विट्ठल रखूमाई वारकरी विमाछत्र योजना!
![]() |
| Vitthal Rakhumai Varkari Vima Chatra Yojana |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विट्ठल रखूमाई वारकरी विमाछत्र योजनेची सुरुवात केली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात येतात. पंढरपूरच्या दिशेने वारीमध्ये पायी प्रवास करत असताना एखाद्या वारकऱ्याला मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, त्या वारकऱ्यास आर्थिक मदत करण्याच्या हेतूने राज्य सरकारने 'विठ्ठल रखूमाई वारकरी विमाछत्र योजना' या योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून पीडित वारकरी किंवा त्याच्या वारसाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. चला तर पाहूया वारकरी विमा छत्र योजना अखेर आहे तरी काय? आणि आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो? या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
विठ्ठल रखुमाई वारकरी विमाछत्र योजना २०२३ संपूर्ण माहिती.
राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपुरात एकादशी वारी निमित्त येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी 'विठ्ठल रखूमाई वारकरी विमाछत्र योजना' या योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारने Iffco Tokio General Insurance Co. ltd या विमा कंपनीची निवड केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या सुमारे १५ लाख वारकऱ्यांसाठी या योजनेची तरतूद केलेली आहे. तसेच या योजनेअंतर्गत पायी वारीदरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास एक लाखाचा विमा आणि चार लाखांची आर्थिक मदत सरकारकडून वारकऱ्याच्या वारसास मिळणार आहे.
वारकऱ्याचा अपघात झाल्यास किती रक्कम मिळणार?
या योजनेअंतर्गत एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत वारकऱ्याचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले. तसेच हात, पाय, डोळे निकामी झाल्यास, या व्यतिरिक्त वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा काही रक्कम वारकऱ्याला दिली जाणार आहे. ती खालील प्रमाणे आहे.
- मृत्यु झाल्यास - ५ लाख रुपये.
- कायमचे अपंगत्व - १ लाख रुपये.
- आंशिक अपंगत्व - ५० हजार रुपये.
- वैद्यकीय उपचार - ३५ हजार रुपये.
- ही योजना पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त पायी आणि खाजगी किंवा सरकारी वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू आहे.
- अपघातग्रस्त वारऱ्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो ज्या गावचा रहिवासी आहे. तेथील संबंधित तहसील अधिकार्यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
- अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास, अर्जासोबत मृत्यु प्रमाणपत्र जमा करावे लागणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत