नवीन मतदान कार्ड कसे काढायचे?
![]() |
| New Voter ID Online Apply |
मित्रांनो शैक्षणिक आणि सरकारी कामांसाठी किंवा मतदान करण्यासाठी मतदान कार्ड हे खूप उपयोगाचे आहे. तुम्ही वयाची १८ वर्षे पूर्ण केली असतील. आणि तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल, तर तुम्ही घरी बसल्या मतदान कार्डसाठी अर्ज करू शकता.
भारतात दरवर्षी कुठेना कुठे निवडणुका सुरूच असतात. त्या सोबतच निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सुद्धा सहभाग वाढताना दिसत आहे. मतदारांमध्ये तरुणांची संख्या सुद्धा अधिक आहे. अशातच तुम्ही जर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील आणि तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल, तर तुम्ही ते बनवून घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही घरबसल्या मतदान कार्डसाठी अर्ज करू शकता.
मतदान ओळखपत्र कसे काढायचे?
भारत सरकारने २०१५ पासून डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा आणि दाखले डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या शासकीय सेवा पोर्टलचा आणि वोटर हेल्पलाइन ॲप्सचा देखील समावेश आहे. या ॲपद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्रासाठी घरबसल्या अर्ज करू शकता. आजच्या या लेखाद्वारे तुम्हाला वोटर हेल्पलाइन ॲपच्या मदतीने आधार कार्ड वापरून घरबसल्या मतदान कार्डसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
मतदान करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान कार्डची आवश्यकता असते. अठरा वर्षे पूर्ण केलेली सर्व भारतीय नागरिक मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी निवडणूक आयोगाने एक ॲप (Voter Helpline) सुरू केले आहे. या ॲपद्वारे सर्व पात्र नागरिक मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत एप्लीकेशन वरून मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात.
मतदान कार्डची नोंद करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्याकडे फक्त आधारकार्ड असेल आणि तुमचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असेल, तर तुम्ही वोटर हेल्पलाइन ॲपवर जाऊन काही मिनिटांतच मतदान कार्डसाठी तुमची नोंदणी करू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ आणि पैसा वाचणार आहे.
मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे बँक खाते
- अर्जदाराच्या आधार कार्ड.
- अर्जदाराचा चालू असलेला मोबाईल नंबर.
- ड्रायव्हिंग लायसन्स.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- अर्ज करणारी व्यक्ती ही भारताची रहिवासी हवी.
- त्या व्यक्तीचं वय एक जानेवारी, एक एप्रिल किंवा एक ऑक्टोबर रोजी १८ वर्षे पूर्ण झालेले असायला हवे.
- काही दिवसातच ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होणार असेल ते ही अर्ज करू शकतात.
- जिथे तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करायची आहे. तिथले तुम्ही रहिवासी असायला हवे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत