मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय आहे? जानून घ्या संपूर्ण माहिती.
![]() |
| मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. ही योजना एक जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेची पात्रता काय आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेविषयी संपूर्ण माहिती.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा' लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सरकारकडून नमूद करण्यात आले होते. मात्र आता लाडक्या बहिणीकडे आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक नसल्यासही अर्ज करता येणार आहे. महिलेकडे १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड किंवा राशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक कागदपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर, अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आता उत्पन्नाचा दाखला लागणार नाही
दरम्यान सुरुवातीला कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असले तरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र आता या अटीत बदल करण्यात आलेला आहे. मात्र जर तुमच्याकडे हा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केसरी राशन कार्ड उपलब्ध आहे. त्यांना उत्पन्नाचा दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची' मुदत आणि वयात केलेली वाढ
सुरुवातीला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्याची मुदत १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मुदतीत सुधारणा करण्यात येणार असून आता सदर मुदत पुढील दोन महिन्यासाठी ठेवण्यात येणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहेत.
तसेच, या योजनेअंतर्गत आता २१ ते ६५ या वयोगटातील सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे. सुरुवातीला या योजनेसाठी २१ ते ६० हा वयोगट निर्धारित करण्यात आला होता. परंतु नंतर यात सुधारणा करण्यात आली. तसेच कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर जमीन असल्यास त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु ही जमिनीची अट शीथील करण्यात आलेली आहे. जमिनीच्या मालकीची अट आता काढून टाकण्यात आली आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
१) 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वरती नारीशक्ती हे ऐपप सर्च करून ते एप इंस्टॉल करायचे आहे. या ॲपद्वारे तुम्ही अनेक जणांचे अर्ज भरू शकता.
२) आता ॲप इंस्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा.
३) आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओटीपी आणि टर्म एंड कंडिशन, यावर क्लिक करून या ऐप्लिकेशनवर लॉगिन करून घ्यायचे आहे.
४) त्यानंतर आता तुमच्या समोर प्रोफाइल अपडेट करा असे ऑप्शन दिसेल.
५) त्यात तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे बचत गट अध्यक्ष, सर्वसामान्य महिला, गृहिणी, ग्रामसेवक या सर्व गोष्टी भरायच्या आहेत.
६) आता तुमच्या समोर तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल.
७) आता तुम्हाला नारीशक्ति दुत या पर्यायावर क्लिक करून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
८) त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला अप्लिकेशन लोकेशनला परवानगी द्यावी लागेल.
९) आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर जी माहिती आहे. ती तुम्हाला त्या ठिकाणी अचूक भरायची आहे.
१०) तुम्हाला आधार कार्ड वडील तुमचे संपूर्ण नाव जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव तुमचे गाव, तालुका जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक, आणि तुम्ही इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरायची आहे.
११) जर तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत नसेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
१२) याच्यानंतर तुम्हाला तुमचतुमची वैवाहिक स्थिती काय आहे? हे भरायचे आहे.
१३) त्या सोबतच तुम्हाला महिलेचे लग्नाआधीचे संपूर्ण नाव हे सर्व नमूद करायचे आहे.
१४) जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर हो निवडा आणि महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
१५) यानंतर अर्जदाराच्या बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाऊंट नंबर, नाव, बँकेचा आयएफएससी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे.
१६) यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसेल.
१७) त्यात आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
१८) आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन येईल.
१९) या ठिकाणी तुम्हाला कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेर्याने अर्जदार महिलेचा फोटो काढून अपलोड करायचा आहे.
२०) फोटो काढून आपल्या अपलोड झाल्यानंतर, ''Accept हमीपत्र डिस्क्लेमर'' यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी व शर्ती काय आहेत, याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते एक्सेप्ट करायचे आहे.
२१) यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या 'सबमिट फॉर्म' या बटनावर क्लिक करायचे आहे.
२२) आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
२३) अशा पद्धतीने तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेसाठीचा अर्ज पूर्ण झालेला आहे.
मित्रांनो आम्हाला आशा आहे की, या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना' या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळाली असेल. आणि 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली असेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत