Header Ads

Breaking News

आता राज्य सरकार राबवणार लेक लाडकी योजना| Lek Ladaki Yojana In Marathi|

Lek ladaki Yojana Online Apply

सध्या राज्यभरात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेची चर्चा सुरू आहे, आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात, लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना ३,००० रुपये देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. मात्र, राज्यातील मुलींना ७५,००० रुपयांची आर्थिक मदत करणारी "लेक लाडकी" योजना अनेकांना माहिती नाही. या योजनेद्वारे मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेबद्दल सविस्तर माहिती, तसेच लाभ मिळवण्यासाठीच्या अटी काय आहेत, याविषयी जाणून घेऊया.

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना रद्द करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी" योजना सुरू केली. या योजनेचे उद्दीष्ट मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे आहे.

लेक लाडकी योजने अंतर्गत मिळणारा लाभ|Lek Ladaki Yojana Benefits|

पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलींसाठी, जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये, आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती|Eligibility Criteria For Lek Ladaki Yojana|

ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांसाठी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू असेल. तसेच, एका मुलगा आणि एक मुलगी असलेल्या कुटुंबात, मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज करताना, माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी आपत्ये जन्माला आल्यास, एका मुलीला किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, मात्र त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल. 

लेक लाडकी योजनेची सविस्तर माहिती खालील लिंक वरून जानून घ्या

लेक लाडकी योजना मुलींना मिळणार १ लाख १ हजार रु पर्यंत लाभ| Lek Ladaki Yojana For Girls|

१ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा असल्यास, त्यानंतर जन्मलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील, परंतु माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आणि बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. तसेच, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे|Requaired Documents For Lek Ladaki Yojana|

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • लाभार्थीचा जन्मदाखला
  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे)
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील असेल)
  • पालकांचे आधार कार्ड
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड - साक्षांकित प्रत)
  • मतदान ओळखपत्र
  • संबंधित टप्प्यासाठी शिक्षण घेत असल्याबाबतच्या शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभासाठी, मुलीचा विवाह झालेला नसावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत