Header Ads

Breaking News

नमो शेतकरी सन्मान योजना| Namo Shetakari Sanman Yojana In Marathi|

Namo Shetakari Sanman Nidhi Yojana Online Apply

भारत हा पूर्वीपासूनच शेतीप्रधान देश आहे. भारतातील बहुसंख्य नागरिकांचा शेती हा पारंपारिक आणि मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेळोवेळी भारतातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली होती. त्याच पाठोपाठ आता राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव 'नमो शेतकरी सन्मान निधी योजना' आहे (Namo Shetakari Sanman Nidhi Yojana). 

त्यामुळे आजच्या या लेखात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करून नमो शेतकरी सन्मान योजनाचा लाभ कसा घ्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन, स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे. त्यासोबतच अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. 

नमो शेतकरी सन्मान निधी योजना| Namo Shetakari Sanman Nidhi Yojana|

महाराष्ट्र शासनाने नुकताच शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता वार्षिक १२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्यात केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेची ६००० रुपये आणि राज्य सरकारच्या शेतकरी सन्माननिधी योजनेची ६००० रुपये असे दोन्ही मिळून १२ हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

जे शेतकरी पहिले केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत होते त्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचाही लाभ मिळणार आहे. 

नमो शेतकरी योजनेची पात्रता काय? Namo Shetakari Yojana Eligibility|

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. 
  •  राज्याच्या बाहेरील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. 
  • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे. 
  • शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 
  • अर्ज शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. 
  • या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना दिला जाईल. 
  • शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
नमो शेतकरी सन्मान योजनेची पात्रता  व निकष
  • अर्जदाराचे क्षेत्रफळ, अल्पभूधारक आणि त्याच्या नावे असणारी जमीन दोन हेक्टर पेक्षा कमी असावी. 
  • लाभार्थी शेतकऱ्यांचे पती-पत्नी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. 
  •  लाभ घेणारा शेतकरी ग्रामपंचायत सदस्य, खासदार, आमदार, कोणत्याही शासकीय पदावरती किंवा पी. एस सदस्य नसावा, शेतकरी आयकर भरणारा नसावा अन्यथा तो या योजनेसाठी पात्र नसेल. 
  • २०१९ मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी आहे, ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. 
नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Namo Shetakari Sanman Yojana Important Documents|
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • जमिनीची कागदपत्रे सातबारा व आठ अ
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
नमो शेतकरी सन्मान योजनासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? Namo Shetakari Sanman Nidhi Yojana Online Apply|

खाली दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही 'नमो शेतकरी सन्मान निधी' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 
  • सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट https://nsmy.mahait.org/ वरती जावे लागेल. 
  • या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्ही 'ग्रामीण शेतकरी नोंदणी' या पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा आणि तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरला लिंक आहे, याची खात्री करा. 
  • या नंतर तुमचे राज्य निवडा तुमचे राज्य निवडल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी एंटर करा आणि पुढे जा. 
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल त्यात तुमचे तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडा. 
  • त्यानंतर तुम्ही तुमचा जमीन नोंदणी आयडी प्रविष्ट करा. 
  • यानंतर तुमचा शिधापत्रिका क्रमांक फॉर्ममध्ये भरा आणि तुमच्या जमिनीशी संबंधित तपशील, क्षेत्र, खाते क्रमांक इत्यादी भरा. 
  • आता 'नमो शेतकरी किसान सन्मान निधी' योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट या बटणावर क्लिक करा. 
अशाप्रकारे तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. 

मित्रांनो आम्हाला आशा आहे, की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जवळच्यांना शेअर करा जेणेकरून त्या सर्वांना या योजनेची माहिती मिळून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत