रक्रिया उपचार, निदान आणि सल्ला मसलत यावरील उपचार खर्च समाविष्ट आहे.
  • योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण कौटुंबिक फ्लोटर आणि वैयक्तिक आधारावर प्रदान केले जाते.
  • आरोग्य विमा प्रीमियम आणि उपचार शूल्काचा, खर्च राज्य सरकार उचलते.
  • योजनेचा सर्वात चांगला भाग असा आहे की, पहिल्या दिवसापासून आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांवर दावा अनुज्ञेय आहे.
  • या योजनेत शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात येणाऱ्या आयोग्य शिबिरांमध्ये प्रवेश दिला जातो.
  • लाभार्थी सरकारी आणि खाजगी पॅनलमधील रुग्णालयांमार्फत वैद्यकीय उपचार घेऊ शकतात.

महात्मा ज्योतिबा फुले योजनेत कोणते उपचार समाविष्ट आहे?

या योजनेत विशिष्ट सेवांतर्गत ९७१ उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश असणार आहे. या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सेवा व उपचार असणार आहेत.

सर्व साधारण शस्त्रक्रियाकान, नाक, घसा शस्त्रक्रिया
नेत्ररोग शस्त्रक्रियास्त्री रोग व प्रसुतीशास्त्र
अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रियापोट व जठर शस्त्रक्रिया
कार्डियोव्ह्यास्क्युलर थोऱ्यासिक सर्जरीबालरोग शस्त्रक्रिया
प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रियामज्जातंतू विकृतीशास्त्र
कर्करोग शस्त्रक्रियावैद्यकीय कर्करोग उपचार
रेडिओथेरपी कर्करोगत्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीतपॉलीट्रॉमा
प्रोस्टेशीसजोखमी देखभाल
जनरल मेडिसिनसंसर्गजन्य रोग
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापनहृदयरोग
नेफ्रोलॉजीन्यूरोलॉजी
पल्मोनोलॉजीचर्मरोग चिकित्सा
रोमेटोलॉजीइंडोक्राइनोलॉजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलॉजीइंटरवेंशनल रेडिओलॉजी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणती रुग्णालये समाविष्ट आहे?

शासकीय आणि निमशासकीय तसेच खाजगी आणि धर्मदाय संस्थेच्या रुग्णालयांची तीस खाटांपेक्षा जास्त खाटा असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल समाविष्ट आहे.

अंगीकृत रुग्णालयांची एकूण संख्या १,००० इतकी असून, सद्यस्थितीत ९९९ रुग्णालय अंगीकृत आहेत. त्यापैकी २८२ सरकारी रुग्णालय आहेत तर, ७२७ खाजगी रुग्णालये आहेत.

लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रुग्णालयात उपचार करू शकतात.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणी कशी करायची

  • अर्ज सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळच्या सामान्य / जिल्हा / महिला / नेटवर्क हॉस्पिटलमधे आरोग्य मित्राला भेटणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी ला आरोग्य मित्र कडुन हेल्थ रेफर कार्ड दिले जाईल. जे नेटवर्क हॉस्पिटलला शिफारस केलेल्या उपचारांसाठी दाखवता येईल.
  • या कार्ड सोबतच केसरी / पिवळे कार्ड किंवा रेशन कार्ड उपलब्ध नसल्यास, अन्नपूर्णा कार्ड देणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांच्या हेल्थ कार्डचे वेरिफिकेशन झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल होता येईल आणि उपचार सुरू होतील.
  • विमा कंपनीकडून ई – ऑथोरायझेशन विनंती पाठवली जाईल आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने द्वारे त्याचे पुनरावलोकन केले जाईल.
  • अधिकृतता पूर्ण झाल्यानंतर आणि विनंती मंजुर झाल्यानंतर कॅशलेस उपचार सुरू होतील.
  • क्लेम सेटलमेंटसाठी हॉस्पिटल लाभार्थीचे मूळ बिले आणि डॉक्युमेंट विमा कंपनी सोबत शेअर करेल, कागदपत्रांचे पुनरावलोकन केल्यानंतर आणि दावा मंजूर झाल्यानंतर, हॉस्पिटलला विमा कंपनीकडून पैसे दिले जातील.
  • डिस्चार्ज मिळाल्यानंतर १० दिवसानंतर तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये मोफत सल्ला मसलत आणि निदान सेवा घेऊ शकता.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी दावा कसा दाखल करायचा?

  • पॅनल केलेल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय स्थितीचे निदान केले जाते, आणि उपचार सुरू करण्यासाठी विमा कंपनी पूर्व अधिकृतता पाठवते.
  • पॅनल नसलेल्या हॉस्पिटलमध्ये या आजाराचे निदान झाले असल्यास, हॉस्पिटल मधील आरोग्यमित्र तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यासाठी एक रेफरल कार्ड देईल.
  • हॉस्पिटलला विमा कंपनीकडून मान्यता मिळाल्यानंतर हॉस्पिटल उपचार सुरू करेल.
  • उपचार किंवा शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय विमा कंपनीला आवश्यक कागदपत्रे प्रदान करेल. यामध्ये वैद्यकीय अहवाल, बिले, निदान अहवाल, डिस्चार्ज सारांश इत्यादींचा समावेश आहे.
  • दावा मंजूर केल्या जाईल आणि त्यानंतर तुम्ही दहा दिवस रुग्णालयात मोफत उपचार आणि सुविधांचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो, हा लेख तुमच्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना व नातेवाईकांना जरूर शेअर करा. जेणेकरून ते या योजनेची माहिती मिळवून या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत