घरकुल यादी मोबाईलवर कशी पहावी? How To Check Ghrakul List On Mobile|
![]() |
| Gharkul List 2024 |
नमस्कार सर्वांना! आजच्या लेखात आपण घरकुल यादी कशी पहावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी कृपया संपूर्ण लेख वाचा.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना घरे दिली जातात. या योजनेला प्रधानमंत्री आवास घरकुल योजना म्हणून ओळखले जाते.
या लेखात आपण ऑनलाइन पद्धतीने घरकुल यादी कशी पाहावी, याबाबत माहिती घेणार आहोत. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे पालन करावे लागेल.
जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, किंवा सध्या तुमची अर्ज प्रक्रिया कोणत्या स्थितीत आहे. हे तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) बद्दलची माहिती मराठीत
प्रधानमंत्री आवास योजना, ज्याला प्रधानमंत्री घरकुल योजना असेही म्हणतात, १ एप्रिल २०१६ रोजी सुरू करण्यात आली आहे. या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत, गरीब लाभार्थी कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत पूर्वी ७०,००० रुपये दिले जात होते, परंतु आता ती रक्कम वाढवून २.६० लाख रुपये करण्यात आली आहे. या लेखात आपण पाहणार आहोत की आपल्या गावाची प्रधानमंत्री आवास योजना 'घरकुल यादी' मोबाईलवर कशी पाहता येईल.
घरकुल यादी कशी पहावी?
- ब्राउझर उघडल्यानंतर दिलेल्या लिंकवरून तुम्ही घरकुल यादीच्या अधिकृत वेबसाइटवर पोहोचाल.
- वेबसाइटवर ‘आवास सॉफ्ट’ हा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर ‘रिपोर्ट’ या पर्यायाची निवड करा.
- पुढे, सर्वात खाली असलेल्या ‘सोशल ऑडिट रिपोर्ट’ या विभागातील ‘बेनिफिशियरी रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन’ या पर्यायावर क्लिक करावे.
- आपल्याला प्रथम राज्य निवडावे लागेल, त्यानंतर जिल्हा, तालुका, आणि नंतर आपले गाव निवडून संबंधित माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर 'प्रधानमंत्री आवास योजना' हा पर्याय निवडा. खाली दिलेला कॅप्चा भरून 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
घरकुल यादी २०२४ कशी पहावी?
त्यानंतर, तुम्हाला सर्व घरकुल यादी दिसेल. तुम्ही ही यादी PDF किंवा Excel फाइलच्या स्वरूपात डाउनलोड करू शकता.
घरकुल योजनेचे फायदे
घरकुल योजनेचे फायदे आणि ती लोकांना कशा प्रकारे उपयोगी पडते, याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
- घरकुल योजना भारत सरकारने स्वातंत्र्यापासून सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत बेघर आणि गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल यादी प्रत्येक वर्षी अपडेट केली जाते.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना ७०,००० रुपये ते २.६० लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत