लाडकी बहिण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी नाही तर, या तारखेला जमा होणार | Ladaki Bahin Yojana First Installment|
लाडकी बहिण योजनेचे दोन्ही हाप्ते १७ तारखेला जमा होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला वितरित होणार आहे, आणि याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारतर्फे एक भव्य कार्यक्रम आयोजित करून हे पैसे वितरीत केले जातील. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर उपस्थित असतील, तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील.
लाडकी बहिण योजनेसाठी अर्जांची संख्या
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, आणि अर्जांची संख्या अजूनही वाढत आहे. राज्य सरकारने अर्जाची अंतिम मुदत 15 ऑगस्टवरून वाढवून आता 31 ऑगस्ट केली आहे, ज्यामुळे महिलांकडून या योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले जात आहेत.
लाडकी बहिण योजनेचा पहिला हाप्ता १७ तारखेला
लाडक्या बहिणींकरिता आणखी एक आनंदाची बातमी आहे. 17 ऑगस्ट रोजी या योजनेचा पहिला हप्ता, 3000 रुपये, महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधीच बहिणींना ओवाळणी मिळेल, हे निश्चित झाले आहे.
राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकार 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याचा विचार करत आहे. या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्जांची छाननी
तालुका, जिल्हा, आणि राज्य स्तरावर महिलांकडून आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर आली आहे, ज्यात मंजूर, प्रलंबित, आणि नामंजूर अर्जांचा समावेश आहे. प्रलंबित अर्जांतील काही त्रुटी दुरुस्त करून त्यांना मंजुरी दिली जाईल, तर नामंजूर अर्जांसाठी नव्याने अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी 1 कोटी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, आणि आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाभ
या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता, म्हणजेच 3 हजार रुपये, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत