बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे, 'कृषि घर' बांधण्यासाठी कर्ज| Bank Of Maharashtra Farm House Loan|
![]() |
| Bank Of Maharashtra Farm House Loan |
तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या शेतावर फार्म हाऊस बांधण्याची इच्छा आहे, परंतु आर्थिक अडचणींमुळे हे शक्य होत नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी टर्म लोन योजना देते, ज्यामुळे तुम्ही मोठ्या रकमेचे कर्ज घेऊन आपल्या शेतावर फार्म हाऊस बांधू शकता. या कर्जाचा वापर तुम्ही शेतीसाठीही करू शकता. चला तर, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता|Eligibility Criteria For Loan|
बँक ऑफ महाराष्ट्रकडून फार्म हाऊस बांधण्यासाठी कृषी टर्म लोन योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराची पात्रता देखील तपासली जाते. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार,
अर्जदाराकडे किमान अडीच एकर जमीन असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत एक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट कर्ज घेऊ शकतो. अर्जदाराचा वयोगट किमान १८ वर्षे आणि कमाल ६५ वर्षांदरम्यान असावा. याचा अर्थ, १८ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांवरील शेतकरी या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र ठरणार नाहीत.
कर्जाची रक्कम किती असेल
- २ लाख रुपये ते १० लाख रुपये कर्ज – ज्या शेतकऱ्यांची किमान २.५ एकर जमीन सिंचनाखाली आहे, त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रकडून २ ते १० लाख रुपयांपर्यंत कृषी टर्म लोन मिळू शकते.
- १० ते ५० लाख रुपये कर्ज – ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकर किंवा त्याहून अधिक जमीन सिंचनाखाली आहे किंवा उत्पन्न देणारी आहे, त्यांना १० ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळविण्याची संधी आहे.
कर्जाचा व्याजदर किती असेल|Interest On loan|
बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीच्या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यासाठी कृषी टर्म लोन योजनेअंतर्गत कर्ज देत असताना व्याजदर काय असतील, हा अनेकांचा प्रश्न असतो. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, शेतीविषयक कर्जांवर लागू असलेले व्याजदरच या योजनेअंतर्गतही लागू होतील. तसेच, या कर्जावर कोणतेही अतिरिक्त प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नसल्याचे बँकेच्या नोटिफिकेशनमध्ये नमूद केले आहे.
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा|Application Process For Maharshtra Bank Farm house Loan|
तुम्हाला शेतीत फार्म हाऊस बांधण्यासाठी कर्ज हवे असल्यास, आपल्या परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या जवळच्या शाखेत भेट देऊन सविस्तर माहिती मिळवू शकता. कर्जासाठी आवश्यक अर्ज बँकेच्या शाखेत उपलब्ध होईल.
योजनेसंबंधित सर्व माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी, या लिंकवर भेट द्या. त्यानंतर, "ऑनलाईन अर्ज करा" या बटणावर क्लिक करून, अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता.
शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कसा होईल|Maharashtra Bank Farm House Loan Benefits For Farmers|
बँक ऑफ महाराष्ट्रने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कृषी टर्म लोन योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर फार्म हाऊस बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. या योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे आपण पुढील मुद्द्यांद्वारे समजू शकतो:
- शेतकऱ्यांना शेतातील पिके किंवा धान्याची साठवणूक करण्यासाठी फार्म हाऊसचा वापर करता येईल.
- शेतीची अवजारे सुरक्षित ठेवण्यासाठी फार्म हाऊस उपयोगी ठरू शकते.
- अनेक बाजारपेठांतील एजंट शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेऊन ते साठवून, अधिक दराने विकतात. योग्य साठवणुकीच्या जागेअभावी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.
- मात्र, फार्म हाऊस असल्यास शेतकरी आपले धान्य सुरक्षितपणे साठवू शकतात आणि योग्य दर मिळाल्यावर विक्री करू शकतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होतो.
- शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि इतर वाहने फार्म हाऊसमध्ये ठेवणे शक्य होते, ज्यामुळे ती सुरक्षित राहतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत