महाराष्ट्रात होणार तब्बल ५०,००० योजनादूतांची नियुक्ती| Maharashtra Yojanadut Bharti 2024|
![]() |
| Maharashtra Government Yojanadut Recruitment 2024 |
महाराष्ट्र सरकारने राज्यभरात पन्नास हजार योजनादुतांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनादूतांची मुख्य भूमिका म्हणजे सरकारी योजनांचा दारोदारी जाऊन प्रचार करणे आणि नागरिकांना त्या योजनांचा लाभ मिळवून देणे होय. या योजनेसाठी सरकारने 300 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे.
नियुक्तिची प्रक्रिया आणि निकष
योजनादुत या योजनेसाठी १८ ते ३५ या वयोगटातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ योजनादुत तर शहरी भागासाठी ५००० लोकसंख्येमागे एक योजनादुत नियुक्त केला जाईल. या योजनेत निवड होण्यासाठी उमेदवार हा पदवीधर असावा, अद्ययावत मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँक खाते, त्याचे बँक खाते हे आधार कार्डला लिंक असावे.
मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाची अंमलबजावणी
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या योजनेसाठी नियुक्तिपत्रांच्या अर्जांची छाननी ऑनलाइन केली जाईल. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत नियुक्ती केली जाईल.
योजनादूतांचे मानधन आणि कार्यकाल
प्रत्येक योजनादूताला १०,००० रुपयांचे मानधन दरमहा देण्यात येईल. याशिवाय प्रवास खर्च आणि अन्य इतर भत्तेही दिले जाणार आहेत. हे मानधन फक्त सहा महिन्यांसाठी दिले जाईल. त्यानंतर हा करार वाढवण्यात येणार नाही.
योजनादूतांच्या कामाची जबाबदारी
योजनादूतांनी त्यांच्या जिल्ह्यातील सर्व सरकारी योजनांची माहिती घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवसा अखेर त्यांच्या कामाचा अहवाल ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. योजनादूतांनी त्यांच्या कामाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी. अन्यथा त्यांच्या सोबतचा करार संपुष्टात आणला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री योजनादुत भरती
मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याची संधी आहे. या योजनेचा भाग होण्यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा आणि या संधीचा लाभ घ्यावा.
योजनादुत भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- विहीर नमुन्यातील 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज.
- आधार कार्ड
- पदवी उतीर्ण असल्याचे पुराव्यासह कागदपत्रे / प्रमाणपत्रे इ.
- आधिवास दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला)
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र (ऑनलाइन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
- कार्यक्रमाशी संबंधित कामकाजाचे समन्वयन करणे.
- प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी / उपसंचालक यांच्याकडून दैनंदिन आढावा घेणे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाला साप्ताहिक अहवाल पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण करणे.
- योजनेचे कार्यक्रमाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या बाह्य संस्थेकडुन अहवाल तयार करून घेणे. त्यानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे किंवा नाही हे तपासून त्याचा अहवाल तयार करणे.
- योजनादुताची निवड समुपदेशन व निर्देशण (Orientation) आणि उद्दिष्टांबाबत काम केल्याबद्दलचा अहवाल संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेणे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत