Header Ads

Breaking News

लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे करायचा? जानून घ्या लेक लाडकी योजने विषयी संपूर्ण माहिती.

मित्रांनो, लेक लाडकी योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने २०२३ मध्ये केलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही गरीब कुटुंबातील मुलींसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींन एक लाख एक हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल.

महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ – २४ चा अर्थसंकल्प सादर करताना लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत गरिब कुटुंबातील मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

आजच्या या लेखात आपण लेक लाडकी योजना काय आहे? लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? लेक लाख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? लेक लाडकी या योजनेचे फायदे? लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे लेक लाडकी योजनेची माहिती हा लेक शेवटपर्यंत वाचा.

लेक लाडकी योजना २०२४ काय आहे?

लेक लाडकी योजना लॉन्च करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पात केली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने या योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक लाभ दिला जाणार आहे.

योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत पाच टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाईल. आर्थिक मदतीची रक्कम मिळाल्यानंतर मुलींच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जेणेकरून मुली उच्चशिक्षित होऊन देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत करू शकतील आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदलू शकतो.

महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेची सुरुवात विशेषता ज्या मुलींचे कुटुंब अतिशय गरीब आहेत, किंवा त्यांची परिस्थिती अत्यंत मागासलेली आहे, अशा मुलींसाठी सुरू केलेली आहे.

लेक लाडकी योजना अशा मुलींसाठी त्यांच्या जन्मापासून त्यांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण आणि त्यांचे उज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. जेणेकरून त्यांचे पुढील शिक्षण आणि प्रगती मध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. या योजनेमुळे मध्यम आणि गरीब कुटुंबातील मुली रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदावरती जाऊ शकतील.

लेक लाडकी योजनेचा तपशील

योजनेचे नावलेक लाडकी योजना
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२३ – २४
योजनेची सुरुवातमार्च २०२३ च्या अर्थ संकल्पात
लाभार्थीमहाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुली
उद्दिष्टगरीब कुटुंबातील मुलींना शिक्षित आणि सक्षम बनवने
योजनेत मिळणारी एकुण रक्कमएक लाख एक हजार रुपये
लाडकी योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकार गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. महाराष्ट्र सरकारच्या योजनांपैकी एक अशी लेक लाडकी योजना आता महाराष्ट्र सरकारने २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पात सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे ही योजना मध्यम आणि गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांकडे पिवळ्या आणि केशरी रंगाच्या शिधापत्रिका आहेत. या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींना बळकट करणे.
  • गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण देणे
  • महाराष्ट्रातील अशिक्षित मुलींना शिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • मुलींचे मृत्यूचे प्रमाण कमी करणे
  • महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण देणे
  • लेक लाडकी योजनेतून आर्थिक मदत करून मुलींना स्वावलंबी बनवणे.
  • या योजनेच्या मदतीच्या माध्यमातून मुलींना त्यांच्या भविष्यासाठी योग्य ती दिशा निवडता येईल.

लेक लाडकी योजनेचे फायदे

  • लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब कुटुंबातील व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना शिक्षणाची संधी मिळणार आहे
  • चांगले शिक्षण मिळाल्याने गरीब कुटुंबातील मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलीच्या जन्मावर पाच हजार रुपये दिले जातील.
  • जेव्हा मुलगी पहिली वर्गात प्रवेश घेईल, तेव्हा तिला सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाईल.
  • जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेईल, तेव्हा तिला सात हजार रुपये मिळतील.
  • जेव्हा मुलगी अकरावी या वर्गात प्रवेश घेईल, तेव्हा तिला ८,००० रुपये दिले जातील.
  • शेवटी जेव्हा लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईल त्यावेळेस तिला पुढील शिक्षणासाठी ७५ हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाईल.

लेक लाडकी योजनेत उपलब्ध असलेल्या लाभांची यादी

मुलीचे वयमिळणारी रक्कम
मुलीच्या जन्मावर५,००० रु.
पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी६,००० रु.
सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी७,००० रु.
अकरावित प्रवेश घेण्यासाथी८,००० रु.
मुलगी १८ वर्षांची झाल्यावर७५,००० रु.
एकुण प्राप्त रक्कम१,०१,००० रु. 

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, सर्वप्रथम या योजनेची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे. या योजनेची पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • पिवळ्या किंवा केसरी रंगाचे शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र असतील.
  • मुलगी महाराष्ट्रातील गरीब व मागासवर्गीय कुटुंबातील असावी
  • लाभार्थी कोणत्याही कराच्या कक्षेत येत नसावा, आणि त्याने कोणताही प्रकारचा कर भरलेला नसावा.
  • लाभार्थी मुलीकडे कोणत्याही प्रकारची कार, ट्रॅक्टर किंवा कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
  • लाभार्थी मुलगी कोणत्याही सरकारी खात्यात किंवा सरकारी कार्यालयात कार्यरत नसावी.
  • लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर, आई किंवा वडील दोघांपैकी एकाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे बंधन कारक राहिल.
  • एक एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मलेले एक किंवा दोन मुली किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असल्यासही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ते जन्माला आले, त्यापैकी एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास किंवा दोन्ही मुली असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना २०२४ साठी आवश्यक कागदपत्रे

  • पिवळे किंवा केसरी रंगाची शिधापत्रिका
  • लाभार्थी मुलीचे आधार कार्ड
  • लाभार्थीच्या आईचे आधार कार्ड
  • लाभार्थीच्या जन्माचा दाखला
  • लाभार्थीची आई आता हयात नसल्यास, वडिलांचे आधार कार्ड
  • कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी असावे)
  • पत्त्याचा पुरावा
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • पाचवा हप्ता घेताना अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • मतदार ओळखपत्र

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याकरिता, मुलीच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत, मुलीच्या जन्माची नोंद करणे आवश्यक राहील. त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

मित्रांनो, हा लेख तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि सर्व गरीब कुटुंबातील मुलींच्या पालकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल, आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत