Header Ads

Breaking News

'पेट' परीक्षेचे वेळापत्रक, जानून घ्या कधी होणार 'पेट' परिक्षा| Pet Exam Timetable And Date|

Pet Exam Date And Timetable

प्रथमच कागदपत्र तपासणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यापीठाने या प्रक्रियेसाठी दोन वेळा मुदतवाढ दिली. यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होऊन परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलली गेली आहे. आता 'पेट' परीक्षा तीन ऑक्टोबरला होणार असून, निकाल १५ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यापीठाने पीएचडी मार्गदर्शक आणि रिक्त जागांची संख्या जाहीर केली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी पूर्वपरीक्षा तीन ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. कागदपत्रांची तपासणी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे, आणि परीक्षा 'ओएमआर' पद्धतीने होणार आहे. प्रक्रियेत झालेल्या मुदतवाढीमुळे परीक्षेचे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलले गेले आहे.

विद्यापीठातर्फे 'पेट-६' साठीची प्रक्रिया सुरू आहे. एक जुलैपासून सुरू झालेली ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत चालली. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडून आता कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण १४,१२५ विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. परीक्षेसाठी विद्यापीठाने प्रश्नपत्रिका निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याची जबाबदारी अधिष्ठातांवर असल्याचे सांगितले जाते. तीस विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार असून, परीक्षा केंद्र निश्चितीची प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

प्रथमच कागदपत्र तपासणीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी विद्यापीठाने दोन वेळा मुदतवाढ दिल्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होऊन, परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली. 'पेट' परीक्षा आता तीन ऑक्टोबरला होणार असून, निकाल १५ ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे. २०२४ साली होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यापीठाने पीएचडी मार्गदर्शक आणि रिक्त जागांची संख्या जाहीर केली आहे. वाणिज्यशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान या चार विद्याशाखांमध्ये सुमारे दोन हजार जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

'पेट' परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक|Pet Exam Date And Timetable|

  • कागदपत्र सादरीकरणाची अंतिम तारीख - ३१ ऑगस्ट
  • कागदपत्र पडताळणी - १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर
  • तात्पुरती यादी - १० सप्टेंबर
  • अंतिम यादी - १८ सप्टेंबर
  • 'पेट' परीक्षा - ३ ऑक्टोबर
  • 'पेट'चा निकाल - १५ ऑक्टोबर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत