Header Ads

Breaking News

सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक यांची एकूण संपत्ती किती? Indias Rechest Women Jayashri Ullal Biography And Networth|

Jayashri Ullal Biography And Networth In Marathi

अनेक महिलांना प्रेरणा देणाऱ्या जयश्री उल्लाल कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Hurun Rich List

अलीकडेच जाहीर झालेल्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून जयश्री उल्लाल यांचे नाव आले आहे. त्यांच्या एकूण संपत्तीसाठी 32,100 कोटी रुपये आहे. यावरून स्पष्ट होते की महिलांनी प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवले आहे. जयश्री उल्लाल, ज्यांनी अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे, त्या कोण आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ या.

तुम्ही भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांची यशोगाथा अनेकदा ऐकली असेल. आज आपण भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल यांच्याबद्दल जाणून घेऊया. 2024 च्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’नुसार, जयश्री उल्लाल यांना सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून स्थान मिळाले आहे.

जयश्री उल्लाल कोण आहेत? Who Was Jayashree Ullal|

जयश्री उल्लाल यांचा जन्म 27 मार्च 1961 रोजी लंडनमध्ये भारतीय वंशाच्या एका कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यातील सुरुवातीचे वर्ष भारतात घालवले आणि शालेय शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी युनायटेड स्टेट्सला जाऊन सॅन फ्रान्सिस्कोमधून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी सांता क्लारा विद्यापीठातून अभियांत्रिकी व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. कॅलिफोर्निया येथे विजय उल्लाल यांच्याशी विवाह करून जयश्रीने त्यांच्याबरोबर संसार सुरु केला. या जोडप्याला दोन मुली आहेत.

जयश्री उल्लाल अरिस्टा नेटवर्कच्या (Arista Networks) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. 2008 पासून त्यांनी Arista नेटवर्कचे नेतृत्व केले आहे. त्या काळात कंपनीला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते आणि फक्त 50 कर्मचारी होते. जयश्रीने त्या परिस्थितीत Arista नेटवर्कची धुरा सांभाळली आणि कंपनीला एक नवीन उंचीवर नेले. 2014 मध्ये Arista नेटवर्कचा आयपीओ बाजारात आला, ज्यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणावर लाभ कमावला. याचे श्रेय पूर्णपणे जयश्री उल्लाल यांना जाते.

जयश्री उल्लाल यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्या संपत्तेपेक्षा जयश्री उल्लाल यांची संपत्ती अधिक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत